कुरुक्षेत्रानंतर

भाषा
मराठी
आवृत्ती
१
किंमत
60.00
पृष्ठसंख्या
62

भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग असणारं महाभारत ! अतर्क्य घटना, व्यक्तिरेखा यांच्या अगम्य वागणुकीनं सामान्य माणसाला चक्रावून टाकत विचार करायला लावणारं तरीही मोहवणारं महाकाव्य ! 'धर्मयुद्धा'च्या नावाखाली झालेल्या कुरुक्षेत्रावरील या युद्धात समकालीन वन्यजाती-समूह, आणि त्यातूनही इतर समाजघटक, व्यक्ती यांची जी होरपळ झाली. विशिष्ट अशी जीवनमूल्यं त्यांना जगण्याचं बळ देऊन गेली. तीच आपल्या विचारांच्या अथांग जलाशयाला ढवळून काढत आशावादाचे प्रवाहीपणाचे तत्त्वज्ञान आपल्याला देतात. पापपुण्याची, न्याय-अन्यायाची दुर्लक्षित बाजू, कौरव-पांडव दोन्ही बाजूंचा सत्तेचा उन्मत्तपणा आपल्याला नवीन विचारसरणी प्रदान करतो.

डॅडी लाँगलेग्ज

भाषा
मराठी
आवृत्ती
दुसरी
किंमत
120.00
पृष्ठसंख्या
143

मलपृष्ठावरूनचः

जेरूशा - अनाथालयातली एक पोरकी मुलगी.
तिची बुद्धीमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.
मात्र अट एकच.
तिची प्रग्ती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची.
जेरूशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्यांला एकदाच ओझरता पाहिलेला.
लांब ढांगांचा उंच मनुष्य.
म्हणून त्यांचं नाव - 'डॅडी लाँगलेग्ज'!
आपल्या अनामिक वडलांना जेरूशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.
एका तरूण, देखण्या अनाथ मुलीचं भावविश्व हळुवारपणे उलगडत नेणारी, मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारी ...