श्रीगणेश लेखमाला २०२१ - पोपटांच्या दुनियेत

By सर्वसाक्षी, 16 September, 2021

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

"पोपटांच्या दुनियेत"

पक्षी सर्वांनाच आवडतात. अर्थात मला ते मोकळे व स्वच्छंद जीवन जगताना पाहायला आवडतात. आकाशाला गवसणी घालणार्‍या पक्ष्यांना पिंजरारुपी तुरुंगात डांबून ठेवणे मला आवडत नाही.

आमच्या परिसरात सर्वत्र सर्रास आढळणार्‍या कावळे, चिमण्या, कबुतरे, साळुंक्या या पक्ष्यांव्यतिरिक्त अन्य २०-२२ प्रकारचे पक्षी जा ये करुन असतात, राहतात. मात्र बहुतेक सर्व पक्षी खूप सावध व बुजरे असातात, ते आपल्या घरात वा गजबजत्या परिसरात येत नाहीत. खंड्या, हळद्या, तांबट, वेडा राघू , मुनिया वगैरे अनेक पक्षी असपासच्या झाडांवर असतात पण ते सहसा खुल्यावर न येता दाट झाडीत, झाडाच्या पर्णराजीत येतात, अनेकदा उंच तारांवरही येतात.

या मानाने पोपट बरेच धीट. ते सावधपणे वावरतात पण बिनदिक्कत घरात वा घराच्या बाल्कनीत येतात, बाहेर लटकणार्‍या केबलवर बसतात. एकदा सरावले की रोज येऊ लागतात. आमच्या परिसरात आणि सहवासात येणारे आनंददायी पोपट हा नुसता लिहिण्याचा विषय नाही. या पोपटांचा वावर, करामती, गमतीजमती शब्दात सांगण्यापेक्षा मी दृकश्राव्य माध्यमातुन सादर करण्याचा प्रयत्न आहे.

पोपटांच्या नाना छबी आणि छोट्या चित्रफिती माझ्या निवेदनासह येथे देत आहे, माझी खात्री आहे, हे पोपट तुमचे मनोरंजन करतील.

-सर्वसाक्षी