कविता (जे न देखे रवी)

By Deepak Pawar, 2 February, 2026

दाटलेली हुरहूर
मन असं सैरभैर
कुणाचे हे रंग सारे
पसरले मनभर
काय झाले असे
मन वेडेपिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

रंग न्हाली सांज येई
कुणाची ही भूल पडे
गंध ओल्या वाऱ्यातून
कुठे मन दूर उडे
शोधिते कुणाला
कळेना मनाला
झाडातून पानातून कोण आता दिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

उमललेल्या पहाटेस
सपनात येई कोण
बहरल्या वेलीपरी
मोहरुन जाई मन
कुणाचे हे रूप
मनभर धूप
पसरून दिसभर गंधाळते जसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

https://youtu.be/RBXDiuu3qT8

By Deepak Pawar, 2 February, 2026

दाटलेली हुरहूर
मन असं सैरभैर
कुणाचे हे रंग सारे
पसरले मनभर
काय झाले असे
मन वेडेपिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

रंग न्हाली सांज येई
कुणाची ही भूल पडे
गंध ओल्या वाऱ्यातून
कुठे मन दूर उडे
शोधिते कुणाला
कळेना मनाला
झाडातून पानातून कोण आता दिसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

उमललेल्या पहाटेस
सपनात येई कोण
बहरल्या वेलीपरी
मोहरुन जाई मन
कुणाचे हे रूप
मनभर धूप
पसरून दिसभर गंधाळते जसे
कुणाचे हे मनावर उमटले ठसे.

https://youtu.be/RBXDiuu3qT8

By बाजीगर, 24 January, 2026

आधी रापचीक,
आता लवचिक,
सत्ते साठी विक,
पक्ष निष्ठा ||

आधी ताताथय्या,
काढ एकमेक मैया,
आता एक शय्या,
विरोधकांशी ||

सर्व पक्षांची भेळ,
ना कुणाचा मेळ,
आकड्यांचा खेळ,
खुर्ची साठी ||

पक्षफुटी ची भीती,
अनीती हीच रीती,
समर्थन शब्द किती,
बुडबुडे ||

By बाजीगर, 24 January, 2026

आधी रापचीक,
आता लवचिक,
सत्ते साठी विक,
पक्ष निष्ठा ||

आधी ताताथय्या,
काढ एकमेक मैया,
आता एक शय्या,
विरोधकांशी ||

सर्व पक्षांची भेळ,
ना कुणाचा मेळ,
आकड्यांचा खेळ,
खुर्ची साठी ||

पक्षफुटी ची भीती,
अनीती हीच रीती,
समर्थन शब्द किती,
बुडबुडे ||

By हणमंतअण्णा शंक…, 22 January, 2026

जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी?
वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी?

शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या,
नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी?

जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला,
स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी?

फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया ,
दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी?

प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc

मूळ थोर लिरिक्ष :

बोल मै हलगी बजावू क्या

By हणमंतअण्णा शंक…, 22 January, 2026

जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी?
वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी?

शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या,
नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी?

जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला,
स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी?

फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया ,
दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी?

प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc

मूळ थोर लिरिक्ष :

बोल मै हलगी बजावू क्या

By नाहिद नालबंद, 21 January, 2026

बदललो कधी ना समाजाप्रमाणे
सदा वागलो मी मनाच्याप्रमाणे

कसा मार्ग चुकला कळेना कुणाला
जरी चालले ते गुगलच्याप्रमाणे

स्वतःची बनावी इथे खास ओळख
कशाला लिहावे कुणाच्याप्रमाणे

खरे सांग मित्रा, असा वागला तू
कशाला कुणाच्या इशाऱ्याप्रमाणे

उगा भावना का दुखाव्या कुणाच्या
कला पाहिली जर कलेच्याप्रमाणे

लिहाया हवे आणखी चांगले तुज
हवी दाद जर का पुण्याच्याप्रमाणे

By नाहिद नालबंद, 21 January, 2026

बदललो कधी ना समाजाप्रमाणे
सदा वागलो मी मनाच्याप्रमाणे

कसा मार्ग चुकला कळेना कुणाला
जरी चालले ते गुगलच्याप्रमाणे

स्वतःची बनावी इथे खास ओळख
कशाला लिहावे कुणाच्याप्रमाणे

खरे सांग मित्रा, असा वागला तू
कशाला कुणाच्या इशाऱ्याप्रमाणे

उगा भावना का दुखाव्या कुणाच्या
कला पाहिली जर कलेच्याप्रमाणे

लिहाया हवे आणखी चांगले तुज
हवी दाद जर का पुण्याच्याप्रमाणे

By निनाद, 20 January, 2026

सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार!
खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो. ही कविता जरा उशीराच टाकली गेली हे मान्य आहे.
आपण केलेल्या वारंवार आठवणीमुळे शेवटी ही कविता पाझरली आहे.

काव्याचा आनंद घ्यावा!

तांत्रिक विलोपन

स्पंदन संवेग विभव हे संचलन
स्थित्यंतर रोध प्रवेग प्रचालन
उत्सर्जन दाह जडत्व विलोपन
बीजकण न्यास संहती संरोपण

भूमिती रेख विन्यास परिमापन
वक्रीय भार का विरुपण मापन
पृष्ठभागावरी स्राव नि निक्षेपण
शृंखला सूत्र हे प्रगामी विलेपन

By निनाद, 20 January, 2026

सर्व रसिकांचे आणि फॅन्स चे कविता करावी या आग्रहासाठी अनेक आभार!
खूप काळापासून माझी कविता ओव्हरड्यु होती हे मी मान्य करतो. ही कविता जरा उशीराच टाकली गेली हे मान्य आहे.
आपण केलेल्या वारंवार आठवणीमुळे शेवटी ही कविता पाझरली आहे.

काव्याचा आनंद घ्यावा!

तांत्रिक विलोपन

स्पंदन संवेग विभव हे संचलन
स्थित्यंतर रोध प्रवेग प्रचालन
उत्सर्जन दाह जडत्व विलोपन
बीजकण न्यास संहती संरोपण

भूमिती रेख विन्यास परिमापन
वक्रीय भार का विरुपण मापन
पृष्ठभागावरी स्राव नि निक्षेपण
शृंखला सूत्र हे प्रगामी विलेपन