गो.ना. दातार यांच्यानंतर कित्येक वर्षे अत्भुतरस कादंबर्यांचा दुष्काळ पडला होता.
'मर्मभेद' या पहिल्या कादंबरीच्या निमित्ताने शशी भागवत यांच्या रुपाने मराठी साहित्याला एक चांगला अत्भुतरस निर्मिती करणारा कादंबरीकार मिळाला.
पु.ल.देशपांडे यांची प्रस्तावना लाभलेल्या 'मर्मभेद' या पहिल्याच कादंबरीला घवघवीत यश मिळाले.
शशी भागवतांनी वेगळ्या प्रकारची आणि चमत्कृतीजन्य अशी पुस्तके लिहिली.
रत्न-प्रतिमा, रक्त रेखा ही दोन पुस्तके आहेत. रक्तरेखा ही अप्रतिम भय कादंबरी आहे. अजब दुक्कल, वेडीचे रहस्य आणखि पण काही आहेत.
पुन:प्रहार पूर्ण झाले नाही व शशी भागवत आपल्याला सोडून गेले.