• '

(२०१२) एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग -११

सागर
सोमवार, 2 January, 2012 - 17:59
 

मुखपृष्ठ

पुस्तक जोडलेले नाही

 
 

पुस्तक

पुस्तक जोडलेले नाही

 

भाग-१० वर्ष संपल्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.

बुकगंगाकडून

देवाज्ञा - नारायण धारप
मास्टर प्लॅन - सुहास शिरवळकर
स्टुपिड - - सुहास शिरवळकर
नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर - आनंद साधले
माझी स्वप्ने - न्यायमूर्ति राम केशव रानडे

ही पुस्तके घेतली.

घे!

गेल्या सहा महिन्यांची खरेदी देते आहे.
इंग्रजी पुस्तकांमध्ये-
१. दॅट लाँग सायलेन्स-शशी देशपांडे
२. द हाऊस ऑफ ब्लू मँगोज- डेव्हिड दाविदार
३. नो कंट्री फॉर विमेन- तस्लिमा नासरीन
३. जेजुरी- अरुण कोलटकर
४. काफ्का ऑन द शोअर- मुराकामी
५. नॉर्वेजियन वूड- मुराकामी
६. लेडे चॅटर्लीज लव्हर- डी.एच. लॉरेन्स
७. कलेक्डेट स्टोरीज ऑफ काफ्का
८. कलेक्टेड स्टोरीज ऑफ गोगोल

मराठीत-
१. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी- ह.मो.मराठे
२. अफवा खरी ठरावी म्हणून- प्रज्ञा दया पवार
३. चारशे कोटी विसरभोळे (नाटक)- मकरंद साठे
४. निवडक सदानंद रेगे- संपादन- वसंत आबाजी डहाके
५. सतीश आळेकरांची सर्वच्या सर्व नाटकं (कुतुहल असणारयांनी व्य.नि करावा, पूर्ण लिस्ट पाठवली जाईल)

हिंदीत-
१. दिवारमें एक खिडकी रहती थी- विनोदकुमार शुक्ल
२. नौकर की कमीज- विनोदकुमार शुक्ल
३. पिली छत्रीवाली लडकी- उदयप्रकाश

मस्त खरेदी

इंग्रजी खरेदी एकदम भारी आहे.

माझा अजून मुराकामीच्या वाटेला जायचा धीर झालेला नाही Sad
पण या वर्षी लवकरात लवकर जाण्याचा मानस आहे Smile

मराठी पुस्तकांत निवडक सदानंद रेगे हे पुस्तक सर्वार्थाने श्रीमंती वाढवते आहे असे वाटतेय

सतीश आळेकरांची सर्वच्या सर्व नाटकं मी अजिबात वाचलेली नाहित पण नाटक या प्रकारात फारसा रमतही नाही. अलिकडेच शिरवाडकरांचे नटसम्राट मुद्दाम त्यात रस निर्माण व्हावा यासाठीच घेतले आहे.

नाट्यप्रकारात रस निर्माण झाला की तुझ्याकडची सतीश आळेकरांची पुस्तकेच घेईन मी Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अरे वा!

इंग्रजीतली 'जेजुरी- अरुण कोलटकर' कथावर आहे?
बाकी हिंतीतल्या तीनही पुस्तकांवर काहितरी लिहा ना! अनेकदा ही पुस्तके ऐकली आहेत. पहिल्या पुस्तकाचं मराठी भाषांतरही आहे ना?

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

इथे थोडी माहिती मिळेल

ऋ,

अरुण कोलटकरांचे हे पुस्तक चांगलेच दिसते आहे

गुडरीड वर त्याचे बरेच रिव्ह्यूज आहेत.

न्यू यॉर्क रिव्ह्यू बुक्स वर पण आहे

याची मदत व्हावी तुला Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

धातु- गुगल

सागर,
गुगलामि, गुगलावः, गुगलामः
गुगलासि..

वगैरे वगैरे का?
मस्त!
Wink

अगदी बरोब्बर

खरे आहे Smile

गुगलामि, गुगलावः, गुगलामः
गुगलासि..

