देवस्वरुपा कामधेनू : वैज्ञानिक महत्त्व

गायीचे वैज्ञानिक महत्त्व अपार आहे म्हणूनच तिला आपल्या ऋषी मुनीनी देवतेचे स्थान दिले आहे किंबहुना तिच्या शरीरात सर्व देवतांचा निवास असल्याचे सांगितले आहे. परंतु आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नचिकेत प्रकाशनाने देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रा. विजय यंगलवार यांनी केले परिश्रमपूर्वक त्यांचे संकलन संपादन आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्‌वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे
धार्मिक, आर्थिक, आणि वैज्ञानिक अर्थाने या संपूर्ण परमेश्र्वरी सृष्टिमध्ये गाईचे स्थान सर्वोपरी आहे, विशेषत: भारतासारख्या कृषीप्रधान देशाला याचे विस्मरण होता कामा नये.
"सर्वदेवमये देवि सर्व दैवेरलंकृते। मातर्ममाभिलषितं सफलं कूरू नंदिनी।। "
असे सार्थ विवेचन प्राचीन शास्त्रमर्मज्ञांनी केले आहे. श्रीमती गौ शास्त्रदृष्ट्या पशू नव्हे. शास्त्राचेच एक वचन आहे "तिलं न धान्यं-पशवो न गाव:" म्हणून तिला पशू कृपया संबोधू नये. साक्षात्‌ परमात्मा श्रीकृष्णाने आपल्या आचरणाने गोपालन आणि गोसंरक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे, केवळ गाईच्या स्पर्शानेही अनेक रोग बरे होतात अशा अनेक वैज्ञानिक माहितीने हे पुस्तक परिपूर्ण आहे.

भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २०१०
किंमत
125.00
पृष्ठसंख्या
136