इतिहासाचा विश्र्वसनीय दस्तावेज सादर करून सडेतोड उत्तर देणारे
रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन
एखाद्याला पूर्वग्रह बाजूला ठेवून रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलनाची इत्यंभूत माहिती करून घ्यायची असेल तर, ज्येष्ठ पत्रकार श्री. दि.भा.घुमरे यांनी लिहिलेले ङ्करामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलनङ्ख हे पुुस्तक वाचलेच पाहिजे.
ते निव्वळ संशोधनावर व पुराव्यांवर आधारित नाही तर, वाचनीयही झाले आहे. सहसा हे तीन गुण एकाच पुस्तकात आढळत नाहीत. लेखकाने मराठी वाचकांच्या हाती एक विश्वसनीय दस्तावेजच सोपविला आहे.
या पुस्तकातील प्रकरणे बघितली तर, लेखकाने किती बारकाईने आणि तक्रारीला कुठूलाही वाव राहू नये, या दक्षतेने या पुस्तकात सर्व माहिती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, ते लक्षात येईल. जन्मभूमीचा पूर्वेतिहास, सोमनाथ जीर्णोद्धारानंतर...., अभूतपूर्व आंदोलन, उत्तरप्रदेशातील दहशत पर्व, कारसेवा संग्राम, उभयपक्षी पुरावा, बाबरीखालून मंदिराचे अवशेष, जय श्रीराम हो गया काम, रामजन्मभूमीचा निर्णायक पुरावा, प्रतिक्रिया, न्यायालयातील खटले, बाबरीखाली 10 व्या शतकातील मंदिर, काशी विश्वनाथ व श्रीकृष्ण जन्मभूमी ही या पुस्तकातील प्रकरणांची नावे आहेत.
रामजन्मभूमीसाठी झालेले संघर्ष, अयोध्येचा विष्णुहरि मंदिर शिलालेख, शिलालेखाचा अर्थ, सहभागी कारसेवक, सर्व आवाहने व्यर्थ इत्यादी परिशिष्टांमुळे वाचकांच्या ज्ञानात अधिकची मूल्यवान माहितीचीच भर पडते.
बाबरी खाली झालेल्या उत्खननातून जे मंदिराचे अवशेष मिळाले, त्यांची छायाचित्रे या पुस्तकात दिली आहेत. ती छायाचित्रे या आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहेत. उत्तम समर्पक मुखपृष्ठ, भरपूर छायाचित्रे आणि सुटसुटीत मांडणी यामुळे पुस्तकांची निर्मिती देखणी व आकर्षक झाली आहे.
भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २०१०
किंमत
150.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
160