गूगलबाबा की जय Smile

पण गुडरीड माहिती होते. मी कधीचा आहे तिथे. त्यामुळे दुसर्‍या लिंकचा दुवा मात्र गूगलबाबाला साकडे घालून मिळवला Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

जेजुरी इंग्रजीत आहे आणि त्यात

ऋषिकेश,

जेजुरी इंग्रजीत आहे आणि त्यात जेजुरीवरच्या अरुण कोलटकर च्या कविता आहेत. त्यातल्या काही www.tyaa-kavitaa.blogspot.com वर वाचायला मिळतील.

अगदी बरोबर, 'दिवार में' चा मराठीत अनुवाद निशिकांत ठकार यांनी केलाय, या पुस्तकाचा उल्लेख मी माझ्या 'दशकातील दहा' यादीत केला होता. 'नौकर की कमीज' चं ही भाषांतर निशिकांत ठकार यांनीच केलाय आणि 'पिली छत्री'चाही अनुवाद उपलब्ध आहे. गणेश विसपुते यांनी 'पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी' या नावाने केलाय. अनुवाद कितीही चांगले असले तरी मूळ हिंदी वाचायला खूप गोड वाटते.

यातल्या एकातरी पुस्तकावर लिहायचं मनात आहे, पण जमलं पाहिजे.

हा!

हा! तेच म्हटलं कुठे तरी वाचलं बद्दल'दिवार मे' बद्दल.. तुम्हीच लिहिलं होतंत की
आता एखादं हिंदी पुस्तकही बघितलं पाहिजे वाचुन.

बाकी अनुवादाऐवजी मुळ पुस्तकाची भाषा अवगत असेल तर मुळच वाचावं या मताशी सहमत

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

मंगेश पाडगावकर - स्नेहगाथा,

मंगेश पाडगावकर - स्नेहगाथा, कवितेच्या शोधात आणि चिंतन
नसीमा हूरजूक - चाकाची खुर्ची (ह्यांना भेटून, त्यांच्या प्रकल्पाचे काम पाहूनही आले. थोडाफार जमेल तसा सहभागही घेतला आहे)
रस्कीन बाँड - Rain in the mountains - notes from Himalayas.

नसीमा हूरजूक बद्दल अजून सांगू शकशील का?

यशोधरा,

खूप दिवसांनी तुला इथे पाहून आनंद झाला Smile

नसीमा हूरजूक - चाकाची खुर्ची (ह्यांना भेटून, त्यांच्या प्रकल्पाचे काम पाहूनही आले. थोडाफार जमेल तसा सहभागही घेतला आहे)

या पुस्तकाबद्दल अधिक माहिती करुन घ्यायला आवडेल
तुला सवड मिळेल तसे लिही पण थोडे सविस्तर नक्की सांग

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नक्की सागर.

नक्की सागर. Smile

माझी खरेदी

गेल्या दोनतीन महिन्यात जशी धावपळ झाली तशीच त्यातूनही काही पुस्तके खरेदीसाठीही वेळ काढला. सारीच अजून पूर्णपणे वाचलेली नसली (कारण मार्च २०१२ नंतर त्यांचे निवांतपणे वाचन सुरू होईल - व्हीआरएसमुळे) तरी या ना त्या निमित्ताने त्याना रॅक्समधून खाली काढून एकदोन प्रकरणे वाचली आहेत, इतकेच सांगू शकतो :

१. स्पीकिंग ऑफ फिल्म्स ~ सत्यजीत रे
२. जर्नी डाऊन मेलोडी लेन ~ राजू भारतन [वाचताना इंग्रजी अगदी मधात बुडवून काढले आहे असे वाटते. विषयही तितकास आकर्षक आहे.]
३. फर्स्ट डे फर्स्ट शो ~ अनुपमा चोप्रा
४. द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ ~ जेरी पिन्टो
५. कैफी आणि मी ~ शौकत कैफी [हे मात्र पूर्ण वाचले आहे]
६. वाचणार्‍याची रोजनिशी ~ सतीश काळसेकर
/ श्री.सतीश काळसेकर हे १९६० च्या दशकातील अनियतकालिक चळवळीतील भालचंद्र नेमाडे, अशोक शहाणे, रघू दंडवते, वसंत गुर्जर, मनोहर ओक, अरुण कोलटकर आदी "यंग ब्रिगेड" चे एक नावाजलेले सदस्य. नंतर "आपले वाङ्मयवृत्त" आणि 'साधना" यांच्या माध्यमातून एक जबरदस्त ताकदीचे स्तंभलेखक म्हणून नावाजले गेलेले लेखक. त्यांचे असे समग्र लेखन आता "वाचणार्‍याची रोजनिशी' या शीर्षकाने लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केले आहे.

