• '

वि. स. खांडेकर

 

Birth Date

19011898
 
 

लेखकाचे चित्र

 
 

Author Info

मराठी साहित्याच्या इतिहासातले एक महत्वाचे पान. यांचे आजोळ सांगली, त्यामुळे जन्म तिथलाच. पण नंतर शिक्षकीपेशामुळे काही वर्षे कोकणातल्या एका खेड्यात वास्तव्य. मराठी साहित्याचा इतिहास या व्यक्तीच्या उल्लेखाविना अपूर्ण आहे. त्यांचे एकही पुस्तक न वाचलेला मराठी वाचक विरळाच म्हणावा लागेल.
यांची लेखनसंपदा फार मोठी आहे. यांनी सोळा कादंबर्‍या, सहा नाटके, अडीचशेच्यावर कथा, पन्नास रूपककथा, शंभर निबंध आणि दोनशेच्यावर समीक्षणे लिहिली आहेत. भारत सरकारने यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं, आणि त्यांच्या स्मृत्यर्थ पोस्टल स्टँपही काढला होता. १९४१साली सोलापूर येथे झालेल्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषवले होते. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट्. ही मानद पदवी देऊन त्यांना गौरवले होते.
त्यांच्या ययाती या कादंबरीस 'महाराष्ट्र शासन', 'साहित्य अकादमी' व 'ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाले होते.

२ सप्टेंबर १९७६ साली ते निवर्तले.