हरि नारायण आपटे
(८ मार्च १८६४ -३ मार्च १९१९)

मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार, जन्म जळगाव जिल्हयातील पारोळे या गावी. शिक्षण मुंबई व पुणे येथे. शालेय जीवनातच त्यांचे इंग्रजी व संस्कृत साहित्यांचे विपुल वाचन झाले होते. कालिदास आणि भवमृती हयांच्या श्रेष्ठत्वासंबंधी केसरीतून चाललेल्या वादात कालिदासाच्या बाजूने त्यांनी लिहिलेले एक मार्मिक पत्र आणि आगरकरांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेटवरुन रचिलेल्या विकारविलसितावरील त्यांची अभ्यासपूर्ण टिका हया दृष्टीने लक्षणीय आहेत. गणित कच्चे असल्यामुळे महाविद्यालयाच्या पहिल्याच परिक्षेत त्यांना अपयश आले आणि उच्च शिक्षणाचा विचार त्यांनी सोडून दिला. लेखन-वाचना खेरीज अन्य व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांच्या चुलत्यांनी स्थापिलेल्या 'आनंदाश्रम' हया संस्थेचे व्यवस्थापकपद मात्र त्यांनी आमरण सांभाळले, जुन्या संस्कृत पोथ्यांचा संग्रह करुन त्या प्रसिध्द करणे हे या संस्थेचे कार्य होते. मधली स्थिति (१८८८) ही त्यांची पहिली कादंबरी सामाजिक आहे. रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन हया कादंबरीच्या धर्तीवर ती रचिलेली आहे. हया कादंबरीखेरीज त्यांनी इतर नऊ सामाजिक कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतील काही पुस्तकरुपाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिध्द झाल्या.

जन्म - ८ मार्च १९६४
मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार, २१ कादंबर्‍यांचे लेखन
पहिली कादंबरी - पहिली स्थिती
ऐतिहासीक कादंबर्‍यां - उषःकाल, गड आला पण सिंह गेला, सुर्योदय, वज्राघात, रूपनगरची राजकन्या,
सामाजिक कादंबर्‍यां - मी,पण लक्षात कोण घेतो, यशवंतराव खरे, कर्मयोग, आजच.
महाराष्ट्र्राचे 'सर वॉल्टर स्कॉक' म्हटले जाते.
शिक्षण बि.ए. अपूर्ण परंतू मुंबई विद्यापीठाने त्यांना एम.म.चे परिक्षक म्हणून नेमले.
नुतन मराठी विद्यालयात शिक्षकाचे काम
'करमणूक' साप्तायिक २८ वर्षे चालविले.
मृत्यु - ३ मार्च १९१९