'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ही पुस्तके कुठे मिळतील
प्रकाशक:
गोनिदांची तांबडफुटी तसेच लक्ष्मीसेतू/गडदेचा बहिरी हि पुस्तके आवृत्ती उपलब्ध नसल्याने मिळत नाहीत तरी ती कुठे मिळू शकतील हे कृपया जाणकारांनी सांगावे.





औटॉफप्रिंट आहेत. लायब्ररीतून
औटॉफप्रिंट आहेत. लायब्ररीतून आणून झेरॉक्स करावीत (फुकटचा सल्ला)
- मेघना भुस्कुटे
पुण्यात नीलायमशेजारी
पुण्यात नीलायमशेजारी पाथफांईडर आहे, तिथे पाहिले का?
पाहीले
पाहीले पण मिळाले नाही.
तांबडफुटी रसिकमध्ये
रसिकच्या ऑनलाईन दुकानात चेकले तर तांबडफुटी उपलब्ध आहेसे दिसतेय.. बाकीची दोन नाही सापडली त्यांच्या संग्रहात. या पुस्तकांच्या प्रकाशकाकडे चौकशी केलीत का? एखादवेळेस एखादी प्रत असेल त्यांच्याकडेच तर?
नाते मनामनाचे पुस्तक शोधतेय...
माझ्याकडे साधारण एक-दिड वर्षापुर्वीपर्यंत 'नाते मनामनाचे' नावाचे एक अप्रतिम पुस्तक होते. परवा यादी करायचा कार्यक्रम हाती घेतल्यावर जेव्हा लक्षात आले की हे पुस्तक गायब आहे तेव्हा मला आणि आईला खूपच चुटपुट लागून राहिली आहे. हे पुस्तक म्हणजे लेखिकेने निरनिराळ्या क्षेत्रातल्या (अगदी बालरोग तज्ज्ञ, फॅमिली डॉक्टर, सेक्सॉलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्ट वगैरे) डॉक्टरांच्या मुलाखती घेऊन त्यांचे केलेले संकलन आहे. त्या मुलाखती अत्यंत सुरेख लिहिलेल्या आहेत सर्वच अर्थाने. ते पुस्तक शोधायला माझ्याकडे त्याच्या लेखिकेचे अथवा प्रकाशकाचेही नाव नाही, हा आणखीन मोठा दैवदुर्विलास.
कोणाला या पुस्तकाबद्दल कसलीही माहिती असल्यास सांगावी, ही विनंती. साक्षात पुस्तकच कुठे मिळू शकेल सांगता आले तर क्या केहने!
'एका काडातून क्रांती ' हे
'एका काडातून क्रांती ' हे जपानी भाषेतून मराठीत अनुवादित झालेले पुस्तक आहे. एका जपानी शेतकर्याची,त्याने केलेल्या प्रयोगांची उत्तम माहिती यात आहे. लेखक अनुवादक माहीत नाहीत. हे पुस्तक कसे आणि कुठे शोधू?
माया
हे मूळ पुस्तक "The One-Straw
हे मूळ पुस्तक "The One-Straw Revolution" by Masanobu Fukuoka आहे. ते अतिशय गाजलेले आहे, नेटवर मोफत पीडीएफ मिळू शकेल.
अगदी बरोब्बर. पण याचा अनुवाद
अगदी बरोब्बर. पण याचा अनुवाद मराठीत असल्याचंच मला ठाऊक नव्हतं. कुणी केलाय, कुणाला ठाऊक असलं तर सांगा.
- मेघना भुस्कुटे
वेणू पळशीकर
'एका काडातून क्रांती' हा शब्द गुगलल्यावर http://www.esakal.com/esakal/20100516/5700218263385143416.htm ही लिंक मिळाली. त्यातल्या माहितीनुसार हे पुस्तक वेणू पळशीकर यांनी मराठीत अनुवादित केले आहे. प्रकाशक मात्र कोण ते कळलेले नाही.
मनिष, खूप दिवसांपासून या
मनिष,
खूप दिवसांपासून या पुस्तकाच्या शोधात होते. आज सापडले. मनःपूर्वक धन्यवाद !
माया
फुला
'फुला' नावाचे एक छोटेसे पुस्तक आमच्याकडे होते पण आता हरवले आहे. यात फुला नावाच्या एका मुलाला फुलांवर निरनिराळे प्रयोग करण्याचा छंद असतो.. छंद काय वेडाच असतो तो त्याबद्दल असे म्हणावे असेच. काहितरी कारणाने त्याला तुरूंगात टाकले जाते तर तो तिथेही त्याच्या कोठडीत एक फुलाचे झाड लावतो. जेलच्या जेलरची मुलगी असते कळी तिला फुलाचा हा ध्यास खूप आवडत असतो. ती त्याला त्यात मदत करायचे ठरवते. इतकेच आठवतेय कारण अगदी लहान असताना वाचलेली कथा आहे ही. बहुतेक सानेगुरूजींनी लिहिलेली असावी असा कयास आहे पण पुस्तकाचे नाव, प्रकाशक माहिती नसल्याने पंचाईत आहे. कोणाला माहिती असल्यास कृपया मदत करावी.
>>सानेगुरूजींनी लिहिलेली
>>सानेगुरूजींनी लिहिलेली असावी असा कयास आहे.
बरोबर आहे, पुस्तकाचे नाव आहे "फुलाचा प्रयोग".
