• '

२०११ सालात केलेली पुस्तकांची खरेदी आणि वाचन!

`पुवि' मित्र-मैत्रीणींनो,

नव्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नव्या वर्षात वाचन-संकल्प करावेत की करू नयेत ह्याविषयी विचार करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. २०११ साली खूप पुस्तकांची खरेदी झाली. त्याची नोंदही इथल्या `कोणती पुस्तके खरेदी केलीत?' ह्या धाग्यावर झाली. पण ती `सध्या काय वाचतायं?' ह्याच्यावर मात्र केली गेली नाही, कारण उघड आहे, ती वाचूनच झाली नाहीत.
ह्यामुळे जरा वाईट वाटलं. `मनात आलं-केली खरेदी' असं करताना आपलं काहीतरी चुकलं अशी एक बोच मनात निर्माण झाली. सर्वांशी बोलून मन थोडं शांत होईल म्हणून हा विषय आपल्यासारख्या पुस्तकप्रेमींच्या चर्चेला घ्यावासा वाटला. सागर-वल्ली ह्यांनाही ही कल्पना आवडली.

२०११ मध्ये किती पुस्तके घेतली? का घ्यावीशी वाटली? घेतल्यानंतर लगेच वाचली की ती लग्गेच न वाचल्याने मागे पडली? लग्गेच का वाचली नाहीत?
जी वाचली तिच्याबाबत अपेक्षापूर्ती झाली का? म्हणजे ती घेताना काही कारणाने घेतली आणि त्याबाबत संपूर्ण अथवा बरेचसे समाधान झाले का?
ह्या अभ्यासाचा उपयोग २०१२ मध्ये खरेदी करताना होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
शिवाय मागे राहिलेली पुस्तके वाचून होतील, नवीन खरेदी न केल्याने पैशाची बचत होईल.

`वाचावीशी वाटलेली,विकत घ्यावीशी वाटलेली पुस्तके' असा एक नवीन धागाही सुरु करता येईल.

२०११ मध्ये तशी बरीच पुस्तके

२०११ मध्ये तशी बरीच पुस्तके घेतली गेली.
जशी आठवतील तशी यादी येथे देतच आहे.

१ .द हॉबिट- जे. आर. आर. टॉल्किन- अनुवाद- मीना किणीकर
२. मुकज्जी - शिवराम कारंथ - अनु. मीना वांगीकर
३. चोमा महार - शिवराम कारंथ- अनु. उमा कुलकर्णी
४. वंशवृक्ष - भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी
५. अ‍ॅडम - रत्नाकर मतकरी
६. दा विन्ची कोड - डॅन ब्राऊन - अनु. अजित कात्रे
७. सीविच - अ‍ॅलिस्टर मॅक्लीन
८. युगंधर - शिवाजी सावंत
९. सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा. श्री. मोरवंचीकर
१०. भारतीय पुरालेखोंका अध्ययन - डॉ. शिवस्वरूप सहाय
११. सह्याद्री - स. आ. जोगळेकर
१२. डोंगरमैत्री- आनंद पाळंदे
१३. वन शॉट-ली चाईल्ड
१४. द अ‍ॅटर्नी
१५. बरसात चांदण्यांची-सुहास शिरवळकर
१६. जाता येता- सुहास शिरवळकर
१७.क्रमशः- सुहास शिरवळकर
१८.दुनियादारी- सुहास शिरवळकर
१९. हमखास - सुहास शिरवळकर
२०. पर्व - भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी

सध्या एव्हढी पटकन आठवलीत ती येथे दिली आहेत. यथावकाश बाकीची आठवतील तीही येथे देईनच.

यातील क्रमश:, पर्व आणि सातवाहनकालीन महाराष्ट्र पूर्ण वाचून झाले आहे आणि सध्या युगंधर वाचत आहे. मागचीच बरीच पुस्तके अजून पेंडींग असल्याने ती आधी पूर्ण करणार आता.

अरे वा!

