हुश्श... धावती भेट आटोपली पुण्याची, आता येथे आलो तेव्हा दिसले की भाग - ३ देखील दुसर्या पानावर गेला आहे तेव्हा भाग -४ सुरु करतो आहे.
धावत्या भेटीतही मला पुण्याच्या अक्षरधारा प्रदर्शनास भेट देता आली व काही पुस्तके घेऊ शकलो.
वेळेअभावी पुविच्या एक अपवाद वगळता कोणत्याच मित्र मैत्रीणींना भेटणे शक्य झाले नाही याबद्दल क्षमस्व.
अर्थात वेळेअभावी मनासारखी सगळी खरेदी नाही करता आली. पण काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी खरेदी झाली हे महत्त्वाचे. कविताजींबरोबर फेसबुकावर एका चर्चेमुळे 'पाडस'ला उजाळा मिळाला होता आणि हे सुंदर पुस्तक संग्रहात ठेवायचे राहिले होते. हे पुस्तक अक्षरधाराच्या प्रदर्शनात पाय ठेवल्याबरोबर गटवले :)
माझी खरेदी :
पाडस - मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या 'द इयरलिंग' चा अनुवाद - अनु: राम पटवर्धन
अकरा कोटी गॅलन पाणी / स्टडफार्म - अनिल बर्वे
डोंगर म्हातारा झाला - अनिल बर्वे (अकरा कोटी गॅलन... बरोबर फुकट मिळाले)
असूरवेद - संजय सोनवणी (पेपरबॅक प्रत रु.९५ फक्त )
प्राक्तन - सुहास शिरवळकर (पेपरबॅक प्रत रु.६० फक्त )
नाईट - एली वायझल - अनु: आशा कर्दळे (पेपरबॅक प्रत रु.५० फक्त )
रसिक साहित्यमधून
सॉरी सर - सुहास शिरवळकर
मरणोत्तर - सुहास शिरवळकर
एम टी आयवा मारु - अनंत सामंत
बुकगंगा.कॉम वरुन
संधिकाल - फ्रिजॉफ काप्रा यांच्या द टर्निंग पॉईंट चा स्वैर अनुवाद - अनु: माधवराव घोरपडे
आणि अक्षरधारा प्रदर्शनात भेटलेल्या एका खास मैत्रिणीकडून भेटीदाखल मिळालेले
भोवरा - इरावती कर्वे
वा, उत्तम निवड. 'अकरा कोटी
वा, उत्तम निवड. 'अकरा कोटी गॅलन पाणी'बद्दलचे मत ऐकण्यास उत्सुक आहे. नाईट इंग्रजीतून वाचलं आहे - काहीसा परिचित घटनाक्रम असूनही अंगावर येणारा अनुभव.
या आठवड्यात घेतलेली पुस्तकं
१. द कलर पर्पल - अॅलिस वॉकर
या पुस्तकावर आधारित संगीतिका नुकतीच पाहिली. त्याआधी चित्रपटही पाहिला होता, परंतु गूगल बुक्सवर जितकी पानं वाचता आली, त्यावरून पुस्तक आणि त्याचा फॉर्म सर्वात अधिक परिणामकारक वाटलं, म्हणून ते मागवलं.
२. द गँगस्टर वी आर लूकिंग फॉर - lê thi diem thúy
येथील स्थानिक पब्लिक रेडिओ चॅनेल (एन पी आरशी संलग्न असणारे)आणि सार्वजनिक ग्रंथालय दरवर्षी तज्ञांची, श्रोत्यांची आणि वाचकांची मतं लक्षात घेऊन एक पुस्तक निवडतात. त्या वर्षात मग त्या निवडलेल्या पुस्तकाच्या लेखकाशी प्रत्यक्ष गप्पा, रेडिओ चॅनलवर मुलाखत, लेखकातर्फे काही भागाचं जाहीर वाचन, आपापल्या भागात जमून लहान गटांत त्या पुस्तकाब्द्दल चर्चा इ. उपक्रम चालतात. नवीन प्रकाशित झालेल्या हजारो पुस्तकांतून कुठली वाचायची हे ठरवण्याच्या अनेक मार्गांपैकी (बुकर/पुलिट्झर पारितोषिकासाठी निवडल्या गेलेल्या पुस्तकांची यादी, ओप्रा विन्फ्रे किंवा न्यू यॉर्क टाईम्सच्या सुचवण्या) हा एक मार्ग. या पुस्तकाचा विषय (व्हिएतनाम सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागलेल्या कुटुंबाची एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून कहाणी) फार वेगळा नसला, तरी स्थानिक संदर्भातला आणि रोचक वाटला; म्हणून पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे.