हे साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग १ ते १०, या मलिकेतील आहे. य मालेतील सर्व अनुवाद छान आहेत. विशेष्करून "मनूबाबा".
जियो!
>पुस्तकाचे नाव आहे "फुलाचा प्रयोग"!
काय बोलू तेच समजत नाहीये! खूप मोठ्ठे काम केलेस आज तू माझे. जियो!
मला वाट्ला कि उशीर झाला!!!
मला वाट्ला कि उशीर झाला!!! कोणितरि आधीच दिले असेल!!!!
आजन्म ऋण!
वाचायला येत नव्हते तेव्हा बाबांच्या उरावर बसून (बोलायची पद्धत नव्हे, प्रत्यक्षात बसायचे!) घोडाघोडा करत त्यांना गोष्टी सांगायला सांगायचे तेव्हा शंकर-पार्वतीचं विमान निघायचं आणि आठवतील तशा शब्दांत सानेगुरूजींच्या गोष्टी सांगत भिरभिरायचं.. मी बाबांच्या पोटावर पालथी पडून झोपी जाईतो! वाचायला जमत गेले तेव्हा फुलासारख्याच जीर्ण पानांतल्या सोबतींनी लहानपण बहरले होते माझे. माझ्या आठवणीतला 'फुला' अगदीच जीर्ण पानांतला होता. पाठपोटाची पाने कधी नव्हतीच माझ्या फुलाला आणि उरलेली देखील काळसर पिवळी पडलेली होती त्याची. अधलीमधली पाने मधून टरकावलेली किंवा कोपर्याकडचा भाग फाडलेली अशी होती. काहीकाही पाने तर गायबच होती पण तरीही नसलेल्या पानांमध्ये काय असेल याची हुरहुर बाळगत अंदाजाअंदाजाने वाचत जायचे. परवा ज्ञानगंगेत अगदी चकचकीत पानांतला फुला पाहिला तेव्हा आनंदातिशयाने पाणीच उभं राहिलं माझ्या डोळ्यात. किती वेळ त्या परिपूर्ण सौंदर्याने नटलेल्या पुस्तकावरून मायेने हात फिरवत बसले होते माहिती नाही. थरथरत्या हाताने एकेक पान उलटवून परत एकदा फुला वाचायला घेतला मी तिथेच तर भिजलेल्या डोळ्यांनी काहीच वाचवेना होतहोते मला. आठवणींचे मोहोळ उठले होते अगदी. फुलाला अलगद घरी घेऊन आले आणि अख्खा दिवस त्यातला एकेक शब्द वाचण्यात गढून गेला माझा. म्हटले तर केवढुसे ते पुस्तक पण माझ्या आनंदाचा केवढा मोठा ठेवा साठलाय त्यात!
फुला शोधण्यात मदत केलीस त्याबद्दल आजन्म ऋणी आहे गं रोचीन मी तुझी!
>>वाचायला येत नव्हते तेव्हा
>>वाचायला येत नव्हते तेव्हा बाबांच्या उरावर बसून (बोलायची पद्धत नव्हे, प्रत्यक्षात बसायचे!) घोडाघोडा करत त्यांना गोष्टी सांगायला सांगायचे तेव्हा शंकर-पार्वतीचं विमान निघायचं आणि आठवतील तशा शब्दांत सानेगुरूजींच्या गोष्टी सांगत भिरभिरायचं..
यातून १ चांगला लेख होउ शकेल!! प्रयत्न कर पाहू!!!
>>फुला शोधण्यात मदत केलीस त्याबद्दल आजन्म ऋणी आहे गं रोचीन मी तुझी
हे लिहून तु मला अगदि परकं करुन टाकालस!!
ए गपे!
>हे लिहून तु मला अगदि परकं करुन टाकालस!!
ए गपे!
पीडीएफ ची लिंक
चांगल्या मराठी पुस्तकांच्या पीडीएफ ची लिंक कुणी सांगेल का मला ?
थोडे दुवे
अहो सुषमा,
गाजलेली पुस्तके पीडीएफ मधे मिळणे तसे कठीण आहे. पण काही दुवे देतो तेथून डाऊनलोड करुन घेऊ शकता
http://arvindguptatoys.com/
यात मराठी विभागात चिक्कार वैज्ञानिक पुस्तके आहेत
मी पुढील दोन दुव्यांवर काही पुस्तके अपलोड केली आहेत
http://www.esnips.com/web/DurmilMarathiPustake/
http://www.esnips.com/web/MarathiPDFs
बघा काही उपयोग होतो आहे का ते
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
धन्यवाद सागरजी , खूप आभारी
धन्यवाद सागरजी ,
खूप आभारी आहे .
तुमच्या कडे कुठली पुस्तके आहेत. पीडिएफ फॉरमेट मध्ये
दुव्यांमध्ये आहेत तेवढीच
पीडीएफ फॉर्मेट मधे माझ्याकडे
हिंदी चंद्रकांता
छत्रपति शिवाजी महाराजांवर सभासद कृत बखर
व अरविंद गुप्तांची पुस्तके आहेत
ती सर्व वर उल्लेखिलेल्या दुवात दिली आहेत.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अजून पीडीएफ
http://www.4shared.com/dir/5VyBMnjz/MarathiPDF.html
येथे काही पीडीएफ मिळतील
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
दुर्गाबाईंचे अस्वल हे पुस्तक
दुर्गाबाईंचे अस्वल हे पुस्तक आहे का कोणापाशी? किंवा कुठे मिळेल?