Submitted by मेघना भुस्कुटे on
इंद्रराज पवार

बाप रे !!

लिस्ट वाचताना मध्ये दोनदा श्वास घेतला.
तुझ्या घरावर दरोडा घालण्याचा बेत करावा असा विचार प्रबळ होऊ लागला आहे. ही काय पुस्तक खरेदी आहे की लूट ? मेघनाच्या ताब्यात नाशिकची मिंट असणार याचा विश्वास वाढू लागला आहे.

इन्द्रा

[रिल्केची निवडक पत्रे (साहित्य अकादमी प्रकाशन)....याबद्दल मी विशेष उत्सुक आहे. पाहू या, ऑनलाईन खरेदी यादीत आहे का.]

Mon, 27/12/2010 - 23:56 Permalink
ऋषिकेश

वाह! मस्तच!

इंद्रराज यांच्याशी सहमत! दरोडा घालायला जाताना बोलवा हो! ;)

या पुढे अशी जळवा-जळवी केल्यानंतर दरोडा वाचवायचा असल्यास ही पुस्तके वाचल्यावर ती कशी वाटली हे इथे लिहिण्याची पळवाट सुचवत आहे

Tue, 28/12/2010 - 08:36 Permalink
बिपिन कार्यकर्ते

माझी कमाई :

०१. तुंबाडचे खोत - खंड १ आणि २ - श्री. ना पेंडसे - ओळख करून द्यायची गरज नाही.

०२. अर्धी मुंबई - युनिक फिचर्स - मुंबईत राहूनही अनभिज्ञ असलेल्या मुंबईचा परिचय.

०३. रास - सुमा करंदीकर - विंदांच्या पत्नींचे आत्मकथन.

०४. माझे विद्यपीठ - नारायण सुर्वे - कवितासंग्रह. आयुष्यात पहिल्यांदा कवितासंग्रह घ्यावासा वाटला.

०५. वासूनाका - भाऊ पाध्ये - ६० च्या दशकात गाजलेला आणि मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेला कथासंग्रह.

०६. परम मित्र - जयवंत दळवी - व्यक्तिचित्रं.

०७. पारधी - गिरिश प्रभुणे - पारधी जमातीबरोबर काम करताना आलेले अनुभव.

०८. बाइंडरचे दिवस - कमलाकर सारंग - आत्मकथनात्मक.

०९. साधनामस्त - जगन्नाथ कुंटे - नर्मदाप्रदक्षिणा अनुभव कथन.

१०. जे. कृष्णमूर्ती - जीवन आणि मृत्यू - मेरी लट्येन्स - चरित्र.

११. थँक यु मिस्टर ग्लाड - अनिल बर्वे - कादंबरी (मेघनाकडून उसनी आणली आहे, ती विसरली तर परत देणार नाही, नाही विसरली तर स्कॅन करून परत देणार. ;) )

१२. नतिचरामी - मेघना पेठे - कादंबरी. धाडस केले आहे.

१३. कोसला - भालचंद्र नेमाडे - कादंबरी. वाचली आहे. काही पुस्तके संग्रही असणे मस्ट. (जशी लंपनची सगळी पुस्तकं).

१४. एम टी आयवा मारू - अनंत सामंत - वाचली आहे. काही पुस्तके संग्रही असणे मस्ट. (जशी लंपनची सगळी पुस्तकं).

१५. ललित मासिकाचे काही जुने दिवाळी अंक - अ गिफ्ट फ्रॉम मेघना. :)

१६. जवानमर्द फास्टर फेणे - भा. रा. भागवत - बालसाहित्य. मुलीसाठी.

१७. आजीच्या गोष्टी - बालसाहित्य. मुलीसाठी.

***

घरी पोचल्यावर तिर्थरूपांनी 'दुकानाला जागा कुठे घेतली आहे?' एवढेच विचारले.

फेसबुकवर लिस्ट टाकल्यावर बरेच फुकटे मित्र आणि मैत्रिणी 'मला दे वाचायला' वगैरे म्हणायला लागले. त्यांना वाटेला लावले आहे. ;)

माझ्या कडची पुस्तके वाचून झाली की मग मकी आणि मेघना कडे लायब्ररी लावणार आहे. :D

**

Tue, 28/12/2010 - 13:51 Permalink
वल्ली

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छानच खरेदी, पण कोसला, तुंबाडचे खोत ही पुस्तके आतापर्यंत तुमच्याकडे नव्हती हे वाचून अंमळ आश्चर्य वाटले. :)

Tue, 28/12/2010 - 13:56 Permalink
बिपिन कार्यकर्ते

In reply to by वल्ली

तुंबाडचे खोत अजून वाचले नाहीये...