३. द अर्ली वर्क्स ऑफ अॅगाथा ख्रिस्ती
४. अ टेल ऑफ टू सिटीज् (हे ख्रिसमसच्या सुट्टीत निवांत वाचण्यासाठी :))
मराठीत काही दिवाळी अंक आणि त्यासोबत मिळालेलं अवचटांचं 'पुण्याची अपूर्वाई'. मौजेतल्या दोन-तीन लेखांनी निराशा केली. 'पुण्याच्या अपूर्वाई'तले काही लेख आधी वाचलेले होते, पण पुनर्वाचनातही कंटाळा आला नाही. ते लेख आणि त्यांचा मौजेतला लेख यात बराच दर्जात्मक फरक जाणवला.
In reply to वा, उत्तम निवड. 'अकरा कोटी by नंदन
'अकरा कोटी गॅलन पाणी' बद्दल
नंदन,
सुदैवाने वाचून झाले असल्याने मत देऊ शकतोय :)
छोटेखानी असली तरी सुंदरच कथा आहे अकरा कोटी गॅलन पाणी
या पुस्तकात असलेली स्टडफार्म ही दुसरी कथा अजून वाचलेली नाहिये.
'अकरा कोटी गॅलन पाणी' मला एका प्रवासात थोडा वेळ मिळाला तेव्हाच वाचून काढली. कोणतेही पुस्तक मी शक्यतो दोन वेगळ्या दृष्टीकोनातून वाचतो, एक म्हणजे पूर्णपणे भावनिकदृष्ट्या पुस्तकाशी समरस होऊन आणि दुसरे थोडे चिकित्सक पद्धतीने (ते ही खटकणार्या गोष्टी शोधण्यासाठी, यालाच समिक्षा म्हणतात काय ;) )
माझे पहिले वाचन शक्यतो भावनिकदृष्ट्याच होते. त्यामुळे पुस्तकातील खटकलेल्या गोष्टी आताच नाही सांगता येणार. पण एकूणच कथानक ओघवते आणि मनाचा ठाव घेणारे आहे. वेगवेगळ्या व्यक्तीरेखा छोट्याशा शब्दांत पण समर्पकरित्या मनाचा ठाव घेतात. खाणतज्ज्ञ वृद्ध स्वामी शैतानी खदानापासून लोकांचा जीव वाचावा म्हणून बरेच प्रयत्न करतो. तरीदेखील मंत्रालयाच्या शिपायापासून ते मिडिया पर्यंत सर्वचजण एका सामाजिक प्रतिष्ठा(?) लाभलेल्या जमनादास मेहतांच्या विरोधात सगळ्या गोष्टी असूनही पैशाच्या जोरावर खोटी गोष्ट सर्वसामान्य लोकांसमोर सत्य म्हणून कशी आणली जाते याचे सुरेख चित्रण 'अकरा कोटी गॅलन पाणी' मध्ये आहे. दिसते तसे नसते ही म्हण हे पुस्तक वाचून अगदी प्रत्ययास येते. अथक परिश्रमानेही वृद्ध स्वामी अकरा कोटी गॅलन पाण्याचा नरसंहार थोपवू शकत नाही. आणि शेवटी इमाने इतबारे सर्व आयुष्य ज्या जमनादास मेहतांसाठी वेचले त्या स्वामीलाच शैतानी खदानाचे चुकीचे नकाशे पुरवल्यामुळे या अपघाताला जबाबदार धरले जाते. कोळशाची खाण ही सोने देते पण खाणविश्वातील टांगत्या तलवारीसारख्या अशा अपघातांना या सुंदर पुस्तकाने वाचा फोडली आहे. याबद्दल अनिल बर्वे हे कौतुकास पात्र आहेत.
अवांतरः नंदन तू घेतलेल्या पुस्तकांबद्दल ऐकलेले नाहिये. बहुतेक जास्त इंग्रजी पुस्तके न वाचण्याच्या माझ्या सवयीमुळे असेल. पण ही पुस्तके माझ्या निशाण्यावर ठेवली आहेत. सवडीने पाहीनच ही पुस्तके.
अतिअवांतरः 'पाडस' मय होण्याचा विचार आहे सध्या. पण नातिचरामि देखील मोहिनी घालते आहे ;)
अकरा कोटी
अकरा कोटी वाचून बरीच वर्षे झाली त्यामुळे नीट तपशील आठवत नाहीत पण वाचल्यावर आवडले होते. एका मित्राने 'काला पत्थर' या पुस्तकावर बेतला आहे असे सांगितले होते. बहुधा खरे असावे कारण बरीच साम्ये आहेत.
अनिल बर्वे...!
@ सागर ~ चांगलीच खरेदी झाल्येली दिसते. अनिल बर्वे तुम्हाला नक्कीच भावतील...विविध चळवळीशी प्रत्यक्ष सहभागाचे नाते असल्याने अनिल बर्वे यांच्या एकुणच लिखाणाला जी वास्तवतेची दाहकता आहे तिचे प्रत्यंतर त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत जाणवते. नक्षलवादी चळवळीचा आणि त्यामुळे राज्यात ढवळून गेलेल्या राजकीय परिस्थितीचा एक पत्रकार या नात्याने त्यांनी हेरलेली परिस्थीती त्यांच्या लेखणात (कादंबरीतच नव्हे तर नाट्यलेखनातदेखील...) उठून दिसते. तुम्ही घेतलेल्या कादंबरीवर तर वर तुम्ही लिहिलेले आहेच. मी जवळपास (फक्त 'पुत्रकामेष्टी' हे नाटक सोडून) संपूर्ण अनिल बर्वे वाचलेले आहे (जरी माझ्याकडे आता फक्त 'थँक्यू मिस्टर ग्लाड' असले तरी...). फार अकाली गेले ते आपल्यातून.
