पुस्तकाचे नाव
मागच्यावेळेस फारसे प्रतिसाद आले नाहीत. यावेळेस मात्र असे होणार नाही असे वाटते. तर हे घ्या... एक कविता टाकतो आहे. म्हणजे त्यातली काही कडवी.
**
रामाच्या देवळामागे
हातभट्टीची धुनी जागे,
शेपटी घालून चालू लागे
हनुमान कोणी भ्यालेला.
राज्य खुनी भांडग्यांचे,
राज्य धनदांडग्यांचे,
राज्य सत्तालांडग्यांचे,
भयभीत सारे.
हा इथे दिसतो भ्यालेला,
तो तिथे दिसतो भ्यालेला,
जो जो दिसतो तो भ्यालेला,
भयभीतसारे.
कोणाची भुई तोडून नेली,
कोणाची गुरे सोडून नेली,
कोणाची पोरगी ओढून नेली,
भयभीत सारे.
पाऊस आंधळा बडवून गेला,
दुष्काळ कोरडा रडवून गेला,
रोग झाडे झडवून गेला,
भयभीत सारे.
पोट उपाशी, खावया मिळेना,
पाणी कोठे प्यावया मिळेना,
वाट कोठे जावया मिळेना,
भयभीत सारे.
.
.
.
**
संकेत १ : काव्यसंग्रह. एका प्रसिद्ध ग्रंथाचे विडंबन. विडंबक अतिशय लोकप्रिय आणि अजून हयात असलेले कवी आहेत.
पास!
बिका काहीच क्लु लागत नाही! एकदम विकेट गेली!
In reply to पास! by ज्योति कामत
ज्योतिशी सहमत आहे... संकेताची गरज आहे
बिका,
ज्योति म्हणते ते बरोबर आहे. सध्या तरी वेच्याने विकेट उडवली आहे.
'कविता' हा माझा (एके काळी सशक्त असला तरी) सध्या अशक्त बिंदू आहे, तेव्हा संकेताची गरज वाटते आहे.
हे पुस्तक एक कवितासंग्रह आहे का एखाद्या कादंबरीतील अथवा चरित्रातील ही कविता आहे हे कृपया सांगावे त्याने अंदाज करण्यास मदत होईल.
एकच ट्राय? बाकी कोणी दखलही
एकच ट्राय? बाकी कोणी दखलही नाही घेत? :(
काहीतरी संकेत द्या.म्हणजे
काहीतरी संकेत द्या.म्हणजे प्रयत्न करता येईल.कविता वाचल्यासारखी नक्कीच वाटते आहे.
संकेत दिला आहे. संकेत १ :
संकेत दिला आहे.
संकेत १ : काव्यसंग्रह. एका प्रसिद्ध ग्रंथाचे विडंबन. विडंबक अतिशय लोकप्रिय आणि अजून हयात असलेले कवी आहेत.
व्यनि केला आहे
व्यनि केला आहे आणि बरोबर असावा असा अंदाज आहे. बघुया बिका काय म्हणतात ते. :)
नाही येत ओळखता
संकेतानंतरही ओळखता आलेले नाही :(
कविता पहिल्यांदाच वाचली आहे
ही कविता, पाडगावकरांच्या
ही कविता, पाडगावकरांच्या 'उदासबोध' या कवितसंग्रहातील आहे. स्पिडॉ, वल्ली आणि दिगम्भा यांनी उत्तर अचूक ओळखल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
परवा इंद्राने विडंबनावरून जे काही म्हणणे मांडले त्यावरून या पुस्तकाची आठवण आली. आणि लगेच कविता टाकली. दासबोधासारख्या ग्रंथावर आधारित विडंबने आली आणि ती लोकांनी स्वीकारलीही.
In reply to ही कविता, पाडगावकरांच्या by बिपिन कार्यकर्ते
उदासबोध नव्हते वाचले
धन्यवाद बिका :)
या निमित्ताने एका छान विडंबन काव्यसंग्रहाची ओळख झाली
कविता वाचन बंदच आहे जवळ जवळ. हळू हळू सुरु करेन आता