खुद्द सतीश काळसेकर हे स्वतः आपल्या 'सागर' प्रमाणे 'पुस्तकवेडे' आहेत. इतके की त्यांच्या घरी त्याना मुद्दाम भेटायला जाल तर प्रथम दर्शन होते ते चारी बाजूने पसरलेली शेकडो नव्हे तर हजारो पुस्तके. एखाद्या झाडाच्या पारंब्या बेफाटपणे परिसरात पसराव्या तशा पुस्तकांच्या राशी. त्यातून आता सत्तरी गाठलेल्या काळसेकरांना शोधणे हे एक दिव्यच असते.

"वाचणार्‍याची रोजनिशी" या पुस्तकाची मांडणी, बांधणी, छपाई, अगदी दृष्ट लागण्यासारखी झाली आहे. हे पुस्तक पुस्तकविश्वच्या सार्‍या सदस्यांनी आवर्जून आपल्या संग्रही ठेवावे अशी मुद्दाम शिफारस करीत आहे./

अशोक पाटील

नक्की घेईन काका

"वाचणार्‍याची रोजनिशी" या पुस्तकाची मांडणी, बांधणी, छपाई, अगदी दृष्ट लागण्यासारखी झाली आहे. हे पुस्तक पुस्तकविश्वच्या सार्‍या सदस्यांनी आवर्जून आपल्या संग्रही ठेवावे अशी मुद्दाम शिफारस करीत आहे./

अशोक काका,

तुम्ही हे पुस्तक सुचवताय म्हणजे डोळे झाकून घेईन हे पुस्तक Smile
अजून एक चांगले पुस्तक माझ्या ग्रंथसंग्रहात समाविष्ट करण्यास मदत केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुण्यात हापिसची मिटींग उरकून

पुण्यात हापिसची मिटींग उरकून परत येताना द्प्न पुस्तके विकत घेतली गेली.

१. कर्व्हालो - पूर्णचंद्र तेजस्वी - अनु. उमा कुलकर्णी - किं. १०० रू. प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
२. फ्लॉरीस्टन बंगला - नरसिंह माळगी - अनु. उमा कुलकर्णी -किं. २५० रू. प्रकाशकः पद्मगंधा प्रकाशन

कधी ऐकलेली नाहित

कोणत्या प्रकारची पुस्तकं आहेत ही? कधी ऐकलेली नाहित
नावावरून पहिलं चरीत्र आणि दुसरी कादंबरी वाटतेय

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

दोन्ही कादंबर्‍याच आहेत.

दोन्ही कादंबर्‍याच आहेत.

कर्व्हालो म्हणजे
सह्याद्रीच्या दक्षिण टोकाकडील निबिड अरण्यात चाललेल्या अद्भुतरम्य शोधयात्रेची रोमहर्षक कथा! उडता सरडा! एक दुर्मिळ प्राणी! निसर्गाच्या कोट्यावधी वर्षाच्या वाटचालीत घडलेला एक "अपघात'! या उडत्या सरड्याच्या शोधयात्रेतील विविध स्तरावरचे यात्री! गावंढळ मंदण्णा, इरसाल यंग्टा, चलाख "किवी' कुत्रा पासून ते महान शास्त्रज्ञ कर्वालो! निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील सशक्त, जिवंत, रसरशीत, नर्मविनोदी लेखन शैलीतून साकारलेली... कर्नाटकातील वेगळाच निसर्ग सामोरा आणणारी, पर्यावरणवादी, वौशिष्ट्यपूर्ण, बहुचर्चित कलाकृती.