साम्यवादी विचाराने प्रेरीत होऊन (ते शाहीर अमर शेख यांचे जावई...) चालू केलेल्या "रणांगण" या साप्ताहिकातील लिखाणाबद्दल महाराष्ट्र विधानसभेची बेअदबी झाल्याबद्दल त्याना त्यावेळी (१९७५) ९० दिवसांचा कारावासाची शिक्षाही झाली होती....ती भोगत असतानाच तुरुंगातच त्यांनी "थॅन्क्यू मिस्टर ग्लाड" हे नाट्यसंपदेसाठी नाटक लिहून पूर्ण केले होते. ही कादंबरीदेखील तुम्हाला जरूर आवडेल...! "डोंगर म्हातारा झाला..." ही देखील आदिवासी प्रश्नावरच आहे.
वयाच्या पस्तिशीतच या जगाचा निरोप घेतलेल्या अनिल बर्वेची आठवण '११ कोटी गॅलन...", "ग्लाड...", "डोंगर..." या सारख्या अनुभवाने रसरशीत झालेल्या साहित्याने मराठी वाचकावर कायम राहिल.
त्यांचा मुलगा 'राही' हा देखील चित्रपट, टीव्ही माध्यमातून अशाच चळवळीशी संलग्न राहून जणू वडिलांचेच कार्य पुढे नेत आहे. राहीची निर्मिती असलेला बाल-लैंगिक शोषणावर आधारित "मांजा" पाहणे एक झोप उडविणारा अनुभव आहे. (पण असो...इथे ते विषयांतर होईल.)
इन्द्रा
परत वाचली पाहिजेत
सागर,
तुमच्या यादीतील डोंगर म्हातारा झाला, अकरा कोटी गैलन पाणि आणि थैक्यू मि ग्लाड हि पुस्तके माणूस मध्ये क्रम्श यायाची तेंव्हा वाचली होती.
लतिका धुमाळे
In reply to परत वाचली पाहिजेत by लतिका विवेक
अनिल बर्वेंच्या पुस्तकां बद्दल
हो लतिका, बहुतेक लेखकांच्या कलाकृती मासिकांतून प्रकाशित होतात आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतल्यानंतर पुस्तक रुपात समोर येतात. अर्थात थेट पुस्तके लिहिणार्या लेखकांच्या तुलनेत असे लेखक खूप कमी आहेत.
अकरा कोटी गॅलन पाणी झाले माझे वाचून पण डोंगर म्हातारा झाला अजून वाचायचे आहे.
वाचले की लिहिन कसे वाटले ते. :)
ही घेतली
१. शिवछत्रपतींचे आरमार- गजानन भास्कर मेहेंदळे / संतोष शिंत्रे
२. डिजिटल फॉर्टेस - डॅन ब्राउन - अशोक पाध्ये
In reply to ही घेतली by वल्ली
डिजिटल फॉर्टेस आले का ?
अरे वा मित्रा,
डिजिटल फॉर्टेस आले का बाजारात?
वाचून झाले की प्लीज सांग कसे आहे ते :)
मग मागवता येईल मला इकडे
In reply to डिजिटल फॉर्टेस आले का ? by सागर
:)
आडात नाही तर पोहोर्यात कुठून?
डॅन ब्राऊनची एंजल्स आणि विंची जितकी छान आहेत तितकीच बाकी तिन्ही भिकार आहेत.
In reply to :) by स्पिन डॉक्टर
पाहुयात
एंजल्स आणि विंची दोन्ही वाचल्यात पण डिसेप्शन पॉइंट व डिजिटल फॉर्ट्रेस अजुन वाचायचीत. वाचल्यानंतरच मत देउ शकेन. :)
In reply to पाहुयात by वल्ली
+१ प्रतिसाद
वाचून मत ठरव रे मित्रा खरे आहे.
माझे मतः
दा विंची आणि एन्जेल्स अॅन्ड डेमन्स च्या तुलनेत डिसेप्शन पॉईंट थोडी तोकडी पडते खरी. पण एवढी काही डिसेप्शन पॉईंट वाईट नाहिये. मी वाचली आहे. पहिली ११० पाने वाचकाचा अंत पाहतात पण पुढे सगळे वेगवान झाले आहे. पुढील पानांतील थरार जाणवण्याकरिता पहिल्या ११० पानांतली भ्रमंती (कंटाळवाणी वाटली तरी) आवश्यक वाटते. उल्केचा शोध लागल्यावर मग पुढे जे थरारनाट्य रंगत जाते ते मस्तच आहे. अर्थात दा विंची सारखे रहस्य निर्माण डिसेप्शन पॉईंट मध्ये होत नाही हे मात्र नक्की. पडद्या आडची व्यक्ती मी यावेळी खूप लवकर गेस करु शकलो होतो :) पण डिसेप्शन पॉईंट वाचनीय आहे एवढे नक्की.
