भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २०१०
किंमत
100.00
पृष्ठसंख्या
96

वनस्पती विश्र्वाची आगळीवेगळी ओळख करून देणारे वनस्पतींची अद्‌भुत कार्यशैली
अनेकांच्या कुतुहलांचे समाधानात रूपांतर करणारे असे हे पुस्तक!
परंतु वनस्पतींबद्दल इतकी सखोल माहिती आणि तिही साध्या सरळ मराठी भाषेत आणि सचित्र, क्वचितच दिसेल.आपण झाड मेलं म्हणतो, म्हणजे ते सजीव आहे. जन्म, पोषण, वाढ, प्रजनन हे सर्व आलं. वनस्पती पाणी आणि खनिज यांचं शोषण कशा करतात? पाणी आणि खनिजांचे वनस्पतींच्या मुळांपासून पानांपर्यंत वहन म्हणजे रसारोहण. ते कसे होते? झाडं सूर्य प्रकाशाची मदत कशी घेतात?
सेंद्रिय कचर्‍यापासून पूर्ण पोषण मिळविणारी पण फुलझाडं असतात. स्वत: अन्ननिर्मिती करीत नाहीत, मांसाहारी वनस्पती! स्वत:च्या शरीरातील कमतरता कीटकं, अळ्या, प्राण्यांपासून मिळवितात. कशी मिळवितात?
जागा बदलल्यावर झाडं वाढतात किंवा मरतात. कधी झाडांची एकच फांदी सुकते, ती कां? अशा अनेक प्रश्नांचे सोपे समाधान यात आहे.
केवळ विद्यार्थीच नव्हेत तर शिक्षक, गृहस्थांसाठीही विशेषत: बाग (छोटीशी असेना कां) आवडणार्‍या प्रत्येक व्यक्तींसाठी हे पुस्तक आवश्यक आहे.
समर्पक मुखपृष्ठ आणि देखणी मांडणी यामुळे पुस्तकाच्या सौदर्यांत भर पडली आहे.