लोकदे॓वतांचे विश्व

भाषा
मराठी
आवृत्ती
३ री २००७
किंमत
180.00

हिंदु देवीदेवता ह्यांचा गाढा अभ्यासक म्हणुन रा. चिं ची ओळख आहे, त्यांच्या त्याच परंपरेतले हे पुस्तक. गणेश, कुबेर, लक्ष्मी, अलक्ष्मी, स्कंद, तिरुपती, श्रीकृष्ण, मातृदेवता ह्यां देवतांच्या उत्त्पती आणि विकासबद्दल अनेक दाखले देत, उत्खनन्नात सापडलेले पुरावे देत. लोककला, मिथेके, कथा, पुराणे ह्यांचे दाखले देत हे पुस्तक पुढे जाते. देवीदेवता, मुर्तीशास्त्र, ह्यांचा अभ्यासकांना नविन खाद्य पुरवण्याचे कार्य हे पुस्तक नक्कीच पार पाडते.

कुशाण

भाषा
मराठी
आवृत्ती
दुसरी
किंमत
100.00

शक, हूण, कुशाण यासारख्या भटक्या टोळ्यांनी भारतावर आक्रमणे केली. ते तिथे स्थिरस्थावर झाले - तेथील संस्कृतीत मिसळून गेले. ही कथा आहे कुशाण टोळीची ... जी भटक्या अवस्थेतून येथील स्थिर संस्कृतीत नंतर मिसळून गेली.
पण हे संक्रमण येवडे सहज नसते. आधीच्या संस्कृतीची नाळ तोडत नव्या अपरिचित .. पण हव्याश्या वाटणार्‍या संस्कृतीत समाविष्ट होत असतांना ज्या मानसिक संघर्षातून जावे लागते त्याचे चित्रण या कादंबरीत आहे. आणि भारतभूमी परकियांना सत्तेची किती सहज संधी देते त्याचेही हृदयविदारक चित्रण या कादंबरीत आहे.

फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट

भाषा
मराठी
किंमत
300.00
पृष्ठसंख्या
388

फ्रीडम अट मिडनाईट : 1947साली मध्यरात्री अनुभवलेले भारतीय स्वातंत्र्याचे थरारनाट्य

अनुवादक : माधव मोर्डेकर
मूळ लेखक : लॅपिए डॉमिनिक/कॉलिन्स लॅरी