फ्लॉरीस्टन बंगला ही नरसिंह माळगी यांची एक पुरुष व एक स्त्री आत्मा यांच्या प्रेमकहाणीवर आधारलेली कादंबरी.

शाळा

फ्लिपकार्टवरून 'शाळा' आणि 'प्राइड अँड प्रेज्युडाइज' मागवले. शाळा आधी लायब्ररीतून आणून वाचलेले. यावेळी आधीच्यापेक्षा जास्त आवडले. Smile
'प्राइड..' ऋषिकेशचे वाचून. शिवाय फ्लिपकार्टने फ्री शिपिंगसाठीची किमान मर्यादा १०० वरून २०० रू. केली म्हणून!

मिहिर

अरे वा

अरे वा. दोन्ही छान पुस्तके आहे. फक्त प्राईड घाईत वाचु नकोस.. घोट घोट रिचवत संपवायचे पुस्तक आहे Wink

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

एक असतो बिल्डर

पुण्याच्या धावत्या भेटीत खूप कमी मित्रांना भेटू शकलो
या भेटीत आपल्या पुस्तकविश्वचा सक्रिय सदस्य 'मनिष' याने मला भेट म्हणून दिलेले
एक असतो बिल्डर - डॉ. सुधीर निरगुडकर हे सुंदर पुस्तक बंगळूरात माझ्या घरी आले.
शोभा बोंद्रे यांचे शब्दांकन आहे, पुस्तक अफलातून आहे असे दिसते आहे.
काल रात्रीच मी बंगळुरात परत आलो व बसल्या बसल्या पहिले प्रकरणही वाचून झाले. एवढे अफलातून आहे हे पुस्तक. लेखनशैली पकड घेणारी आहेच पण त्याहीपेक्षा पहिल्या प्रकरणात निरगुडकरांनी चॉपस्टीकने भात खाणे कसे साध्य केले , त्यासाठी काय काय मेहनत घेतली हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. हा आठवडा माझा गडबडीत जाणार असला तरी हे पुस्तक वाचून होईल याची खात्री आहे. वाचून झाल्यावर या पुस्तकावर नक्की लिहिन असे वाटते आहे.

या पुस्तकाची झलक बुकगंगावर येथे बघावयास मिळेल

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

थोडी भर

- कैफी आणि मी - शौकत कैफी (अशोक काकांनी लिहिलेल्या या परिक्षणामुळे घेतले )

- छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य - नरहर कुरुंदकर ( छोटीशी पुस्तिका पण आवाका प्रचंड)
- थेंब अत्तराचे - नरहर कुरुंदकर (कुरुंदकरांनी लिहिलेल्या चौदा कवितासंग्रहांच्या प्रस्तावना, दोन काव्यसंग्रहांची परीक्षणे व एका कवितेसंबंधीचे विवेचन )
- दुदैवी रंगू - भारताचार्य म्हणून ज्यांना गौरविले जाते त्या चिं. वि. वैद्य यांची पानिपत युद्धाचा उपकथानकाच्या साहाय्याने वेध घेणारी कादंबरी

टीकास्वयंवर - भालचंद्र नेमाडे (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त टीका व समीक्षा ग्रंथ)
राडा - भाऊ पाध्ये (प्रस्तावना भालचंद्र नेमाडे) मुंबईच्या पार्श्वभूमिवरची कादंबरी

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

'छत्रपती शिवाजी महाराज

'छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य' मध्ये नेमके काय आहे रे? समि़क्षेच्या वळणाने जाणारा एखादा लेख असावा असे वाटतेय.
'राडा' बद्दल बरेचसे ऐकलेय. त्याचे परिक्षण येथे नक्कीच येऊ दे.

