भाषा
मराठी
आवृत्ती
४ थी १९९९
किंमत
150.00
पृष्ठसंख्या
279

ठोसरांचा एक हुड पोर, लग्नाच्या मंडपातुन 'सावधान' ऐकुन जो धुम ठोकतो तो थेट नाशिक ला येतो, आपल्या आराध्य देवाला भेटायला, घोर तपसाधना करतो, ज्ञान आणि विरक्ति ह्यांचे मुर्तीमंत रुप बनतो. देशाटन करुन जनांचे हाल पहातो, उद्वीग्न होऊन पुन्हा ह्या मरहाठीचीये देशी परततो. रामाचा दास होतो, दासाला झालेला बोध, दास होऊन लोकांस करतो, मने निराशलेल्या जनांस मनाचे श्लोक सांगुन उभारी आणतो. एवढेच काय तर स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात सुद्धा बहुमोल सहकार्य देतो. आणि हे सर्व करतो ते जना पासुन दुर राहुन... 'दास डोंगरी रहातो..'

गो. नी. दां. च्या लेखणीतुन प्रसवलेली आणखी एक उत्तम कलाकृती. वाचकाने वाचायला सुरुवात केल्याबरोबर त्याचे बोट पकडुन त्याला त्या कादंबरीच्या काळात घेऊन जाणे हा तर गो. नी. मोठा वकुब. संत रामदासांचा काळ, त्यावेळचे लोकजीवन, बोलीभाषा, ह्यांचा सुरेख आणि सहज वापर ह्या कादंबरी आहे.. नारायणचे पळुन जाणे, त्यांचे नाशकातले आगमन, उग्र साधना, ज्ञानप्राप्ती, देशाटन, लोक प्रबोधन, राष्ट्रकार्यास सहभाग आणि शेवटी शिवराज्याभिषेकाने होणारी हिदुपद्पातशाहिची स्थापना हा कादंबरीचा प्रवास आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी की रामदासांची साधना लिहिताना गो नी. बहार आणतात. त्यातला मनाच्या एकाग्रतेचा प्रसंग खुप सुंदर आहे...