कोसला (आणि चांगदेव चातुष्ट्य) शाळकरी वयापासून वाचतो आहे (जेव्हा हिंदूची नुसतीच हूल होती आणि झूल नुसतीच झूल होती ;) ), काकाकडे होती. त्यामुळे माझी वेगळी प्रत घेतली नव्हती. आता मुहूर्त लागला.

Tue, 28/12/2010 - 14:00 Permalink
ऋषिकेश

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अहाहा! दोघांनीही काय मस्त खरेदी केली आहे!
आता मकची खरेदी वाचायला उत्सूक! शेवटची पुस्तके कशी आहेत त्याचा फिडब्याकही (टार्गेट रीडर्सने दिलेला) सांगा

Tue, 28/12/2010 - 14:29 Permalink
टण्या

बिपिन, रास हे माझ्या अतिशय आवडत्या आत्मवृत्तांपैकी एक आहे..

Tue, 28/12/2010 - 13:34 Permalink
रैना

१. प्राक्तनाचे संदर्भ- द. भा. धामणस्कर (कवितासंग्रह)
२. आई समजून घेताना - उत्तम कांबळे
३. माणूसपणाचं भिंग बदलल्यावर- मल्लिका अमर शेख (कवितासंग्रह)
४. हाडकी हाडवळा- नामदेव ढसाळ
५. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - राजवाडे. प्रस्तावना: डांगे
६. जागतिक रंगभूमी (पूर्वरंग आणि पश्चिमरंग)- माणिक कानेड (मौजेने हँडबिलावर जागतीक लिहीले आहे).
मागील आणि या संमेलनात मौजेने जरा खपाच्या दृष्टीने डोकेबाजी केली आहे. एकत्रित सेट पॅक ठेवतात. खप जास्त होतो. उदा- सुनीताबाई सेट, नारळीकर सेट,गौरीदे सेट वगैरे.
आणि मौज/ज्योत्सना/रोहन एकत्रित ठेवतात. खरं म्हणजे मौजेच्या स्टॉलवर फिरकणार नाही असे ठरवले होते, पण
७. मुलं घडताना घडविताना - रेणू दांडेकर
८. चित्रलिपी- वसंत आबाजी डहाके (कवितासंग्रह)
९. निवडक राजन गवस (ढव्ह आणि लख्खं ऊन) संपादक- रणधीर शिंदे. एकंदरित लोकवांङमय गृहाचे कलेक्शन फार चांगले वाटले. खपाच्या दृष्टीने जरा उदासीन आहेत ते.
त्यांनी ही जी निवडक सीरीज काढली आहे, ती चांगली आहे (असे चाळुन वाटले). असो.
१०. सृजनाचे साक्षात्कार/ निशःब्दता ओलांडताना - संपादन- अंजली मुळे. (दृश्यकथाकार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं)
११. कातकरी विकास की व्यवस्थापन - मिलिंद बोकील
१२. टीकास्वयंवर- नेमाडे (कधीचे शोधत होते. मिळाले एकदाचे)
१३. लज्जागौरी- रा. चि. ढेरे
१४. बंदिश - किरण फाटक ( जरा बेसिक आहे. पण ठिक)
१५. एका जरा मोठ्या मुलीला इंग्रजी शिकवायला म्हणून. एव्हरिडे इंग्लिश- जेन साही. ज्योत्सना प्रकाशन.
१६. निसर्गायण- दिलीप कुलकर्णी. राजहंस महान आहेत. एरव्ही २५ टक्के सूट देतात. इथे ती स्कीम लागू नाही म्हणून सांगीतले. असो.
१७. अर्धी मुंबई- युनिक फीचर्स
१८. साहित्य आणि अस्तित्वभान- १ दिपुचित्रे. शब्दालय प्रकाशन. हे माहितच नव्हते. यांचा स्टॉक चांगला होता.
१९. कविता रती दिवाळी अंक २००५-
२०. स्त्रीवाद- संपादन सुमती लांडे (शब्दालय)
२१. भारतीय संदर्भातून स्त्रीवाद- स्त्रीवादी समीक्षा आणि उपयोजन शोभा नाईक
२२. कबीर गाता गाता- नीला भागवत
२३. लोकसाहित्य शोध आणि समीक्षा - रा चि ढेरे
२४. पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी - उदय प्रकाश अनुवाद गणेश विसपुते
२५. धाकट्या नजरेतून: अल्का गोडे
२६. लिंगभाव समजून घेताना: कमला भसीन (भाषांतरः श्रुती तांबे)
२७. निवडक कमल देसाई काळ्या सुर्याखालच्या गोष्टी संपादक- संजय आर्वीकर
२८. वनांत जनातः अवचट
२९. अतुल धामनकरांचे एक.
बाकी काही लहान मुलांची पुस्तकं घेतली.

