काल झालेला भारत पाक सामना म्हणजे खरोखरच एक लक्षात राहील असा सामना झाला. पुन्हा एकदा शारजा मध्ये ज्या सिरीज व्हायच्या त्या आठवणी जाग्या झाल्या. भारत पाक सामना म्हणजे खरच एक कट्टर लढत असते मैदानावरची. पण कालच्या सामन्याचा खरा हिरो ठरला तो उपकर्णधार म्हणून ज्याच्या गळ्यात माळ पडली तो विराट कोहली. विराट बद्दल काय बोलणार हो त्याने त्याचा क्लास केव्हाच सिद्ध केलाय. पठ्ठ्याने जो अंडर नाईंटीन विश्वकप जिंकून जो मानाचा तुरा खोवलाय त्यावरुनच तो कीती महान खेळाडू आहे हे दिसून आलेच आहे.
त्यानंतर त्याची भारतीय संघात झालेली निवड जी काही त्याने सार्थ करून दाखवली आहे ती खरच वाखाणण्याजोगीच आहे.
खरच त्याचं भविष्य उज्वल आहे. खरोखरीच भारतीय संघाला जो नवा हिरा सापडला आहे तो खुपच महान आहे. एका खेळाडुकडे खेळाडु म्हणून जे काही हवे असते ते सारे ह्या पट्ठ्याने खुप कमी वयात कमावले आहे. अॅग्रेसिव्ह, हुशार, प्रसंगी सावध, बचावात्मक पवित्रा घेउन संयमाने खेळी करण्यात तर त्याचा हातखंडाच आहे. असो अजून काय बोलू.
एकच म्हणेन,
@@@@ विराट विजय @@@@
विराट तुस्सी ग्रेट हो..........