In reply to +१ प्रतिसाद by सागर
दा विंची पे़क्षाही
दा विंची पे़क्षाही मला एन्जेल्स अॅन्ड डेमन्स उजवी वाटते कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रचंड थरार भरलेला आहे. प्रचंड वेगवान कादंबरी आहे तसेच व्हॅटीकनच्या अंतरंगाचे थेट दर्शन होते. अर्थात लॅग्डनचे खूप उंचावरून पडूनही केवळ एका कपड्याच्या तुकड्यामुळे वाचणे हे तितकेसे पटत नाही. अर्थात एव्ह्ढा एकच भाग न पटणारा.
In reply to :) by स्पिन डॉक्टर
डि़जिटल फोर्ट्रेस
मला तर ब्राऊनरावांचे लेखन आवडते.
उर्वरित (दा विंची.. आणि एंजल्स.. सोडून) कादंबर्यांमधे मला डि़जिटल फोर्ट्रेस बरीच आवडली होती. विषयाचे नाविन्य आणि वेग दोन्हीचा चांगला मेळ आहे.
बाकी, यांची पुस्तकेही वाचल्यावर "अरेरे वेळ फुकट गेला" असे वाटल्याचे आठवत नाही.
In reply to डिजिटल फॉर्टेस आले का ? by सागर
वाचले आहे..
मी ते पी. डी. फ स्वरुपात वाचले होते ३ वर्षापुर्वी. आणी माझ्या बहिणीने ते गेल्या महिन्यात अंधेरी रेल्वेस्थानका जवळच्या पुस्तक विक्रेत्या कडुन भाडोत्री आणले होते. वाचुन झाल्यावर परत केले..
In reply to डिजिटल फॉर्टेस आले का ? by सागर
हो
नुकतेच आलेय बाजारात.
वा!
चांगली खरेदी केलीस.. भोवरा वाचलंस की सांग कसंय ते..
अकरा कोटी.. मधील एक भाग *बहुदा आठवीच्या) पाठ्यापुस्तकात धडा म्हणून होता. म्हणून मीही ते पुस्तक विकत घेतले आहे
बाकी न भेटता गेलास... ये अच्छी बात नही है! :P
In reply to वा! by ऋषिकेश
नक्की सांगतो रे मित्रा भोवरा वाचल्यावर
हो अकरा कोटी गॅलन पाणी मधील एक धडा शालेय अभ्यासक्रमात होता खरा. इयत्ता आठवत नाही पण होता एवढे नक्की.
बाकी न भेटता गेलास... ये अच्छी बात नही है!
पुढच्या वेळी नक्की भेटेन रे ऋ. यावेळी सगळी पळापळ झाली.
बाकी सविस्तर खरडीत सांगतो. पुढच्या वेळी मी फक्त पुण्यातच असेन तेव्हा नक्की भेटूयात :)
आज घेतली बुकगंगा.कॉम वरुन
१. गारंबीचा बापू - श्री.ना. पेंडसे
२. चंद्रगुप्त - हरि नारायण आपटे
३. द प्रिन्सेस - मनोहर माळगांवकर (मराठी)
४. आई - मॅक्झिम गॉर्की
५. ब्रेनवेव्हज - माधुरी शानबाग (विज्ञानकादंबरी)
६. स्वराज्याची स्थापना - नाथमाधव
७. १८५७ चे स्वातंत्र्यसमर - स्वातंत्र्यवीर सावरकर
८. थर्ड चॅनेल - स्वामी धर्मव्रत
९. अग्नी - वर्षा गजेंद्रगडकर (रु. १० ची पुस्तिका - अग्नी या क्षेपणास्त्राची थोडक्यात माहिती)
वरील सर्व पुस्तके आहेत असे त्यांनी सांगितले आहे पण हातात येतील तेव्हा खरे ;)
In reply to आज घेतली बुकगंगा.कॉम वरुन by सागर
शिपिंग चार्जेस कसे लावतात रे?
शिपिंग चार्जेस कसे लावतात रे?
In reply to शिपिंग चार्जेस कसे लावतात रे? by यशोधरा
शिपिंग फ्री आहे
पण पुस्तकांच्या किंमतीत घासाघीस नाही करता येत.
फिक्स्ड प्राईस. एकूण पुस्तके तेवढ्याच किंमतीत हातात येतात :)
पण खरेदीचा अनुभव चांगला आहे. हवी ती पुस्तके देतात. बुकगंगा.कॉम वर असलेली बहुतेक सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. काही काही मिळत नाहीत. त्यांना ईमेल वर कन्फर्मेशन विचारले तरी ते तत्परतेने प्रतिसाद देतात.