यावेळेस प्रकाशकांचे स्टॉल जरा जास्त चांगले वाटले (विक्रेत्यांपेक्षा). पुण्यात नसल्याने कदाचित पण माहितीही देत होते व्यवस्थित, आणि चक्कं 'अहो हे पुस्तक पहा हो, पहायला पैसे लागतात का' वगैरे ऐकले.;-) (सुदिन, सुवेळ)

बुकगंगा डॉट कॉम ने जबर्‍या तामझाम वाला स्टॉल ठेवला होता, पीसी आणि ब्राऊझ करायची सोय वगैरे.
त्यांचा खरं म्हणजे स्टॉक अजून लैच मर्यादित आहे,पण मार्केटिंग सही जा रैला है.

साहित्य अकादमी आणि एनबीटीने आणि सिबीटीनेही यावेळेस जाम पाटीटाकु स्टॉल ठेवले होते. त्यांचे अक्षरधारातले कलेक्षन उत्तम म्हणायची वेळ आली.

मराठी स्नॉव्हेल (ऑडियो बुक?) म्हणे- याचे प्रीबुकिंग चालू होते. जी ए आणि आणखी दोन तीन कथा असे काहीतरी होते. जरा पॅम्फ्लेट पाहून सांगावे लागेल. कोणाला हवे असलेच तर सांगते. पण effort not bad होता.

अनुवादित पॉप स्वरूपाचे प्रचंड कलेक्षन दिसले. बरीच रेंज आहे यात. वाट्टेल त्या लेखक/पुस्तकाचे अनुवादित साहित्य दिसले.

बायदवे: अ‍ॅटलस श्रग्ड चा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केलेला दिसला. अ‍ॅटलसचा कधीकाळी मराठी अनुवाद दिसु शकतो हेच भारी वाटले. चाळायचे राहिले. कोणी चाळले असेल/वाचले असेल तर अपडेटस द्या ना कृपया

Tue, 28/12/2010 - 14:58 Permalink
रैना

अनुमोदन मेघना. ग्रंथालीची भानगड काय आहे कळत नाही. सगळी चांगली पुस्तकं आउटऑफप्रिंट आहेत एवढेच ते सांगतात.

खरयं मेहतांचा स्टॉल त्यातल्या त्यात पॉश होता.फिरकलेच नाही. :-)

कार्डपेमेंट यायला किती वर्ष लागतील? आकडे लावा

Tue, 28/12/2010 - 15:04 Permalink
नंदन

वा, वा, जोरदार खरेदी झालेली दिसतेय. पुढल्या खेपेत विकत घ्यायच्या पुस्तकांच्या यादीत भर पडत चालली आहे :)

