भाषा
मराठी
आवृत्ती
पहिली १९५४
किंमत
95.00
प्रकाशक
पृष्ठसंख्या
136
विंदा करंदीकरांचा काव्य संग्रह. हे तुजला सांगू कसे सारख्या काव्यातून अगदी वैयक्तीक तर कधी ती जनता अमर आहे! सारख्या कवितेतून सामाजिक असणारे विंदांची कविता यात पाहायला मिळते. मला सर्वात आवडणारी कविता म्हणजे स्वप्नांमध्ये रचिल्या ओळी. शब्दांचे फक्त भारवाही असणे याची जाणीव करून देणारी ही कविता माझी आवडती आहे. विंदा शब्दांशी खेळतांना कधी यमकातून तर कधी मुक्तछंदातून फार काही अर्थगर्भ सांगून जातात. धोंड्या न्हावी सारख्या कवितेतले साधे शब्द असले तरी त्यातला भाव मनात एक एक पदर उलगडत जातो. जितका त्यांच्या काव्यावर विचार करावा तेव्हढे गहन अर्थवाही आहे असे मला वाटत जाते.
तर यातीलच यंत्रावतार ही विंदांची अत्यंत आवडती कविता माझी नावडती आहे.
आपला
गुंडोपंत