एकूण खरेदीचा अनुभव चांगला आहे.
In reply to शिपिंग चार्जेस कसे लावतात रे? by यशोधरा
प्रकाटाआ
...
प्रिन्सेस...!
".....द प्रिन्सेस - मनोहर माळगांवकर (मराठी)...."
~ या खरेदीबद्दल अभयराजे आणि माझ्यातर्फे सागर याना एक नेसकॅफे....गरमागरम !!
(सागर याना माहिती आहेच....माळगावकर आमचा मनाचा हळवा कोपरा आहे).
(एक सूचना : शीर्षकावरून बर्याच वाचकांची अशी कल्पना होते (झालेली आहे हे मला माहिती आहे...) की 'प्रिन्सेस' ही एखाद्या 'राजकन्ये'ची कहाणी असावी....पण प्रत्यक्षात टायटल The Princes (संस्थानिक) या अर्थाने आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर एका संस्थानिकाच्या नजरेतून त्यावेळी घडत गेलेल्या घटनावर आधारित कथानक आहे.)
इन्द्रा
In reply to प्रिन्सेस...! by इंद्रराज पवार
नेसकॅफे नक्की
होय इंद्रराज, नेसकॅफे नक्की
माळगांवकर वाचायला घेणार आहे लवकरच. पण मराठी प्रिन्सेस चा क्रमांक पहिला.
प्रिन्सेस मराठीतून मिळाले नव्हते. बुकगंगा वर मिळाले. आधी कन्फर्म केले आणि लगेच घेऊन टाकले.
मराठीत वाचनाची मजा औरच असते
ते झाले की गॅन्जेस घेईनच परत वाचायला इंग्रजीतून. मग तुमचा हळवा कोपरा माझाही एक हळवा कोपरा होऊन जाईन... :)
पण सध्या खरेदीच्या मोहातून बाहेर पडून आता फक्त वाचनाकडे लक्ष द्यायचा विचार आहे
एक वर्ष संपले तरी उरतील एवढी पुस्तके आता आहेत. कधी वाचून होणार एवढी पुस्तके :)
रसिक साहित्य कडे ही ऑर्डर केली आहेत
यातली कोणती पुस्तके मिळणार आहेत ते मला उद्याच कळेल. पण एखादे सोडले तर बहुतेक सगळी मिळतील
१. क्लिओपात्रा - संजय सोनवणी
२. ...आणि पानिपत - संजय सोनवणी
३. पानिपत १७६१ - त्र्यं. जं. शेजवलकर
४. आदिभारत - श्रीपाद अमृत डांगे (हेच मिळणे अवघड आहे. मिळाले तर रसिक वाले बघणार आहेत)
५. अश्मजीव - संजय ढोले (विज्ञानकथासंग्रह)
६. शालिवाहन शक - गो. ना. दातार
७. मुंबई दिनांक - अरुण साधू
८. समिधा - अनघा देसाई (ग्रंथाली प्रकाशन) - अध्यात्मावर आहे
९. महिकावतीची बखर - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मुंबईतील माहिम बद्दल- शिवपूर्वकालीन सर्वात जुनी बखर
१०.व्होल्गा ते गंगा - राहूल सांकृत्यायन
In reply to रसिक साहित्य कडे ही ऑर्डर केली आहेत by सागर
सहीच की.
सहीच की.
In reply to सहीच की. by यशोधरा
पुस्तके सहीच आहेत
यशोधरा,
पण मुख्य मुद्दा हा आहे की वाचन कधी होणार यांचे ;)
आजच या दोन ऑर्डर्स दिल्यावर ठरवले की आता पुढची खरेदी पुढल्या वर्षी (तेव्हाच लक्षात आले की नवीन वर्ष सुरु व्हायला पण १६च दिवस राहिलेत :(
पण आता एवढ्यात लवकर काही घेणार नाही. या वर्षाचा संकल्प जसा पुस्तक खरेदी होता तसा आता नवीन वर्षाचा संकल्प वाचनच असेन :)
यंत्र
बापरे! हा सागर म्हणजे 'पुस्तक खरेदी करणारे यंत्र' झालाय :)
आता इतकं जळवलं आहेस तर प्रत्येक पुस्तकाचा परिचय लिहिच हा आग्रह!
In reply to यंत्र by ऋषिकेश
अरे मी जास्त जळतो आहे
आता इतकं जळवलं आहेस तर प्रत्येक पुस्तकाचा परिचय लिहिच हा आग्रह
हा हा हा...
पण माझी जलन जास्त आहे. पुस्तके आहेत पण वाचली नाहीत :(
नवीन वर्षाचा तो संकल्प आहे रे ऋ. त्यासाठी वाचन करणारच आहे. वाचता वाचता एकेका पुस्तकाबद्दल नक्की लिहिणार आहे. म्हणूनच सध्या मी खरेदी स्टॉप करण्यासाठी निशाण्यावरची सगळी मुख्य पुस्तके मागवून घेतली.