Wed, 29/12/2010 - 01:52 Permalink
मस्त कलंदर

बर्‍याचशा पुस्तकांबद्दल मी लिहिण्याची गरजच नाही. बस्स नामही काफी है!!!
१) रथचक्र - श्री. ना. पेंडसे
२) डांगोरा एका नगरीचा: त्र्यं.वि.सरदेशमुख
३) वनवास - प्रकाश संत
४) शारदासंग्रह - प्रकाश संत
५) पंखा - प्रकाश संत
६) झुंबर - प्रकाश संत
७)एम.टी. आयवा मारू- अनंत सामंत.
८-११)बिढार, हूल, जरीला, झूल - चांगदेव चतुष्टय - भालचंद्र नेमाडे [यातली बिढारची पॉप्युलरकडची शेवटची प्रत होती. पुन्हा नवीन कधी येणार याबद्दल त्यांच्याकडे उत्तर नव्हते. त्यामुळे थोडीशी पानं वेडीवाकडी असूनही घेतलीच. नेमाडेंच्या वाटेला बरीच वर्षे गेले नव्हते. त्यामुळे सुरूवात हिंदूपासून करून कोसला आणि आता त्यानंतर चांगदेव चातुष्ट्य अशा वेड्यावाकड्या क्रमाने वाचतेय. हिंदू अजून पूर्ण झाली नाही हेवेसांनल. :-)]
१२) चिरदाह- भारत सासणे [मेघनाचं रेकमेंडेशन]
१३-१४)एस.एल भैरप्पांची अनुवादित पुस्तके- वंशवेल आणि आवरण-अनुवाद उमा कुलकर्णी [ही मोडकांची फर्माईश होती. त्यांना हवी असलेली शिवराम कारंथाची अनुवादित पुस्तके मेहता, मॅजेस्टिक, पॉप्युलर अशा कुणालाच कुठल्या प्रकाशनाची आहेत हे माहित नव्हते, त्यामुळे तीही मिळण्याचा संभव नव्हताच]
१५)नांगरल्याविण भुई-नंदा खरे. [पुविवर नानावटींनी परिचय लिहिला आहेच. मस्त पुस्तक आहे. सुरूवातीची साठेक पाने वाचून झालीयत. सॉल्लीड मजा येतेय वाचायला.]
१६)सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर [काही म्हणता काही कळलं नाही पुस्तक. खूप नेट लावून वाचायचा प्रयत्न केला. शेवटची तीस पाने तशीच ठेवलीत]
१७)पर्व - एस.एल.भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी [याची थोडंसं कव्हर फाटलेली प्रत मॅजेस्टिक कडे मिळाली. त्यांच्याकडची ती शेवटची प्रत होती. मेहतांकडे तीही उपलब्ध नव्हती]
१८)माचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर
१९)एका रानवेड्याची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
२०) असा घडला सचिन- अजित तेंडुलकर-अनुवाद संजय कराडे[पेंढारकरांचे 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' कलेक्टर्स आयटेम होती. साधारण तसाच आकार, आत पुष्कळ फोटोग्राफस म्हणून मोठ्या कौतुकाने घेतली होती. घरी आल्यावर निवांतपणे पुस्तक उघडून पाहिलं तर कागदाचा दर्जा, फाँट चंगला नाहीय. मॅगेझिन स्टाईलमुळे वाचायला पण तितकंसं आरामदायी वाटत नाहीय. असो. आमच्या सचिनसाठी काहीही, आणि कसंही वाचण्याची तयारी आहे. अर्थात अजितने लिहिलेलं पुस्तक आहे, सुनिल गावस्करची प्रस्तावना आहे. त्यामुळे पुस्तक वाचनीय आहेच]

Wed, 29/12/2010 - 15:17 Permalink
ऋषिकेश

In reply to by मस्त कलंदर

डांगोरा एका नगरीचा: त्र्यं.वि.सरदेशमुख

कशावर आहे हे पुस्तक? वाचल्यावर कसंय तेही लिहि
बाकी नेमाडे वाचनाला शुभेच्छा! :P

Wed, 29/12/2010 - 17:21 Permalink

ठाण्यातल्या साहित्यसंमेलनात केलेली ही खरेदी:

बापमाणूस (अक्षर प्रकाशन) - संपा. निखिल वागळे

छत्रपती शिवाजीमहाराज जीवनरहस्य (इंद्रायणी प्रकाशन) - नरहर कुरुंदकर
जाम शोधाशोध करावी लागली. कारण इंद्रायणीचा स्टॉल नव्हता. निदान मला तरी नाही सापडला. शुभमवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप प्रयत्न केले. मेहतावाल्यांनी ’नाहीच मिळणार तुला कुठेच’ असं हसतमुखानं सांगितलं. शेवटी मॅजेस्टिकवाल्यांनी फोनाफोनी करून मला प्रत मिळवून दिली. :)

विवाहसंस्थेचा इतिहास - राजवाडे समग्र साहित्य खंड ७ - ८ (राजवाडे प्रकाशन) - वि. का. राजवाडे
या पुस्तकाला जाम मागणी होती स्टॉल एकदम खोपच्यात असूनसुद्धा. तिथले विक्रेतेही तत्परतेनी माहिती देत होते. (मी परत घ्यायला विसरून गेलेले पैसे द्यायला मला शोधतपण आले बिचारे! :))

सुनीताबाई (राजहंस प्रकाशन) - मंगला गोडबोले
राजहंसच्या स्टॉलवर माइकवरून जाहिरात वगैरे चालू होती. पुस्तकं लावलेलीही सुरेख होती.

शब्देविण संवादु (परममित्र प्रकाशन) - राणी दुर्वे
चक्क निम्मी किंमत!, शिवाय परममित्रचा दिवाळीअंक चकटफू.

कार्वालो व गूढ माणसं (मराठी साहित्य परिषद) - पूर्णचंद्र तेजस्वी / अनु. उमा कुलकर्णी
अगदी दुर्लक्षित स्टॉल होता. जेमतेम दहाबारा पुस्तकं मांडलेली. पण या पुस्तकाची जीर्ण का होईना, प्रत दिसताच उचलली. आणि मला ती अविश्वनीय किंमतीत (४० रुपयांना!) मिळाली. ती तिथली शेवटचीच होती, या पुस्तकाची.

