गॉन विथ द विंड

Non sum qualis eram bonae sub regno Cynarae
Last night, ah, yesternight, betwixt her lips and mine
There fell thy shadow, Cynara! thy breath was shed
Upon my soul between the kisses and the wine;
And I was desolate and sick of an old passion,
Yea, I was desolate and bowed my head:
I have been faithful to thee, Cynara! in my fashion.
All night upon mine heart I felt her warm heart beat,
Night-long within mine arms in love and sleep she lay;
Surely the kisses of her bought red mouth were sweet;
But I was desolate and sick of an old passion,
When I awoke and found the dawn was gray:
I have been faithful to thee, Cynara! in my fashion.
I have forgot much, Cynara! gone with the wind,
Flung roses, roses riotously with the throng,
Dancing, to put thy pale, lost lilies out of mind;
But I was desolate and sick of an old passion,
Yea, all the time, because the dance was long:
I have been faithful to thee, Cynara! in my fashion.
I cried for madder music and for stronger wine,
But when the feast is finished and the lamps expire,
Then falls thy shadow, Cynara! the night is thine;
And I am desolate and sick of an old passion,
Yea, hungry for thelips of my desire:
I have been faithful to thee Cynara! in my fashion

एर्नेस्ट डॉसनच्या ह्या कवितेतल्या ओळीवरून एका जगप्रसिद्ध कादंबरीला नाव मिळाले. नाव होते 'गॉन विथ द विंड'. मार्गारेट मिशेल ह्यांची हि नितांतसुंदर कादंबरी. हि वाचली नसेल असा वाचक मिळणे अवघडच. गॉन विथ द विंड मध्ये आपल्यासमोर येतो तो स्कार्लेट ओ हारा ह्या शोडष वर्षीय तरुणीचा अवखळ तारुण्यापासून ते एका जबाबदार स्त्री बनण्या पर्यंतचा प्रवास. तो इतक्या वेधक पद्धतीने रंगवला आहे की क्या केहने.

मागच्या आठवड्यात गॉन विथ द विंड जालावर हाती लागले आणि वाचायला सुरुवात केली. गंमत म्हणजे २/३ दिवसांनी अचानक लायब्ररी मध्ये वर्षा गजेंद्रगडकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद देखील त्याच्याच जोडीने हाताला लागला आणि नुसती धमाल उडून गेली. कॅफेत जमेल झेपेल तेवढे इंग्रजी वाचन आणि घरी गेले की मराठी अनुवादाचा फडशा असा नित्यक्रमच ठरून गेला. ट्वायलाईट नंतर खऱ्या अर्थाने झपाटला गेलो ते ह्या गॉन विथ द विंड मुळे.

अमेरिकेतील १८६१ चे यादवी युद्ध आणि त्यानंतरचे पुनर्निर्माण ह्याची पार्श्वभूमी घेऊन स्कार्लेट ओ हारा आपल्या समोर येते. जॉर्जियाच्या प्रदेशात राहणारी, स्वप्नांच्या दुनियेत वावरणारी, 'तारा' सारख्या एका मोठ्या बंगाल्यात वाढलेली आणि पावला पावलावर कामासाठी नोकरांची फौज असलेली स्कार्लेट ओ हारा आपल्याला त्या परगण्याची राजकन्या समजत नसेल तर नवलच. त्यातही तिला आपल्या सौंदर्याची पुरती जाणीव आहे आणि पुरुषांना कसे आकर्षीत करावे ह्याचे तंत्रही अवगत आहे.

सर्वच पुरुष आपल्या भोवती रुंजी घालत राहावेत ह्यासाठी कायमच प्रयत्न करणारी स्कार्लेट मनोमन मात्र अॅशले वर प्रेम करत असते. मात्र हाच अॅशले जेव्हा त्याची लांबची बहीण मेलेनाशी विवाहबद्ध होत आहे हे स्कार्लेटला कळते तेव्हा तिच्यावर आकाशच कोसळते. अॅशलेचा विवाह घोषित होणार असतो त्या पार्टीत हरतऱ्हेने प्रयत्न करून शेवटी एकदाची स्कार्लेट अॅशलेला लायब्ररीमध्ये एकटा गाठतेच आणि आपल्या मनातल्या भावना उघड करते. अॅशले मात्र मेलेना विषयी ठाम असतो. रागारागाने स्कार्लेट त्याला एक थप्पड लावून देत. मात्र त्यावर कुठलीही रागीट प्रतिक्रिया व्यक्त न करता अॅशले सन्मानाने तिचा निरोप घेतो. ह्या सगळ्या घटनेला कोणी एक साक्षीदार आहे हे जेव्हा स्कार्लेटला कळते तेव्हा तिला धक्काच बसतो. आणि ह्या साक्षीदाराच्या रूपाने ऱ्हेट बटलरचा स्कार्लेटच्या आयुष्यात प्रवेश होतो.

लवकरच युद्धाची घोषणा होते. अॅशलेकडून मिळालेल्या वागणुकीने रागाने धुमसत असलेली स्कार्लेट निव्वळ अॅशलेचा बदला म्हणून मेलेनाच्या भावाशी लग्न करायचा त्याच्याकडून आलेला प्रस्ताव स्वीकारते आणि अॅशलेच्या लग्नाचा आधीच चार्लसशी विवाहबद्ध होते. युद्धात पराक्रम गाजवण्याची फार इच्छा असलेला चार्लस नेमका युद्धाच्या आधीच मरण पावतो, त्याचवेळी इकडे स्कार्लेट गर्भवती राहते. आता मात्र फुलपाखरासारखे स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या स्कार्लेटच्या वाटेला येते ते एका तरुण विधवेचे आयुष्य. ज्यात रंगीत कपड्यांना, हसण्या खेळण्याला, येवढेच काय तर तरुण माणसाशी बोलायला देखील परवानगी नसते.