अरे वा धागा उघडलाय वाटतं.. चित्रा यांचे आभार!
आत इथे एकेक पुस्तक अ‍ॅडवतो.. काहिंबद्दल लिहितोही.
लाल रंगः उत्साहाने विकत घेतली पण वाचुन व्हायचीयेत
निळा रंग: पुस्तके वाचलेलीच होती. घरातील कॉपी हरवल्यामुळे/ संदर्भग्रंथ म्हणून पुन्हा विकत घेतली
हिरवा रंगः पुस्तके विकत घेतली. वाचुन झाली व आवडली

विंग्रजी:

  • India After Gandhi - रामचंद्र गुहा : पुस्तक वाचले होतेच.. पण हे वाचण्याइतकेच संग्रही असणे महत्त्वाचे. माझ्या आवडत्या विषयांपैकी स्वातंत्र्योत्तर इतिहास, राजकारण, समाजकारण यावर इतका सखोल तरीहि रंजक भाषेत, चित्रदर्शी तरीहि ससंदर्भ - मुद्देसुद लिहिलेला संदर्भग्रंथ जवळ बाळगावा ही शिफारस!
  • Pride and Prejudice - जेन ऑस्टीन -- यावर मी पामर काय बोलणार. इंग्रजी भाषेचा कैफ, डौल, नजाकत, सामर्थ्य, नशा असे सारे काही एका पुस्तकात अनुभवायचे असेल तर या पुस्तकाला पर्याय नाही! चुकुनही कोणत्याही भाषेतील अनुवाद वाचु नये. कादंबरीच्या भन्नाट कथेइतकीच किंबहुना अधिक मजा यातील इंग्रजीत आहे असे मला वाटते.
  • 1984 - जॉर्ज ऑरवेल. अजून वाचुन पुर्ण व्हायचे आहे. मधे एकदा बाजुला पडले ते पडलेच! जितके वाचले तितके मात्र खूपच आवडले.
  • Steve Jobs (The Exclusive Biograph) -- भेट मिळाले. उत्साहाने दोनेकशे पाने वाचली. पुस्तकाचा वेग संथ आहे. तुर्तास वाचन थांबवले आहे. दुसरे काहि वाचायला नसेल तेव्हा वाचेन

मराठी:

  • शापित यक्ष: सध्या वाचतो आहे. अप्रतिम आहे
  • व्यासपर्व: एका कवीच्या नजरेतून महाभारताला एक काव्य म्हणूनच नव्हे तर प्रत्येक पात्रप्रयोजनाला उलगडवून दाखवणारे आणि महाभारताकडे एका वेगळ्याच नजरेतून पहायला लावणारे पुस्तक.
  • प्रेषित- अनेकदा वाचले आहे. केवळ संग्रही असावे म्हणून घेतले.
  • गंधर्व -- बाळकृष्ण प्रभुदेसाई -- कथासंग्रह नंदनच्या शिफारसीवरून घेतले होते. आणि यातील एकेक उत्तमोत्तम चित्रदर्शी कथांनी (त्याही कोकणात घडणार्‍या)मनाचा ठाव घेतला. पुस्तक सुरु केल्यावर खाली ठेववतच नाही
  • त्या वर्षी -- शांता गोखले -- यावर इतके लिहुन झाले आहे की मी काय भर घालु. आवडले इतकेच म्हणतो.
  • किमया -- माधव आचवल -- खरोखर किमया. 'घर' या संज्ञेला 'बांधकाम' करण्याच्या पलिकडे बघायला शिकवणारं पुस्तक
  • शाळा - मिलिंद बोकील -- Smile असो.
  • आहे मनोहर तरी
  • साखरेचं बाळ
  • आवरण
  • कोबाल्ट ब्लू
  • मराठी भाषेचे मुळ
  • पार्टनर
  • बरेच काही उगवून आलेले
  • अ‍ॅन फ्रँकची डायरी (अनुवाद)

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

साखरेचं बाळ

साखरेचं बाळ पुस्तकाबद्दलही थोडे लिही ना. वंदना विटणकरांच्या कवितांचे पुस्तक आहे का ते?