नक्की लिहिन मित्रा

वल्ली मित्रा,

या दोन्ही पुस्तकांवर अवश्य लिहिन.
राडा मी नंतर सवडीने वाचणार आहे, पण 'छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य' हे छोटेसे पुस्तक मात्र लवकरच वाचेन. या पुस्तकावर मी नक्की लिहिणार आहे मित्रा Smile

नरहर कुरुंदकर हे अगदी वस्तुनिष्ठ आणि वास्तवदर्शी दृष्टीकोनातून लिहितात असे मला वाटते , त्यामुळे या पुस्तकावरुन नक्की काय काय गवसणार आहे याची उत्सुकताच लागून राहिली आहे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

"राडा" ह्या पुस्तकाचा नायक

"राडा" ह्या पुस्तकाचा नायक "मंदार" म्हणून आहे काय? हेच पुस्तक बहूतेक "खुबसुरत काकू" ह्या नावाने पण प्रसिध्द झाले असावे.

'राडा' बद्दल

राडा हे भाऊ पाध्येंचं पुस्तक १९७५ साली पहिल्यांदा प्रकाशित झालं. त्यानंतर १९९७ ला दुसरी आवृत्ती. व त्यानंतर अलिकडे तिसरी आवृत्ती प्रकाशि झाली.

पुस्तक नेमके ऑफिसात राहिले असल्याने नायकाबद्दल आत्ता नाही सांगता येणार. पाहून सांगतो.

पण या दुव्यावर राडा पुस्तकाची काही पाने वाचायला मिळतील.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

फार छान दुवा दिलात

फार छान दुवा दिलात सागरभैया!भालचंद्र नेमाडेंची प्रस्तावना आहे.
मलाही आता आठवले त्याप्रमाणे "राडा" ह्या पुस्तकावर शिवसेनेने घातलेल्या अघोषित बंदी नंतर हे पुस्तक क्रमश: स्वरुपात, मेनका किंवा जत्रा अश्या मासिकात "खुबसुतरत काकू" ह्या नावाने छुप्या रितीने प्रसिध्द झाले होते.

होय बरोबर आहे निपो

शिवसेनेने या पुस्तकावर बंदी घालण्याचा खूप प्रयत्न केला होता.

माझे मासिकांचे वाचन जवळपास नव्हतेच त्यामुळे खूबसूरत काकू बद्दल कधी ऐकले नव्हते.
या माहितीबद्दल धन्यवाद. 'राडा' बद्दल आता अधिकच उत्सुकता वाढली आहे. Smile

प्रस्तावनेत नेमाडे म्हणतात तसे भाऊ पाध्ये हे मुंबईचे इतिहासकारच आहेत एक प्रकारे...

आज जालावर लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ अशी अनेक मासिके हळूहळू उपलब्ध होत आहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मला मासिकांचा आनंद आता घेता येतो आहे Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

मराठी भाषेचे मूळ

फ्लिपकार्टवरून विश्वनाथ खैर्‍यांचे 'मराठी भाषेचे मूळ' मागवले. जालावरतीच या पुस्तकाबद्दल वाचले होते.
अवांतरः सहज चाळताना ३-४ ठिकाणी 'निरखण' हा शब्द दिसला. 'निरीक्षण' पासून बनलेली 'निरखणे', 'निरखून पाहणे' अशी रूपे वापरात असली, तरी 'निरीक्षण'च्या जागी 'निरखण' विचित्र वाटले. तमिळ भाषकांसारखा जाणूनबुजून संस्कृत शब्द कमी वापरण्याचा प्रयत्न वाटला. असो,वाचूम्न झाल्यावर मत सांगेन.

मिहिर

छान निवड

पुस्तक चांगले आ मिहिर,
माझ्याकडेही आहे.

पण भाषेचा अभ्यास हा कित्येक वर्षांच्या परिश्रमाचा भाग आहे. तो १०-१२ पुस्तकांच्या वाचनातून कधीच परिपूर्ण होत नाही. त्या दिशेने जायला मदत मात्र नक्की होते Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

+१

+१ चांगले पुस्तक आहे. तमिळ बद्दल पुर्वग्रह न बाळगता वाच

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

+१ असेच म्हणतो

तमिळ बद्दल पुर्वग्रह न बाळगता वाच

हेच म्हणतो

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

गेल्या ५ महिन्यांतील माझी खरेदी..

