'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
मी सायूरी
पुस्तकाचे नाव
मुखपृष्ठ
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:
समुद्राकाठच्या खेड्यात स्वच्छ - बागडणारी कोळ्याची पोर चियोचान....
दुर्दैवाला शरण गेलेला तिचा बाप तिला नवव्या वर्षी विकतो आणि ती येऊन पडते गेशा बाजारात. जिथे मुलींच्या मनाचं, शरीराचं शेवटच्या कणापय|त शोषण करून त्याची किंमत वसूल केली जाते. तिथे अतोनात कष्ट, अवहेलना, छळ, उपासमार यांचा सामना करता करता अंगभूत सौंदर्य, हुशारी आणि नशिबाची साथ यांच्या जोरावर वयाच्या तिशीपय|त ती प्रसिद्ध गेशा सायूरी म्हणून थेट न्यूयॉर्कमधल्या एका टी-हाऊसची मालकीण कशी बनते, याची ही कथा. सांगण्याच्या ओघात इतरही अनेकजणांच्या कहाण्या सायूरी सांगत राहते. हे सगळं घडत असताना आपल्या बहिणीबद्दलची आंतरिक ओढ, निसर्गप्रेम, स्वत:पेक्षा 31 वषा|नी मोठ्या असलेल्या चेअरमनबद्दलची उत्कट प्रीतिभावना अशी तिच्या भावनांची आंदोलने व त्यातून स्वत:चा शोध घ्यायचा प्रयत्न हे सगळं एखाद्या कवितेसारखं वाचकांवर गारूड करतं. जपानमधलं सांस्कृतिक जीवन, -दददुसर्या महायुद्धाचे भीषण परिणाम, पिढ्यान् पिढ्या चपखल योजनाबद्ध, तरीही गुप्तपणे चालू राहिलेली रात्रीच्या फुलपाखरांची ही मोहमयी दुनिया; हे अनोळखी विश्व आपल्याला थक्क करून सोडतं!