लिहिलंय बघ

नाहि. अनिल एकबोटे यांनी अनुवाद केलेलं छोट्यांचं छोटेखानी पुस्तक आहे
इथे लिहिलंय बघ त्याबद्दल

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

२०११ साली वाचलेली पुस्तकं

२०११ साली मी वाचलेल्या पुस्तकांची यादी:

शहाण्यांचा सायकिऑट्रिस्ट डॉ. आनंद नाडकर्णी
शोध व शोधक डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे
निसर्गपूर्ण सं श्रीनिवास पंडित
नाव आहे चाललेली विजय पाडळकर
आमची संस्कृती डॉ इरावती कर्वे
रधों निवडक शारदेची पत्रे सं अनंत देशमुख
सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण वसंत पळशीकर
महर्षी ते गौरी मंगला आठलेकर
कर्ण पिशाच्च डॉ बाळ फोंडके
देवचाफा विद्याधर पुंडलीक
शिणेमाच्या 'ष्टोरी'मागील गोष्ट विजय पाडळकर
बखर पर्यावरणाची अतुल देऊळगावकर
जंतर मंतर सूर्यभट्ट
अकथित सावरकर मदन पाटील
मनोगती डॉ. आनंद नाडकर्णी
'मुक्तांगणची गोष्ट' डॉ. अनिल अवचट
गीतयात्री माधव मोहोळकर
पानीकम: भाग दोन संजय पवार
पानीकम: भाग एक संजय पवार
रधों 'समाजस्वास्थ्य'कार डॉ. अनंत देशमुख
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण सुधीर पानसे
मन्वंतर: समूहाकडून स्वत:कडे सुरेश द्वादशीवार
स्नेहगंध डॉ. विठ्ठल प्रभू
माझ्या सार्वजनिक जीवनाची बखर डॉ. शरश्चंद्र गोखले
सारांश अरुण टिकेकर
Our Companion Philodopher Guide Narayan Desai
Solar Energy Arvind Gupta
Gopal Ganesh Agarkar Arvind Ganachari
My Family and other animals Gerald Durell
Exasperating Essays DD Kosambi
Six Impossible Things Before Breakfast Lewis Wolport
Trick or Treatment Simon Singh, Edward Ernst
Superstition Robert L Park
Pandora Seeds: The unforeseen cost of civilisation Spencer Wells
10 Questions Science can't answer (yet) Michael Hanlon
Hidden Harmonies Robert Kaplan
Science and Religion Ed. Paul Kurtz

यातील बहुतेक पुस्तकाबद्दल येथे लिहिलेले आहे.

याबद्दल

याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत सर. दर सोमवारी आम्ही तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत असतो Smile

माझी यादी

२०११ या वर्षात खरेदी भरपूर झाली पण वाचन मात्र खूप कमी झाले. २०१२ या वर्षाचा संकल्प हाच आहे की खरेदी कमी आणि वाचन जास्त. Smile

संदर्भ मिळाले तशी यादी देतोयः

घेतलेली पुस्तके
मराठी:

१. डिजिटल फोर्ट्रेस - डॅन ब्राऊन - अनु: अशोक पाध्ये
२. डिसेप्शन पॉईंट - डॅन ब्राऊन - अनु: अशोक पाध्ये
३. शोध मर्ढेकरांचा - विजया राजाध्यक्ष
४. उत्खनन - गौरी देशपांडे
५. माणसं - अनिल अवचट (१२ वी आवृत्ती)
६. वाडा चिरेबंदी - महेश एलकुंचवार (५वी आवृत्ती)
७. कोबाल्ट ब्लू - सचिन कुंडलकर (क्रेडीट गोज टू मणिकर्णिका )
८. संभाजी - विश्वास पाटील
९. राधेय - रणजित देसाई
१०.श्रीमानयोगी - रणजित देसाई
११.आवरण - एस.एल.भैरप्पा (क्रेडीट गोज टू मणिकर्णिका )
१२. स्टार हंटर्स - सुहास शिरवळकर
१३. साखरेचं बाळ (क्रेडीट गोज टू ऋषिकेष)
१४. छंद माझे वेगळे - गो.नी.दांडेकर
१५. मौनराग - महेश एलकुंचवार
१६. किमया -- माधव आचवल (क्रेडीट गोज टू चित्रा)
१७. व्यासपर्व - दुर्गा भागवत
१८. सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा. श्री. मोरवंचीकर
१९. लाट - हमीद दलवाई
२०. वंशवृक्ष - एस एल भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी
२१. एल्गार - सुरेश भट (कविता संग्रह)
२२. बॅरिस्टरचं कार्टं - हिम्मतराव बावस्कर
२३. पारध - अशोक जैन - श्रामोच्या वेच्यामुळे
२४. अंताजीची बखर - नंदा खरे
२५. बखर अंतकाळाची - नंदा खरे
२६. वनवास - प्रकाश नारायण संत
२७. सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर
२८. नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर
२९. अरेबियन नाईट्स चे सर्व १६ खंड (मूळ लेखक सर रिचर्ड बर्टन , मराठी अनुवाद : गौरी देशपांडे)
३०. अर्धी मुंबई - युनिक फीचर्स
३१. श्रीयुत गंगाधर टिपरे - दिलिप प्रभावळकर
३२. विज्ञानवेध - निरंजन घाटे
३३. वारी एक आनंदयात्रा - संदेश भंडारे
३४. असाही एक महाराष्ट्र - संदेश भंडारे
३५. हसत खेळत ध्यानधारणा - ओशो
३६. डार्विन आणि जीवसृष्टी रहस्य (११ लेखकांचे लेख)
३७. सोनेरी टोळी - नाथमाधव (कादंबरी)
३८. आर्य चाणक्य - जनार्दन ओक (कादंबरी)
३९. क्षितिज - सुहास शिरवळकर (कादंबरी)
४०. झूम - सुहास शिरवळकर (कादंबरी)
४१. तो - सुहास शिरवळकर
४२. सत्र - सुहास शिरवळकर
४३. मुक्काम शेंडेनक्षत्र - भा.रा. भागवत
४४. संपूर्ण शेर‌लॉक होम्स - गजानन क्षीरसागर
४५. अणुविवेक - दिलिप कुलकर्णी
४६. कोवळे दिवस - व्यंकटेश माडगुळकर
४७. सनसनाटी - सुहास शिरवळकर
४८. माणूस - मनोहर तल्हार
४९. माझे विद्यापीठ - नारायण सुर्वे
५०. मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास - पु.ल.देशपांडे
५१. असा मी असामी - पु.ल.देशपांडे
५२. व्यक्ती आणि वल्ली - पु.ल.देशपांडे
५३. पानझड - ना. धों. महानोर
५४. पावसाळी कविता - ना. धों. महानोर
५५. छंदोमयी - कुसुमाग्रज
५६. व्यक्ती आणि वल्ली - पु.ल. देशपांडे
५७. कलेचे कातडे - आनंद यादव
५८. एक शून्य मी - पु.ल. देशपांडे
५९. जोयानाचे रंग - कविता महाजन
६०. धुळीचा आवाज - कविता महाजन
६१. टू द लास्ट बुलेट - विनिता कामठे
६२. सलाम व्हिएतनाम - जे एस आपटे
६३. आश्रम हरिणी - वा. म. जोशी
६४. डॉ. होमी भाभा - जयंत एरंडे
६५. आणि चिनार लाल झाला - प्रभाकर पेंढारकर
६६. विवेकसिंधु ( आध्यकवि मुकुंद विरचित मराठीतील पहिल्या काव्याचा दावा असणारे पुस्तक )
६७. यमुनापर्यटन - बाबा पदमनजी (मराठी साहित्यातील पहिली कादंबरी)
६८. श्रीमद् भगवद गीतारहस्य - लोकमान्य टिळक
६९. साहित्याची भाषा - भालचंद्र नेमाडे
७०. नेनचिम - नारायण धारप
७१. देवाज्ञा - नारायण धारप
७२. गारंबीची राधा - श्री.ना.पेंडसे
७३. एक झुंज वार्‍याशी - पु. ल. देशपांडे
७४. तुका म्हणे आता - पु. ल. देशपांडे
७५. पैस - दुर्गा भागवत
७६. सिंहासन बत्तिशी - ह.अ.भावे
७७. दुपानी - दुर्गा भागवत
७८. पाली प्रेमकथा - दुर्गा भागवत
७९. देवदासी,पोतराज,वाघ्या-मुरळी, रूप-स्वरूप-विकृती - बळवंत कांबळे
८०. मर्‍हाटी लावणी - म. वा. धोंड
८१. जा ओलांडुनि - एस.एल. भैरप्पा
८२ ... आणि पानिपत - संजय सोनवणी

