'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
शांताराम
पुस्तकाचे नाव
मुखपृष्ठ
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:
दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून...मातृभूमीपासून...जगण्यापासूनच! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणाारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं... लपून राहायचं होतं. ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया, पिचलेली... तरीही ताठ उभ्या कण्याची! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात प्रेमाची पाखर घालून पोटाशी कवटाळणारी! घर सुटलेलं, कुटुंब तुटलेलं, जवलग दुरावलेले, अशा शून्य अवस्थेत भिरभिरणारं ते एकुट पाखरूशिरलं मुंबईच्या कुशीत. - आणि बघता बघता सारं बदललं. एक नवीच दुनिया उलगडत गेली. प्रेमाचा पाऊस...द्वेषाचा जाळ...विश्वासघाताचे सुरे... रहस्यांचे चक्रव्यूह आणि गुपितांच्या गुहा! शरीरसुखाच्या उफाळत्या लाटांवर नाचणारा उत्कट प्रणय आणि तुरुंगाच्या अंधारकोठडीतला रक्तरंजित छळ. जगण्याच्या लढाईने पेटलेल्या झोपड्या आणि पंचतारांकित हॉटेलातलं थंडगार ऐश्वर्य. अंडरवल्र्डमधल्या डोळीयुद्धांच्या चिखलात रुजलेली तत्त्वज्ञानाची कमळं आणि बॉलीवुडच्या झगमगाटाआडचा सुन्न अंधार. या कहाणीत काय नाही? तिच्या पोटाशी आहे पंखांवर खिळे ठोकणार्या नियतीला झुगारून, जगण्याचा अर्थ शोधत भिरभिरणारं एक पाखरूत्याच्या पंखांवरचे प्रेमाचे रंग आणि एक शहर - मुंबई.
नोंदः ही माहिती मेहता पब्लीकेशनच्या साईट्वरून आहे तशी घेतलेली आहे. संस्थळाच्या धोरणात बसत नसल्यास तसे कळवावे, टंकाळयातून कधी ना कधी स्वत: लिहायचा प्रयत्न करेन. जमेलच असे नाही. 
ह्या पुस्तकाबद्दलचे लिखाण
| प्रकार | शीर्षक | पुस्तकाचे नाव | सदस्याचे नाव | प्रतिक्रिया | नवीन प्रतिक्रिया |
|---|---|---|---|---|---|
| पुस्तककोडे | ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४९ | शांताराम | वल्ली | 11 | |
| पुस्तक परिचय | शांतारामाची कहाणी | शांताराम | मस्त कलंदर | 11 |




