आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा.
खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता .
रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा अँटी सोशल इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता
पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते
तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची. डॉक्टरांनी हे बरे होणार नाही, हे वाढतच जाणार असे म्हटले
एक संध्याकाळी, तिने त्याला त्याच्या दिवंगत वडिलांसारखं समजून “तो कधी येणार?” असं विचारलं, आणि रोहन सटकला.
“फार झाले हे . मला आता हे जमणार नाही,” तो म्हणाला, दाराकडे वळतच.
तिने वाद घातला नाही. फक्त मान हलवली, जणू हा क्षण तिला आधीपासूनच माहीत होता.
“ठीक आहे,” ती हळूच म्हणाली. “फक्त… जेवण विसरू नकोस.”
तो दुसऱ्या शहरात गेला. नोकरी, नवीन घर, नवीन आयुष्य — जिथे काहीच औषधांच्या वासासारखं नव्हतं, जुन्या आठवणींसारखं नव्हतं. लोकांना तो सांगायचा की ती आई वडील गेले आहेत. कोणी त्याला फार विचारत नव्हते
काही वर्षांनी एकच जुन्या मित्राबरोबर थोडा संपर्क होता , त्याचा फोन आला. ती शांतपणे हॉस्पिटलमध्ये गेली होती — कोणताही नाट्य नाही, शेवटचे शब्द नाहीत — फक्त मॉनिटरवरील एक सरळ रेषा.
रोहन परत आला, कारण कागदोपत्री काम होतं. तिच्या वस्तू एका छोट्या बॉक्समध्ये मावल्या: एक शाल, बंद पडलेलं घड्याळ, आणि जाड वैद्यकीय फाइल.
तो फाइल उघडणारच नव्हता.
आत एक संमतीपत्र होतं — अनेक वर्षांपूर्वीचं — तिच्या सहीसह, डॉक्टरांच्या सहीसह.
प्रायोगिक ब्रेन ट्रान्सप्लांट. मेंदूची अदलाबदली आणि त्यात त्याचे नाव होते अनेक कायदेशीर कागद आणि त्यावर आईच्या सह्या आणि वाचता वाचता त्याला कळले कि लहान असताना त्याच्या मेंदूला दुखापत झालेली आणि तो वेडा होणार हे नक्की होते
मुलाचे आजोबा ऑर्थोपेडिक सर्जन होते , गुढग्याचे ऑपरेशन करायचे पण ते बरेच उचापती होते , संशोधन करायचे . एकदा तर स्वतःच स्वतःचे पोटाचे ऑपरेशन त्यांनी केले होते.
त्यांनी पर्याय मांडला नातवाचे आणि सुनेच्या मेंदूची अदलाबदली करायची आणि सुनेला खोटे सांगितले कि तू कंट्रोल मध्ये राहशील आणि मुलगा ठीक होईल. आज ब्रेन ट्रान्सप्लांट सहजपणे छोट्या हॉस्पिटल मध्येही होतो पण त्यावेळी ती फारच मोठी गोष्ट होती .
पण मुलगा अति हुशार झाला पण सुनेचे वेड वाढत गेले. त्या धक्क्काने आधी रोहनचे आजोबा आणि मग वडील गेले
आईचे बलिदान पाहून रोहन धाय मोकलून रडायला लागला.
तो आयुष्यभर आता रडणार होता
Comments