आता खरेदीला ब्रेक ;)
सागर, ते 'संधिकाल' हे नाव
सागर,
ते 'संधिकाल' हे नाव वाचलं आणि मला त्याच नावाच्या मधु मंगेश कर्णिक यांच्या पुस्तकाची (कादंबरीची) आठवण झाली.
मिळालं तर नक्की वाचा. छान आहे.
In reply to सागर, ते 'संधिकाल' हे नाव by शमिश
अपघातानेच वाचले आहे
होय शमिश,
मी बुकगंगा.कॉम वरुन जेव्हा फ्रिजॉफ काप्रा यांच्या 'संधिकाल' या पुस्तकाची ऑर्डर दिली होती तेव्हा त्यांनी चुकून मला मधु मंगेश कर्णिकांचेच 'संधिकाल' पाठवले होते. त्यानंतर २-३ आठवड्यांनी मीच पुण्याला येणार असल्याने मला हवे असलेले संधिकाल त्यांनी प्रत्यक्ष देण्याचे मान्य केले होते. मग त्या वेळात कर्णिकांचे संधिकाल वाचून काढले. मला आवडले ते. विशेष म्हणजे पुस्तकातील शब्दसामर्थ्य पहिल्या ५० पानांतच जाणवले. भांगार म्हणजे काय हे आज कोणाला विचारले तर खूप कमी लोकांना सांगता येईल. पण कोकणात सोनं हे तोळ्यात नाही तर शेरात मोजतात तिथे सोन्याला भांगार म्हणतात. अशी व अनेक नव नवी माहिती या सुंदर कादंबरीतून कळते
पण एकंदरीत कथानक अनेक अंगांना स्पर्श करत असल्याने, आरस कुटुंबाभोवती फिरणारी ही कादंबरी शेवटी एसके च्या भोवती फिरत संपते ते थोडेसे खटकले. एकूणच अनेक विषयांची मांडणी कर्णिकांनी खूप सुरेख पद्धतीने 'संधिकाल' मध्ये केलेली आहे. पण अशी बहुस्पर्शी कादंबरी अनेक भागांत विभागताना काही दुवे तुटल्यासारखे वाटले आणि शेवटच्या भागात पकड थोडी ढिली झाली एवढेच. बाकी कादंबरी सुंदरच आहे यात वाद नाही.
वर्षअखेरची भर
१. कुमाऊंचे नरभक्षक - जिम कॉर्बेट - अनु: डॉ. सुभाष भेंडे
२. रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता - जिम कॉर्बेट - अनु: शरच्चंद्र बडोदेकर
३. देवळाचा वाघ आणि कुमाऊंचे आणखी काही नरभक्षक - जिम कॉर्बेट - अनु: शरच्चंद्र बडोदेकर
४. माझा लढा (माईन काम्फ) - अॅडॉल्फ हिटलर - अनु: श्रीराम ढवळीकर
५. कॅसिनो रॉयाल - इयान फ्लेमिंग - अनु : सुभाष जोशी
६. फियर इज द की - अॅलिस्टर मॅक्लीन - अनु: अशोक पाध्ये
७. वादळमाथा - राम प्रधान (यशवंतराव चव्हाण यांचे चरित्र)
८. कोमा - रॉबिन कुक - अनु: रविंद्र गुर्जर
९. सखी - व.पु. काळे
१०.कबंध - रत्नाकर मतकरी
११. वन नाईट अॅट द कॉल सेंटर - चेतन भगत - अनु: सुप्रिया वकील
१२. खंडाळ्याच्या घाटासाठी - शुभदा गोगटे
३ पुस्तके
कालच घेतली ३ पुस्तके.
१. साद देती हिमशिखरे
२. कालींदी
३. भक्ती सागर
In reply to ३ पुस्तके by प्रशु
+१ सुंदर निवड
१.
साद देती हिमशिखरे चा पुढचा भाग म्हणून एक पुस्तक आहे अंतरीचा मागोवा म्हणून. पण ते साद देती हिमशिखरे सारखे नाहिये. चिंतनात्मक जास्त आहे.
२. कालिंदी म्हणजे जगन्नाथ कुंटे बुवांचे. अर्थात कालिंदीच्या अगोदर त्यांची नर्मदे हर , साधनामस्त आणि नित्य निरंजन वाचून झाली असतीलच. नसतील तर कालिंदीच्या अगोदर ही तीन पुस्तके वाचलेली कधीही चांगली. सुंदर आहेत
३. भक्ती सागर - कोणाचे आहे? याबद्दल माहिती करुन घ्यायला आवडेल. माझ्या माहितीतले नाहिये हे पुस्तक
नवीन वर्षाची सुरुवात
१. ऋग्वेद - मॅक्स मुल्लर (इंग्रजी) - ३३३ रु. फ्लिपकार्ट वरुन घेतले
२. मुखवटा - अरुण साधू (वल्ली चे रेकमेंडेशन) - २०० रु.