इंग्रजी:
१. अ‍ॅनिमल फार्म - जॉर्ज ऑरवेल
२. १९८४ - जॉर्ज ऑरवेल
३. अदर साईड ऑफ मिडनाईट - सिडने शेल्डन
४. शी - रायडर हॅग्गार्ड
५. A Coffin From Hong Kong
६. Pride and Prejudice ( ऋ मुळे घेतले)
७. राजतरंगिणी - कल्हण
८. द टिपिंग पॉईंट - मॅल्कोम ग्लॅड्वेल


वाचलेली:

वाचनाच्या नावाने शंखच आहे या वर्षी तरी पुढील पुस्तके वाचली.

१. डिजिटल फोर्ट्रेस - डॅन ब्राऊन - अनु: अशोक पाध्ये
२. डिसेप्शन पॉईंट - डॅन ब्राऊन - अनु: अशोक पाध्ये
३. स्टार हंटर्स - सुहास शिरवळकर
४. साखरेचं बाळ
५. सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर
६. क्षितिज - सुहास शिरवळकर
७. झूम - सुहास शिरवळकर
८. तो - सुहास शिरवळकर
९. सत्र - सुहास शिरवळकर
१०. मुक्काम शेंडेनक्षत्र - भा.रा. भागवत
११. संपूर्ण शेर‌लॉक होम्स - गजानन क्षीरसागर ( अर्धवट वाचले आहे)
१२. सनसनाटी - सुहास शिरवळकर
१३. पानझड - ना. धों. महानोर
१४. पावसाळी कविता - ना. धों. महानोर
१५. पैस - दुर्गा भागवत
१६. सिंहासन बत्तिशी - ह.अ.भावे
१७. पाली प्रेमकथा - दुर्गा भागवत
१८. समांतर - सुहास शिरवळकर
१९. सिंहासन बत्तिशी - ह.अ.भावे
२०. ... आणि पानिपत - संजय सोनवणी

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

चित्रा, २०११ मध्ये किती

चित्रा,

२०११ मध्ये किती पुस्तके घेतली?

तशी बरीच घेतली गेली की!

का घ्यावीशी वाटली?

पक्की पुस्तकवेडी माणसे घरी आहेत ना माझ्या त्यांना नवनवे वाचनखाद्य मिळत रहावे म्हणून. स्वार्थाबरोबर परमार्थ म्हणतात तो हाच का गं? Smile

घेतल्यानंतर लगेच वाचली की ती लग्गेच न वाचल्याने मागे पडली?