दु:खाने आणि खरे तर बंधनांनी स्कार्लेट पूर्णं पिचून जाते. तिच्या ढासळत्या प्रकृतीची सगळ्यांनाच चिंता वाटू लागते. अशातच मेलेनी कडून स्कार्लेटला आपल्याबरोबर अॅटलांटाला राहायचे बोलावणे येते. हवापालट होईल आणि एक नवीन हसत्या खेळत्या शहरात प्रवेश होईल असा विचार करून पण खरे तर मेलेनेचा दुःस्वास मनात कायम ठेवून स्कार्लेट अॅटलांतात प्रवेश करते. पहिल्या दर्शनातच ती अॅटलांटाच्या प्रेमात पडते खरी मात्र लवकरच तिला जखमी लोकांच्या मदतीसाठी आणि हॉस्पिटलातील इतर कामांसाठी स्वतःला वाहून घ्यावे लागते. अनिच्छेने हे सर्व करत असलेल्या आणि अजून दु:खी झालेल्या स्कार्लेटच्या आयुष्यात इथे पुन्हा एकदा उमद्या ऱ्हेट बटलरचा प्रवेश होतो आणि तिच्या आयुष्याला वेगळेच वळण लागायला सुरुवात होते.

एकीकडे मेलेनाबद्दल वाटणारा प्रचंड दुःस्वास आणि त्याच्या विरुद्धा मेलेनाकडून मात्र तिला मिळणारी अतिशय प्रेमळ वागणूक ह्यात सापडलेली मेलेना तेव्हा पूर्णं खचून जाते जेव्हा अॅशले युद्धात हरवल्याची बातमी येते. त्यातच शहरावर हल्ला होण्याची लक्षणे होतात आणि लोक सुरक्षित ठिकाणी धाव घेतात. मात्र अॅशलेचा वंश पोटात वाढत असलेली मेलेना प्रकृतीमुळे कुठेच जाऊ शकत नसते. 'मी मेलेनाची कायम काळजी घेईन' असे अॅशलेला ख्रिसमसच्या सुट्टीत त्याची भेट झाल्यावर दिलेले वचन स्कार्लेट मोडू शकत नाही, आणि संताप, राग, हतबद्धता अशा भावनांच्या कल्लोळात मेलेनाच्या साथीला थांबते.

पुढे शहरावर हल्ला सुरू होतो, त्यातच मेलेनाला कळा येऊ लागतात. जखमींच्या वाढलेल्या संख्येला शहरात जागा पुरत नसताना मेलेनाला डॉक्टर तरी कुठून मिळणार? सर्वच प्रयत्न थकल्यावर शेवटी छोट्या निग्रो मोलकरणीच्या मदतीने स्कार्लेटच सगळे काही निभावून नेते. त्या प्रसंगात तिचे भावनिक वर्णन अतिशय सुरेख आणि वाचनीय. केवळ मेलेनामुळे आपली घरी जायची, आईच्या कुशीत शिरायची इच्छा दाबून असलेली स्कार्लेट आता मात्र घरी परतायचा चंग बांधते. आई, वडील, तारा ह्यांची काळजी तसाही तिचा पाठलाग बरेच दिवस करतच असते. शेवटी ऱ्हेट बटलरच्या मदतीने ती शरातून सुखरूप बाहेर पडून घरच्या रस्त्याला लागते. मात्र अर्ध्या रस्त्यातच असा काही वाद घडतो की ऱ्हेट तिला वाटेतच सोडून निघून जातो. पुढचा सर्व प्रवास एका मरतुकड्या घोड्याच्या गाडीला आणि मेलेना आणि तिच्या नवजात बाळाला घेऊन स्कार्लेट मोठ्या हिमतीने पूर्णं करते. एकदाची सुखरूप घरी पोचलेल्या स्कार्लेट समोर एक वेगळेच दु:ख आ वासून बसलेले असते. आजारपणामुळे आईचा मृत्यू झालेला असतो तर आईच्या मृत्यूने वडील भ्रमिष्ट झालेले असतात. दोन्ही लहान बहिणी अजूनही अंथरुणाला खिळलेल्या असतात. नोकरांची फौज बाळगणाऱ्या त्या घरात आता उरेपुरे ३ नोकर शिल्लक असतात आणि खाण्यापिण्याचे प्रचंड हाल असतात.

ह्यासर्वातून स्कार्लेट कसा मार्ग काढते? पुढे तिच्या आयुष्यात काय स्थित्यंतरे येतात हे मुळापासूनच वाचण्याजोगे. मार्गारेट मिशेल ह्यांनी ह्या कादंबरीतील प्रत्येक पात्राला अगदी लहानात लहान पात्राला देखील योग्य न्याय दिला आहे. मग ते पात्र स्कार्लेट ओ हारा असो अथवा मेलेनाची पिटी आत्या किंवा अगदी थोड्या ओळींपुरता समोर येणारा चार्लस. प्रत्येक पात्र ठसठशीत आणि आपले छाप सोडून जाणारे. आपापला राग, लोभ, प्रेम ह्या भावना घेऊन वावरणारे. हि कादंबरी वाचताना आपण स्कार्लेटमध्ये कधी गुंतून जातो ते आपल्यालाच कळत नाही. खरे सांगायचे तर स्कार्लेटच्या आयुष्यात घडलेल्या कुठल्यांना कुठल्या घटनेशी आपल्या आयुष्याचा संबंध न कळत लागून जातोच. माग ते तिचे स्वार्थीपण असो, तिने केलेला द्वेष असो वा सर्व काही विसरून तिने केलेला नाच असो. कुंठेना कुठे स्कार्लेट ओ हारा आपल्याला जोडली जातेच.