कुणाला याचं सोयरसुतक आहे कि नाही याची कल्पना नाही पण जागृती म्हणून हा धागा.
बांगलादेशची पिसं काढली हो या विंडीजकरांनी.
जरा हा धावफलक बघा म्हणजे लक्षात येईल.
अक्षरश: ५८ धावांत जीव घेतला त्यांचा. तेही फक्त १९ षटकामध्ये आणी पुन्हा वरून १२ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात जिंकले सुधा. बांगलादेशची फक्त २ मंडळी दोन आकडी धावा करू शकले.
हाच बांग्ला परवा आपल्यासंगे २८० धावा काढून बसला होता.
परवा आयर्लंडने इंग्रजांना धूळ चारली. आणि इंग्रजासोबत आपला सामना अनिर्णीत राहिला.
हॉलंड सुद्धा ३०० धावा बनवतोय.
या सर्वामध्ये भारत कमकुवत आहे असे वाटत नाही का? (विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीतून)
आपण जो विश्वास भारतीय संघावर ठेवतोय/दाखवतोय तो खरच योग्य आहे का?
का आपण मूर्ख आहोत? डोळे बंद ठेवून समर्थन देतोय. खेळाडू/संघ विश्वासार्ह आहेत का?
कुठले विभाग आहेत ज्यात संघ कमी पडत आहे?
कोणत्या बाबींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे?
हे आणि इतर बरेच प्रश्न सध्या घोंघावत आहेत.
एक साधी-सुधी चर्चा / आदानप्रदान झाले पाहिजे हाच उद्देश.