माझे म्हटल्यास घेतल्याघेतल्या वाचले अशी काही निवडकच पुस्तकं निघाली. त्यातले सर्वात अलिकडचे म्हटल्यास उत्तम कांबळे यांचे 'आई समजून घेताना...'. घेते तेव्हा इतकी पुस्तके घेतली जातात की ती सर्व एका दमात वाचून काढायची म्हटल्यास तेच एक पूर्णवेळ काम होऊन बसायचीच शक्यता अधिक कारण एखादे पुस्तक हप्त्याहप्त्याने वाचणे मला जमत नाही.. एकदा घेतले की तहानभूकेसकट सगळेच आयुष्य बाजूला ठेवून वाचन करत बसण्याकडे माझा कल जास्त असतो. घरची आणि ऑफिसची कामे आहेत म्हटले की हे नखरे कसे जमायचे? आईबाबांचे म्हणशील तर पुस्तककिडे आहेत ते अक्षरशः.. परवा मी इमानदारीने कव्हर्स घालत होते पुस्तकांना तर दोघे दोन दिशांना पुस्तके घेऊन वाचत बसले होते!!! मीही म्हटले मनातल्या मनात.. करून घ्या ऐश.. मी रिटायर झाले की मीही तसेच करेन! Wink

लग्गेच का वाचली नाहीत?

बव्हंशी नाही वाचली गेली हे खरे आहे. परवा घेतलेल्या पुस्तकांना कव्हर्स लावायचे काम सर्वस्वी आईवर पडू नये म्हणून ते करायला घेतले आणि त्यातच वेळ गेला. लायब्ररीयनचीही तर नोकरी आहे ना माझ्यामागे..

जी वाचली तिच्याबाबत अपेक्षापूर्ती झाली का?

पूर्णपणे.

म्हणजे ती घेताना काही कारणाने घेतली आणि त्याबाबत संपूर्ण अथवा बरेचसे समाधान झाले का?

संपूर्ण समाधान झाले.

शिवाय मागे राहिलेली पुस्तके वाचून होतील,

का नाही.. नक्कीच!

नवीन खरेदी न केल्याने पैशाची बचत होईल.

असे का? समज झाली २०११वर्षी जरा जास्त पुस्तकखरेदी तर त्यावर लगाम म्हणून २०१२ मध्ये पुस्तकखरेदीवर अंकुश ठेवायची गोष्ट केली असतीस तर मान्य केली असती पण अजिबातच खरेदी करायची नाही म्हणतेयस ते अगदीच दुसरे टोक गाठल्यासारखे होतेय, असे नाही का वाटत तुला? दर महिन्याला २०० रुपये वगैरे अशी मर्यादा लावून घेता येईल की.. जेणेकरून खरेदीचे सुखही मिळवता येईल आणि पैशाची उधळपट्टी केली असेही वाटणार नाही. काय? आणि जर का गेल्या वर्षीच्या पुस्तकखरेदीबद्दल खूपच बोच असेल तर धपाध्धप पुस्तके वाचून घे ती.. आपोआप कौतुक वाटेल तुला स्वतःचेच अशा सुंदर पुस्तकसख्यांची निवड केल्याबद्दल. पुस्तक खरेदीचा पश्चात्ताप मलातरी आजवर कधी झाला नाही.. पण हो, माझ्या आयुष्यात एकदा छोटासा आर्थिक पेचप्रसंग आला होता तेव्हा मी केलेल्या माझ्या अत्यंत लाडक्या पुस्तकांच्या विक्रीबद्दल मात्र आत्ता या क्षणालाही मनात दु:ख आहे!

चिटिंग चिटिंग!

चिटिंग चिटिंग! यादी देणे कसे टाळले बघ! Wink Tongue

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

नाही.. नाही.. चिटींग नाही..!