पेनग्विन प्रकाशनाच्या ह्या दोन पुस्तकांवर ३०% सूट मिळाली म्हणून --- १. अरेबा परेबा आणि इतर कथा - उदय प्रकाश आणि २. नव्या वाटा नवी वळणे (निवडक कविता) - संपादक: निशिकांत मिरजकर

फ्लिपकार्टवरुन --

  1. The 80/20 Principle: The Secret Of Achieving More With Less - Richard Koch. (ब्रिटीश कोउन्सिलच्या लायब्रतून आणलेले हे पुस्तक आवडले म्हणून कायमचे संग्रही असावे असे वाटले.)
  2. Wuthering Heights - Emily Bronte -- तिळा तिळा दार उघड हे तारा वनारसे ह्यांनी लिहिलेले पुस्तक वाचून हे पुस्तक घेतले. पण ते मोफतही उपलब्ध आहे असे क़ळले म्हणून तेही (e-book) डाऊनलोड केले.
  3. The One Minute Manager: Increase Productivity, Profits And Your Own Prosperity - Spencer Johnson Ken Blanchard (नोकरी सुरु झाल्यावर लगेचच खरेदी केले एका मित्राच्या शिफारसीवरुन)

असे करु नये चित्रा

. पण ते मोफतही उपलब्ध आहे असे क़ळले म्हणून तेही (e-book) डाऊनलोड केले.

मोफत पुस्तकांच्या लिंक्स येथे पण द्यायची बात अस्से Wink

आम्हालाही मिळू द्या आनंद Smile

तिळा तिळा दार उघड हे तारा वनारसे हे उल्लेख केलेलेच पुस्तक माहिती आहे Sad

बाकीची इंग्रजी अजिबात माह्यती नाय

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अरे सागर, बरेच दिवसांनी इथे

अरे सागर,

बरेच दिवसांनी इथे आले ना! ती लिंक कशी देत्तात ते विसरले होते. बरं झालं ह्या निमित्ताने उजळणी झाली.

ही लिंक आहे बघ wuthering heights - emily Bronte

जरुर घ्या आणि वाचा आणि आनंद घ्या....

धन्यवाद चित्रा

उतरवून घेतले Smile

वाचीन आता निवांतपणे
दुव्याबद्दल धन्यवाद चित्रा

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

शेवटी हिंदू घेतले...

बुकगंगावरुनः
मराठी:
हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे (शेवटी घेतलेच)
सौंदर्यानुभव - प्रभाकर पाध्ये (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'साहित्य आणि समीक्षा' ग्रंथ)
म्हैसूरचा वाघ - ह.ना. आपटे (टिपू सुलतानवरची कादंबरी)

फ्लिपकार्टवरुनः
उ:शाप - वि.स.खांडेकर

इंग्रजी:
The Big Sleep - Raymond Chandler (हा लेखक जेम्स हॅडली चेस पेक्षा जास्त छान लिहितो अशी माहिती मिळाली म्हणून घेतले)
Mallory - James Hadley Chase

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

शेवटी घेतलेसच तू. वाचून काढ

शेवटी घेतलेसच तू.
वाचून काढ आता आणि कसे वाटले ते सांग.

लवकरच वाचेन

होय मित्रा लवकरच वाचेन हे पुस्तक
नेमाडेंच्या या पुस्तकावर नक्की लिहिन Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

कालच खरेदी झाली :-)