३. आवरण - एस एल भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी
४. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - वि.का. राजवाडे - ८० रु.
५. शिवाजी कोण होता? - गोविंद पानसरे - २० रु.
६. चांगदेव चतुष्टय (बिढार, झूल, जरिला, हूल) - भालचंद्र नेमाडे
In reply to नवीन वर्षाची सुरुवात by सागर
चतुष्ट्य..!!
".....चांगदेव चतुष्टय (बिढार, झूल, जरिला, हूल) - भालचंद्र नेमाडे...."
~ सागर, वास्तविक "चतुष्ट्य" हा नाम-प्रयोग फसवा आहे आणि त्यातही प्रकाशकाचा तो बनेलपणा आहे. खरे तर "बिढार" मध्येच 'हूल' समाविष्ट आहे. पण असो. मी हा प्रतिसाद एवढ्यासाठी देत आहे की, तुम्ही तुमच्या खरेदीमध्ये या चतुष्ट्याचा जो क्रम दिला आहे त्यानुसार वाचन करू नका.
वाचनासाठी = बिढार, हूल, झूल आणि जरिला असा क्रम ठेवा म्हणजे ते सुसंगत वाचन होईल.
इन्द्रा
In reply to चतुष्ट्य..!! by इंद्रराज पवार
चांगदेव चतुष्टयाचा क्रम
इंद्रा, हा क्रम बिढार, हूल, जरीला आणि शेवटी झूल असा हवा ना?
In reply to चांगदेव चतुष्टयाचा क्रम by टण्या
नक्की कोणता क्रम योग्य?
मी तर चक्रावलो आहे :)
नक्की कोणता क्रम योग्य आहे?
In reply to नक्की कोणता क्रम योग्य? by सागर
क्रम...!!
सॉरी...सॉरी....टण्या यानी सांगितलेला क्रमच योग्य आहे, सागर.....माझाच थोडा गोंधळ झाला.
तरीही मी अगोदर म्हटल्याप्रमाणे 'चतुष्ट्य' हा 'हिंदू' ने दिलेला चकवा आहे. मूळात हिंदू ही चतुष्ट्यातच सामील होती, पण पुढे श्री.नेमाडे यानी इतरत्र म्हटल्याप्रमाणे त्यातील विषय केवळ एका प्राध्यापकाचा राहिला नसून त्याला मुबलक व्यासपीठ लाभले...
मात्र तोपर्यंत चतुष्ट्य ही योजना वाचकाच्या मनी ठसली होती, तिचा फायदा गल्लाभरू प्रकाशकाने उचलला नसेल तरच आश्चर्य ! "झूल" च्या ब्लर्बवर पॉप्युलरने एक नोट दिलेली आहे. "भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरी-चतुष्ट्यातील बिढार आणि जरीला नंतरची ही कादंबरी - झूल. या नंतरच्या हिंदू या कादंबरीने हे चतुष्ट्य पूर्ण होते..." ~ असे असताना मग (चातुर्याने) "हूल" ची हूल उठवून जो काही धंदा करायचा तो भटकळांनी केलाच.
इन्द्रा
In reply to क्रम...!! by इंद्रराज पवार
मग ठीक आहे तर
टण्या यांचे धन्यवाद योग्य क्रम दिल्याबद्दल. :)
चतुष्टयचे महत्त्व सांगितल्याबद्दल इंद्रराज यांनाही धन्यवाद.
याच क्रमाने वाचेन आता हे चतुष्टय :)
In reply to मग ठीक आहे तर by सागर
चालले पंडित अक्कल सांडीत!!!!
अरे माझ्या पंडित मित्रांनो, हे प्रत्येकाने आपापल्या बकुबाप्रमाणे आपल्याला हवे तसे घ्यावे. :-p
पुस्तके नवीन घेतली असतील तर त्यांची मलपृष्ठे पाहा. नेमाड्यांना किंवा पॉप्युलरवाल्यांना पुविवर लोक असा घोळ घालतील याची खात्री असल्याने त्यांनी प्रत्येक पुस्तकाच्या ब्लर्बवर त्यांचा चातुष्ट्यातला क्रम दिला आहे. :-)
In reply to चालले पंडित अक्कल सांडीत!!!! by मस्त कलंदर
पुस्तके अजून पाहिली नाहीत
मकी अगं पुस्तके अजून हातात नाही आलीत गं.
आल्यावर नक्की बघेन हा क्रम :)
अवांतरः पंडीत ही उपाधी (अर्थात माझ्यासाठी नसल्याने) आवडली ;)
In reply to पुस्तके अजून पाहिली नाहीत by सागर
पंडित...!
सागर.....मकीने आपल्याला शालूतून शिव्या जरी दिल्या असल्या तरी तिने 'मित्रांनो' असे म्हटल्यामुळे आपण गहिवरून जायाला हवे !
कॅरी ऑन, मके.
