• '

श्यामची आई

पुस्तकाचे नाव: 

साने गुरुजीनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे.कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. आपल्या लहानपणी हे पुस्तक वाचलेले पालक आपल्या मुलांनीही हे पुस्तक वाचावं म्हणून आग्रह धरतात, काहींच्या मते आजच्या मुलांना अश्या पुस्तकांची गरज नाही असे वाटते.मुलांवर वाढ्णारे ताण ,आत्महत्या.मुलांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा,बिघडत चाललेली आजची पिढी या सर्वाचा विचार करता. ‘ अंगाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनालाही घाण लागणार नाही म्हणून जपत जा ‘ असे सांगणार्‍या श्यामची आईची आणि साने गुरुजीनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकाची आज गरज वाटते का ?

मला

चर्चाविषय भारीच आहे Smile

मला वैयक्तिकदृष्ट्या ते पुस्तक विषेश आवडत नाही. 'छान छान' चा कळस आहे.

मला तर लहानपणी वाचले तेव्हा

मला तर लहानपणी वाचले तेव्हा पण फारसे आवडले नव्हते...

निखिल देशपांडे

मला तर लहानपणी पण हे पुस्तक

मला तर लहानपणी पण हे पुस्तक विशेष आवडले नाही..उगाच मुलांनी वाचायची पद्धत असते म्हणून वाचले असावे..खरंच खूपच गोडगोड आहे..पण ते पुस्तक वाचुन रडणा-या मैत्रिणी पण माझ्या भोवती होत्या !

साने गुरुजींच्या कविता मला जास्त आवडतात.. ' बलसागर भारत होवो..' ही विशेष.

मला मुळात मुलांनी संस्कार करुन घेण्यासाठी म्हणून वाचावे हेच मान्य नाही..प्रत्येक गोष्टीला 'तात्पर्य' आणि त्यातुन मिळणारा(?) बोध या दोन्ही गोष्टी ' वाचनाची गोडी ' लागण्यात काही प्रमाणात अडथळा ठरू शकतात असे मला वाटते.

या पुस्तकाबद्दल अजुन एक वाटते..हे पुस्तक आजही तितकेच उपयुक्त आहे. पण ते पालकांच्या संदर्भासाठी आहे.

माया

दूर कशाला??? मी आहे ना इथे

दूर कशाला??? मी आहे ना इथे पुस्तक वाचून रडणारी... मला अजूनही शाम त्यांची आई वारली तेव्हा पुस्तके विकून पैसे जमा करतो नि घरी जातो हा प्रसंग आणि ते वाचताना भाँ करून भोकाड पसरलेली मी आठवते....

त्यामानाने मला गोड गोड गोष्टी नि त्यातली सरोजा बिल्कुल आवडायचे नाहीत...

उत्तम पुस्तक

ज्या काळात हे पुस्तक लिहिले गेले आणि ज्या मनस्वी माणसाकरवी लिहिले गेले त्याला बघता, पुस्तकातले गुडीगुडी लिखाण गुळमुळीत न वाटता त्यापलिकडील संस्कार, विचार जास्त तीव्रतेने मनापर्यंत पोहोचतात.

माझ्या बाबांनाही हे पुस्तक खूप आवडते आणि म्हणूनच की काय कोणी मागितले की लगेच देऊन टाकतात. दरवेळेस विकत आणले तरी पुढच्यावेळी सापडायचा पत्ता नसतो! शेवटी आता मी २-४ प्रती आणून ठेवल्यात घरी.. Smile

अप्रतिम पुस्तक आहे.

श्याम ची आई हे पुस्तक खरोखरच अप्रतिम आहे. यात मुळी वादच नाही. आजच्या पिढ़ीतील मुलांसाठी ते एक आदर्श ठराव असे ते पुस्तक आहे .
ते पुस्तक वाचुन खरोखरच खुप रडायला येते. या पुस्तकात संस्कारांची शिदोरी आहे. जी आजच्या कालाची गरज आहे. आज जिथे पालक नोकरीच्या निमित्ताने १२ -१२ तास घराबाहेर राहतात तेथे मुले फ़क्त टी.व्ही . बघत बसतात. तेव्हा या पुस्तकाच्या माध्यमातून पालक मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती करून देऊ शकतात.