समईची वात जळते, स्वतः:ला तेलात भिजवून घेते आणि जळत जळत आजूबाजूच्या अंधाराला जाळते. आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपल्या अवतीभवती अंधाराला फिरकू देत नाही. तेच मशालीतल्या वातीचं, पणतीतल्या, मेणबत्तीतल्या वातीचं.. हे स्वतः जळणं, स्वतः: ला त्रास करून घेऊन आजूबाजूला आनंद देणं तसं सृष्टीत सर्वत्रच दिसतं.. स्वतः:चं सारं अग्नीला वाहून, इदं न मम म्हणजे हे माझं नाही असं म्हणत स्वतः कडचं उत्तम समाजाला देणं आणि त्या निःस्वार्थात स्वतः उजळून जाणं यापेक्षा एखादा माणूस स्वतः चं अधिक चांगलं असं काय करू शकतो?