भाषा
मराठी
किंमत
100.00
पृष्ठसंख्या
190

या पुस्तकातील लेख निरनिराळ्या मासिकांतून यापूर्वी आलेले आहेत. त्यांची पाने जमवून संग्रह केलेला आहे. यातील एका लेखाचा दुसर्‍याशी संबंध नाही. निरनिराळ्या जातीगोतींची, मतांची मंडळी एका चाळीत रहावी तसे हे लेख आता एकत्र रहायला आलेले आहेत. त्यांचे एकमेकांशी जमले तर ठीक. नाही जमले तर शिशिरात झाडांची पाने पटापटा गळून जातात व नामशेष होतात, तशी ही पाने देखील नामशेष होतील. ह्या पुस्तकाचे भवितव्य आता प्रिय वाचक आणि त्यांच्या घरातले बालबच्चे ह्यांच्या हाती आहे. त्यांनी त्याचा यथायोग्य आदर करावा.