भाषा
मराठी
आवृत्ती
प्रथम - २००८
किंमत
175.00
पृष्ठसंख्या
160

समाजात होणार्‍या बदलांचे, स्थिततंराचे चित्रण कथांमधून पडतच असते. अशा चाळीस वर्षातील निवडक 15 कथा 30 जानेवारी नंतरमध्ये संकलित आहेत. या कथांमधून समाजमनाची भिन्न भिन्न स्पंदने वाचकांना जाणवतील. काळाच्या ओघात सार्‍या जीवनालाच बदलाचा वेग हादरवून गेला. त्याचे पडसाद या सर्व कथांमध्ये पडलेले आपल्याला ऐकू येतील. मानवी जीवन आणि त्यातील नात्यांची व्यामिश्रता यांचे चित्रण हे कोणत्याही कथेचे बलस्थान असते. या कथा समजणे म्हणजे एका परीने आपणच आपल्याला कळणे असते. प्रसिद्ध ललित लेखक कथाकार श्री. वसंत चिंचाळकर यांच्या तलम भाषेतून या भावपूर्ण कथा उत्तम उतरल्या आहेत.