रिल्केची निवडक पत्रे (साहित्य अकादमी प्रकाशन) - अनु. निखिलेश चित्रे

तुकाराम (साकेत प्रकाशन) - भालचंद्र नेमाडे
यांच्या एकमेव स्टॉलवर कार्ड अ‍ॅक्सेप्ट करणार मशिन होतं. बाकी सगळीकडे फक्त नकद. अगदी कार्टून्स लावून सजवलेल्या आणि शिष्टपणे बॅगा बाहेर ठेवायला लावणार्‍या मेहतांकडेही नव्हतं मशीन.

चांगदेव चतुष्टय (झूल, हूल, जरीला, बिढार - पॉप्युलर प्रकाशन) - भालचंद्र नेमाडे
हाइट म्हणजे दुसर्‍या दिवसाच्या शेवटी खुद्द पॉप्युलरकडची हूल आणि जरीला संपली होती. उद्या आणाल का, विचारलं तर (अर्थातच हसतमुखानं!) ’आवृत्ती संपली’! ही मला वाटतं साकेतमधे मिळाली.

महापुरुषांच्या नजरेतून स्त्री (मेनका प्रकाशन) - मंगला आठलेकर
मंगला आठलेकरांची बरीच पुस्तकं होती यांच्याकडे. शिवाय स्वत:च्या प्रकाशनावर वीस टक्के सवलत या अलिखित नियमाला अनुसरून (याला कॉण्टिनेण्टलचा अपवाद. दहा टक्क्यापेक्षा जास्त सूट नाही म्हणे. पण मॅजेस्टिकात जातो असं सूतोवाच करताच त्यांनी १५ टक्के सूट दिली ही आणिक एक गंमत!) त्यांनीही सवलत दिलीच.

तमस (एनबीटी) - भीष्म साहनी

लिहावे नेटके (ज्योत्स्ना प्रकाशन) - माधुरी पुरंदरे
ओरिगामी (ज्योत्स्ना प्रकाशन) - रत्नाकर महाजन
सिनेमाचे दिवस पुन्हा (प्रकाशन नाही आठवत, बहुधा मौज) - विजय पाडळकर
प्राक्तनाचे संदर्भ (मौज प्रकाशन) - द. भा. धामणस्कर (वट्ट रुपये नऊ!!)
ही सगळी मौज + ज्योत्स्ना + बहुतेक रसिक यांच्या एकत्रित चिंचोळ्या स्टॉलवर मिळाली. तुडुंब गर्दी होती. पण माझी जड ब्याग पाहून मला ’ठेव इथेच ब्याग, नंतर घेऊन जा’ अशी ऑफर न मागता मिळाली.

बखर अंतकाळाची (मनोविकास प्रकाशन) - नंदा खरे
संमेलनाध्यक्षांची बरीचशी पुस्तकं यांची आहेत, त्यामुळे मनोविकासवाले सगळीभर झळकत होते. ’अंताजीची बखर’ लवकरच बाजारात येईल, ही खुशखबरही इथेच मिळाली.

निवडक कमल देसाई (लोकवाङ्मय गृह प्रकाशन)
निवडक राजन गवस (लोकवाङ्मय गृह प्रकाशन)
पिवळ्या छत्रीतली मुलगी (लोकवाङ्मय गृह प्रकाशन) - उदय प्रकाश / अनु. गणेश विसपुते

ही पाहून ठेवलेली, पण न केलेली खरेदी:

रियासतीचे खंड;
राजवाड्यांच्या समग्र साहित्याचे इतर खंड;
कमल देसाईंची रंग आणि रंग-२;
सतीश तांब्यांची - रसातळाला खपच, माझी लाडकी पूतनामावशी आणि राज्य होतं राणीचं;
नंदा खरेंचं नांगरल्याविण भुई,

ही पुस्तकं आता मिळतच नाहीत. कुणाला मिळाली, तर मला कळवा प्लीज:
साधूंचं सिंहासन (ग्रंथालीच्या स्टॉलवर ’आवृत्ती संपली’ इतकंच उत्तर! कधी छापणार, ते काही ठाऊक नाही);
अंबिका सरकारांचं एका श्वासाचं अंतर

काही क्षणचित्रं:
http://www.facebook.com/photo.php?pid=1953928&id=1412111211#!/album.php?aid=2103112&id=1412111211