भाजप हा पक्ष उत्तरभारतातील राज्ये आणि महाराष्ट्र इथे मजबूत पकड ठेवून आहे. पण तितकी मजबूत पकड त्यांची दक्षिण भारतात नाही. अपवादात्मकरित्या तो एकदा कर्नाटकात आला होता. पण परत नाही. तमिळनाडू आणि केरळ इथे तर तो नगण्य आहे. कट्टर भाजपविरोधक म्हणतात की दक्षिण भारत हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उत्तरभारतापेक्षा बराच प्रगत आहे. आम्ही प्रगत आहोत म्हणूनच आम्ही दक्षिण भारतीय लोक भाजपला आमची दाक्षिणात्य राज्ये टाळतात. अन्यथा आमच्या राज्यांचीही अवस्था ही युपी बिहारसारखी मागासलेली होईल. उत्तरभारतातल्या लोकांना मागास राहणं चालत असेल. आम्ही शहाणे आहोत वगैरे. तिकडच्या सोशल मिडियावरही हेच सुरु असतं. आम्ही उत्तरभारतातल्यांसारखे धार्मिक अतिरेकाने पछाडलेले नाही आहोत. इकडे आम्ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन गुण्यागोविंदानेचराहतो. उत्तरेतला धार्मिक भेदभाव करणारा पक्ष आम्हाला नको वगैरे. आमची लोकसंख्या आटोक्यात आहे. इतकंच काय पण आम्ही भरलेल्या करांचा उपयोग उतरेतल्या मागास राज्यांना पोसण्यासाठी होतो आहे. जे स्वत:ची राज्ये समृध्द करु शकत नाहीत अशा पक्षाला आमची राज्ये आम्ही का द्यावीत? आमचे स्थानिक नेते पुरेसे सक्षम आहेत.
तर इथल्या राजकीय विश्लेषकांना विनंती की हेकाय प्रकरण आहे ते उलगडून सांगावं. भाजपला दक्षिणेतल्या राज्यांमधे मोठं यश का मिळत नाही?
Comments