ऋ, पुस्तकांची यादी द्यायची असल्यास 'माझा ग्रंथसंग्रह'मध्ये देता येईल की, इथे आणिक प्रतिसादात ती कशाला? खरेतर चित्राने पुस्तकांची यादी मागितली नाही म्हणूनच खास या धाग्यावर मला प्रतिसाद द्यावासा वाटला आणि मी तो दिलाही! पुस्तकांची त्यांच्या लेखकांच्या नावासकटची यादी तसे पहाता कुठेही मिळेल.. मिळणार नाही तर ते आहे ती प्रत्यक्ष पुस्तके आणि ती घेऊन/वाचून/देऊन कोणाला काय वाटले, पुस्तक कसे होते वगैरे माहिती. अशी माहिती वाचायलाच मला आवडते मग त्यानिमित्ताने आपसुक झालेली यादी कितीही छोटी वा मोठी असली तरीही बेहत्तर! मनात भावना ताज्या असतील तरच मी थोडेफार तरी लिहू शकते नसता मला एकही शब्द लिहिणे जमत नाही कशाहीबद्दल. विचित्र वाटेल पण पुस्तकाचे वा लेखकलेखिकेचे नावही लक्षात रहाणे हा माझ्याबद्दल तसा विरळाच अनुभव म्हणता येईल. वरच्याही प्रतिसादात 'आई समजून घेताना...' वाचून तसे ताजेच आहे अजून मनात म्हणून लगेच लिहिले गेले. सांगण्याचे तात्पर्य हे की सहसा मी यादी देणे टाळते हे जरी खरे असले तरी या धाग्यावर ती देणे अपेक्षितच नाही असे वाटल्याने मी इथे प्रतिसाद लिहिलाय.. त्यामुळे चिटींगचा प्रश्न येत नाही. Smile

आता माणिक कोतवाल यांनी लिहिलेले दूरदर्शी घेतलेय वाचायला.. वाचल्यावाचल्या गॅलिलिओबद्दल दोन ओळी लिहायला जमतील का ते बघायचेय.

:)

अगं, गमतीत/खट्याळपणे लिहिलं होतं चिटींग म्हणून तर तु एकदम सिरीयरली घेऊन प्रतिसाद दिलायस Smile

ऋ, पुस्तकांची यादी द्यायची असल्यास 'माझा ग्रंथसंग्रह'मध्ये देता येईल की, इथे आणिक प्रतिसादात ती कशाला?

त्या निमित्ताने वाचलेल्या पुस्तकांवर दोन ओळी लिहिल्या जातात. माझा ग्रंथसंग्रह मधे दिसते ती केवळ यादी.. इथे लिहिताना.. आवडलं नाहि आवडलं त्याच बरोबर विषेश आवडलेल्या पुस्तकाबद्दल दोन ओळी येतील असे वाटले होते. असो.

सहसा मी यादी देणे टाळते हे जरी खरे असले

म्हणूनच वर डिवचले होते Wink आणि हलके घ्यावे यासाठी स्मायलीही दिल्या होत्या

तरी या धाग्यावर ती देणे अपेक्षितच नाही असे वाटल्याने मी इथे प्रतिसाद लिहिलाय..

बरोबर. या धाग्यावर ते अपेक्षित नाही

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

ऋ, तू खट्याळपणे लिहिलेस हे

ऋ,

तू खट्याळपणे लिहिलेस हे कळलेच होते मला पण तरीही त्यानिमित्ताने थोडे सिरियस विचार लिहून टाकले मी. Smile

आई समजून घेताना... हे पुस्तक मला (आणि बाबांनाही) खूपच आवडले. बलवंत मधल्या प्रदर्शनात उभ्याउभ्या वाचून घ्यावेसे वाटले म्हणून घेतले होते. घरी आल्यावर पूर्ण वाचून काढले आणि पुस्तकनिवड अजिबात न चुकल्याची पावतीच मिळाली. शिकत असलेला/शिकलेला, शहरी वातावरणाला रुळलेला मुलगा आणि अशिक्षित, खेड्यातली आई, त्या दोघातली जनरेशन गॅप, भावना-विचारांमधला फरक आणि तरीही एकमेकांवरचे प्रेम वगैरे गोष्टी इतक्या नेमक्या आणि सुरेख मांडल्या आहेत या छोटेखानी पुस्तकात की बस्स! अजून काय लिहावे ते समजत नाहीये (नेहमीप्रमाणेच!)..

अरे वा!

अरे वा! किंचित वेगळा प्लॉट आहे. शोधतो आता लायब्ररीत.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

आनंद झाला

वेदश्रीला पुन्हा सक्रिय पाहून आनंद झाला.

