औषधोपचाराबरोबरच शेतीच्या उपयोगितेची माहिती देणारे
पंचगव्य औषधोपचार
प्रा. विजय यंगलवार यांनी संपादित व शब्दांकित केलेले पंचगव्य औषधोपचार या सर्वांग सुंदर, माहितीपूर्ण पुस्तकामध्ये पंचगव्याविषयी माहिती अक्षरश: ठासून भरलेली आहे. औषधोपचाराबरोबरच पंचगव्याच्या शेतीसाठीच्या उपयोगितेबद्दलही भरपूर माहिती आहे.
पुस्तक एकंदर सात प्रकरणे व तीन परिशिष्टात विभागले आहे. पहिल्याच गोषडंग व पंचगव्य या प्रकरणाची सुरूवात गोमातेच्या गुणवर्णनापासून झाली आहे. दुसरे प्रकरण पंचगव्य आणि आयुर्वेद चिकित्सा असे आहे.
तिसर्या प्रकरणामध्ये गोदूध आणि आयुर्वेद चिकित्सा यांचा उहापोह लेखकाने केला आहे. चौथ्या प्रकरणाचे नाव आहे. गोदही. गोतूप आयुर्वेद चिकित्सा असे पाचव्या प्रकरणाचे नाव आहे. सहावे प्रकरण गोमुत्रावर आहे.
सातवे व शेवटचे प्रकरण गोशेण आणि आयुर्वेद असे आहे शेवटली तीन परिशिष्टेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यावरून लेखकाचा व्यासंग लक्षात येतो. व्यक्ती आणि संस्था या सर्वांना सारखेच उपयुक्त हे पुस्तक आहे.
भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २०१०
किंमत
80.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
80