रारंग ढांग

‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’तर्फे अत्यंत अवघड अशा उंचसखल, डोंगराळ भागात रस्ते बांधणीचे काम केले जाते.
हे काम लष्कराच्या नियंत्रणाखाली होते. पेंढारकरांनी या विषयावर माहितीपट तयार करण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती. त्यादरम्यान आलेले अनुभव त्यांनी 'रारंगढांग' या कादंबरीमधून मांडले. एका बाजूला हिमालय, लहरी निसर्ग आणि दुसऱ्या बाजूला तेवढीच लहरी, जिद्दी, धाडसी माणसे, माणसांचा निसर्गाशी संघर्ष सुरू असतो तेव्हाच ती एकमेकांशीही लढत असतात. चाकोरीबद्ध कादंबरीच्या स्वरूपाला तडा देणारी, सामान्यत: अपरिचित अशा लष्करी वातावरणाचे, वृत्ती वाचकांसमोर मांडणारी अशी ही कादंबरी आहे. कादंबरीतले पात्रे जसे, 'लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे', ' कॅप्टन मिनू खंबाटा' मराठी वाचकांच्या मनावर गारूड बनून राहिली आहेत. १९८१ साली ‘रारंग ढांग’ची पहिली आवृत्ती आली त्यानंतर सातत्याने तिच्या आवृत्त्या प्रकाशित होत राहिल्या.

भाषा
मराठी
किंमत
80.00
पृष्ठसंख्या
175