  1. मनात - अच्युत गोडबोले. सायकोलॉजीविषयी आहे.
  2. रमलखुणा - जी. ए. कुलकर्णी. प्रवासी आणि इस्किलार..अजून काय. माझी जुनी कॉपी कुठे गेली काय माहीत म्हणून घेऊन टाकले./li>
  3. व्यासपर्व - दुर्गा भागवत. घ्यायचेच होते.
  4. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी - प्रतिभा रानडे. हे पण मस्ट होते
  5. गर्द रानात, भर दुपारी - विजय पाडळकर. Rashomon ह्या जपानी चित्रपटाविषयी. खूप दिवसांपासून शोधत होतो, अचानक सापडले मग घ्यावेच लागले! Wink
  6. तुम्ही आणि तुमची मुलं - पार्किन्सन, रुस्तुमजी आणि पावरी (अनुवाद: अविनाश भोमे) - मारिओ मिरांडाच्या देखण्या चित्रांनी सजलेले एक अप्रतिम पुस्तक. मूळ इंग्लिश पुस्तक आता मिळत नाही, पण हा अनुवाद अतिशय देखणा आणि सुरेख झालाय. नक्कीच शिफारस करीन!

खरेदी आवडली

मनिष मित्रा,

खूप छान खरेदी झाली. आवडली ....

व्यासपर्व आणि ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी ही दोन्ही पुस्तके भारी आहेत.
रमलखुणा म्हणजे जीएंचा मास्टरपीस Smile

बाकीची मी नाही वाचलेली. पण तुझ्यामुळे उत्सुकता वाढली आहे या पुस्तकांबद्दल.

वाचून झाली ही पुस्तके की नक्की सांग कशी आहेत ते...

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

थोडी भर

१. चोमा महार - शिवराम कारंथ - मराठी अनुवाद - श्यामलता काकडे (वल्ली चे रेकमेंडेशन )
२. शिवभूषण - निनाद बेडेकर (वल्ली ने स्त्रोत दिला आणि घेतले - हे पुस्तक अनेक दिवस निशाण्यावर होते)

३. हेमाद्री उर्फ हेमाडपंत यांचे चरित्र - केशव अप्पा पाध्ये

४. समुद्र - मिलिंद बोकील ( माझ्याकडचे हरवले म्हणून परत घेतले)
५. तुकाराम - भालचंद्र नेमाडे (या पुस्तकाच्या निर्मितीची अफलातून कथा इथे वाचायला मिळेल) - भालचंद्र नेमाड्यांची आता जवळपास सर्व पुस्तके माझ्या संग्रहात आली Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

परत एकदा दमदार खरेदी रे

परत एकदा दमदार खरेदी रे मित्रा.

हेमाद्रीपंताच्या चरित्राचा परिचय अवश्य लिही.

नेमाड्यांनी 'तुकाराम' लिहिलेय ही माहिती माझ्यासाठी नविनच आहे.

होय नक्की लिहीन

हेमाद्रीपंताच्या चरित्राचा परिचय अवश्य लिही.

होय नक्कीच लिहिन.

नेमाड्यांनी 'तुकाराम' लिहिलेय ही माहिती माझ्यासाठी नविनच आहे.
- हे पुस्तक नेमाड्यांच्या नावावर दिसले तेव्हा मलाही थोडा धक्काच होता. पण नंतर या पुस्तकाच्या जन्माची कथा वाचून तर अजूनच धक्का बसला होता. Wink म्हणून हे पुस्तक घेतले. मी दिलेल्या दुव्यावर काही पाने वाचता येतात त्यात ही साहित्यातील राजकारणामुळे हे पुस्तक कसे रखडले आणि शेवटी नेमाड्यांनी हे पुस्तक कसे लिहिले याची गम्मत वाचायला मिळेल. नक्की वाच ती

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नक्कीच वाचेन रे. दुपारी ओझरती

नक्कीच वाचेन रे. दुपारी ओझरती पाहिली होती. पण आता निवांत वाचून काढेन. पण हे पुस्तक तुला बुकगंगावरूनच मिळाले का? मी कुठ्ल्याही प्रदर्शनात अथवा दुकानात हे पुस्तक पाहिलेले नाही.

होय तेथूनच

बुकगंगावरुनच घेतले आहे. हे पुस्तक मिळते आहे हेच खूप आहे माझ्यासाठी Smile

कारण मी गेल्या वर्षी ३-४ ठिकाणी पाहिलेल्या नेमाड्यांच्या पुस्तकांत हे पुस्तक मिसिंग दिसले होते

सध्या नेमाड्यांची हिंदू वाचायचा मानस आहे Laughing out loud

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/