इन्द्रा
In reply to पंडित...! by इंद्रराज पवार
टाळ्या
तरी तिने 'मित्रांनो' असे म्हटल्यामुळे आपण गहिवरून जायाला हवे
इंद्रराज या वाक्याला टाळ्या :)
राहिलेली पुस्तके
काही पुस्तके द्यायची राहिली वरच्या यादीत :
नीलची शाळा : समरहील
भुताचा जन्म - द.मा. मिरासदार
मिरासदारी - द.मा. मिरासदार
दोस्त - व.पु. काळे
नटरंग - आनंद यादव
ओमेर्ता - मारियो पुझो - अनु: अनिल काळे
In reply to राहिलेली पुस्तके by सागर
कसला पेटलाय!
कसला पेटलाय हा मुलगा!
In reply to कसला पेटलाय! by ऋषिकेश
एकदम सही....!!
"....कसला पेटलाय हा मुलगा!..."
~ अगदी मनातील बोललात ऋषिकेश !
उगा नाही, भागवत बंधू, भटकळ बंधू, कोठावळे बंधू यानी मुंबई-पुण्यात नवीन बंगले बांधायला सुरूवात केली !! त्यांच्या बजेटपैकी निम्म्याहून अधिकची 'आय' ही सागरच्या अकौंटवरून तिकडे वर्ग झाली असणारच !
खरे तर मी लाजून माझी खरेदी इथे देण्याचे बंद केले आहे. बंगलोरच्या या गलिव्हरपुढे आम्ही लिलिपुटियन्सनी कशाला नाचायचे ?
इन्द्रा
In reply to एकदम सही....!! by इंद्रराज पवार
अगदी खरे
हा माणूस मागच्याच आठवड्यात म्हणाला होता की आता खरेदीला ब्रेक. पण त्याची खरेदी तीही अगदी तगडी चालूच आहे अजूनही. आता पुढेमागे बंगलोर सोडतांना त्याला पुस्तकांसाठी एक ट्रकच करावा लागणार असे दिसतेय.
In reply to अगदी खरे by वल्ली
मित्रांनो लाजवू नका
अरे मित्रांनो इकडे बंगळूरात पुस्तके वाचायला मिळत नाहीत आणि सध्या जमते आहे म्हणून संग्रह केला आहे या सुंदर पुस्तकांचा. या चालू वर्षी तुम्हीच म्हणाल खूप दिवसांत सागरने नवीन खरेदी दिली नाही म्हणून ;)
निशाण्यावरची बहुतेक सगळीच पुस्तके मी घेतली आहेत, तेव्हा नवीन खरेदी तूर्तास नाही. (नक्की नाही ;) )
तुम्ही तुमची खरेदी देणे बंद करु नका मित्रांनो. मग मला नवीन नवीन चांगली पुस्तके कळणार कशी?
अजून लाजवू नका रे मित्रांनो. :)
ऋ चे वाक्य खूप आवडले
"कसला पेटलाय हा मुलगा"
खरेदीच्या नशेतून जागे केल्याबद्दल थेंकू रे ऋ :)
इंद्रराज,
पुस्तके असून कोणी गलिव्हर होत नाही हो... तुमच्यासारखी मुबलक वाचनेही करावी लागतात.
ती करता यावीत यासाठीच घेतली आहेत पुस्तके. ;)
गा नाही, भागवत बंधू, भटकळ बंधू, कोठावळे बंधू यानी मुंबई-पुण्यात नवीन बंगले बांधायला सुरूवात केली !! त्यांच्या बजेटपैकी निम्म्याहून अधिकची 'आय' ही सागरच्या अकौंटवरून तिकडे वर्ग झाली असणारच !
हे वाक्य लई भारी
२०१० चीच खरेदी जंगी झाली माझी. २०११ ला अशी खरेदी नाही होणार... कारण घ्यायची पुस्तके जवळ जवळ घेतली आहेत :)
वल्ली ने केलेली कल्पना मस्तच आहे.
बंगलोर सोडतांना त्याला पुस्तकांसाठी एक ट्रकच करावा लागणार
काश ऐसा हो सकता :)
दोन मोठी खोकी भरतील एवढी पुस्तके नक्कीच आहेत सध्या तरी.
माझी लेटेष्ट खरेदी: महाराणा
माझी लेटेष्ट खरेदी:
महाराणा प्रतापः रघुवीरसिंह राजपूत
शाळा: मिलिंद बोकील
कर्णायन: गो नी दांडेकर
दक्षिणायनः डॉ. रणजित मिरजे
डिजिटल फोर्ट्रेस: डॅन ब्राउन
राजेश्री: ना सं इनामदार
आहे कॉर्पोरेट तरी: संजय जोशी
काळेपाणी: वि दा सावरकर
रोमराज्यः मीना प्रभू
In reply to माझी लेटेष्ट खरेदी: महाराणा by मृत्युन्जय
राजेश्री आणि आहे कॉर्प्रोरेट
राजेश्री आणि आहे कॉर्प्रोरेट तरी बद्दल उत्सुकता आहे. कशावर आहेत? वाचल्यावर नक्की लिहा त्याबद्दल
Pagination