यादी बघायला नक्कीच आवडेल. ती देता आली तर बघ.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

गेल्या सहा महिन्यांची खरेदी

गेल्या सहा महिन्यांची खरेदी देते आहे.
इंग्रजी पुस्तकांमध्ये-
१. दॅट लाँग सायलेन्स-शशी देशपांडे
२. द हाऊस ऑफ ब्लू मँगोज- डेव्हिड दाविदार
३. नो कंट्री फॉर विमेन- तस्लिमा नासरीन
३. जेजुरी- अरुण कोलटकर
४. काफ्का ऑन द शोअर- मुराकामी
५. नॉर्वेजियन वूड- मुराकामी
६. लेडे चॅटर्लीज लव्हर- डी.एच. लॉरेन्स
७. कलेक्डेट स्टोरीज ऑफ काफ्का
८. कलेक्टेड स्टोरीज ऑफ गोगोल

मराठीत-
१. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी- ह.मो.मराठे
२. अफवा खरी ठरावी म्हणून- प्रज्ञा दया पवार
३. चारशे कोटी विसरभोळे (नाटक)- मकरंद साठे
४. निवडक सदानंद रेगे- संपादन- वसंत आबाजी डहाके
५. सतीश आळेकरांची सर्वच्या सर्व नाटकं (कुतुहल असणारयांनी व्य.नि करावा, पूर्ण लिस्ट पाठवली जाईल)

हिंदीत-
१. दिवारमें एक खिडकी रहती थी- विनोदकुमार शुक्ल
२. नौकर की कमीज- विनोदकुमार शुक्ल
३. पिली छत्रीवाली लडकी- उदयप्रकाश

यातली सर्व पुस्तकं मी एका लॉटमध्ये घेतली नाहीत. पण मला भस्म्या असल्याने आणि वाचनाचा वेग जरुरीपेक्षा चांगलाच असल्याने एकच पुस्तक तीनतीनदा वाचूनही एखाददुसरया पुस्तकाची खरेदी लगेच होतेही.
वरच्या यादीतली सर्व पुस्तकं मी वाचलेली आहेत. प्रायोगिक तत्वावर लायब्ररीत, एखाद्या मित्राकडे-मैत्रीणीकडे मी याहून जास्त पुस्तकं वाचली, त्यातली जी आवडली, संग्रही असावीत असं वाटलं ती खरेदी केलीयेत. लिस्ट तुमच्यासमोर आहे.
एखादं पुस्तक खरेदी केलंय पण महिनोंमहिने पडून आहे, अजून वाचायला वेळ मिळाला नाही असं अद्याप झालेलं नाहीये, पुढचं काही ठाऊक नाही. पुस्तक वाचण्यासाठी एखाद वेळेस झोप कमी करुन, टिव्ही- पिक्चरचा वेळ काँप्रोमाईज करुन वेळ काढला जातो (सुदैवाने मला असं करता येतं) Smile

कमी

इथल्या सगळ्यांची यादी बघून धडकीच भरली. मी मोजकीच पुस्तके घेतली आणि वाचली.
प्रकाश नारायण संतांची 'वनवास', 'शारदा संगीत' आणि 'पंखा' घेतली.
रारंग ढांग मुळे प्रभाकर पेंढारकरांचे 'चक्रीवादळ' घेतले. फारसे आवडले नाही.
'१९८४', विश्वास पाटलांचे 'क्रांतिसूर्य' घेतले आहे, पण अजून वाचले नाही आहे.
'पाडस' आणि 'वैखरी' ही खूप आवडली. 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' घेतले. पुलंचे 'मित्रहो', 'मुक्काम शांतिनिकेतन' आणि वि.वा. शिरवाडकरांचे 'कल्पनेच्या तीरावर' आणि 'नटसम्राट' घेतले. ना.सं.चे 'शिकस्त' घेतले.
बरीचशी आवडली.

मिहिर

जोरात आहेत की याद्या चित्रा,

जोरात आहेत की याद्या Smile
चित्रा, मस्त धागा काढलास. याद्या पाहूनच दडपण आले आहे.