'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
भारतीय पक्षी
मुखपृष्ठ
|
कालचा प्रसंग आहे. माझी ऑफीस बस नॅशनल पार्कवरून सुटते. तिची वाट बघत मी उभा होतो. इथे दरवेळी विविध पक्षी दिसत असतात. आज मात्र पक्ष्यांचा रंगढंग और होता. कावळे, साळुंक्या अविश्रांत फडाड करीत होते, ओरडत होते. का ते कळेना. बस यायला थोडा वेळ होता.. मीही जरा उत्सूकतेने बघु लागलो.. कावळे, साळुंक्या एका झाडाकडे बघत ओरडत होते. त्या झाडात नीट बघितले तर एक कबुतरासारखाच पण गुलाबी छातीचा बाणेदार पक्षी ह्या पक्षांच्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करीत ताठ बसला होता. हे पक्षी त्याच्या अस्तित्त्वामुळेच घाबरून ओरडत होते. नंतर बस आली आणि मी निघालो मात्र घरी येईपर्यंत तो पक्षी डोक्यातून जात नव्हता. आल्या आल्या माझ्याकडचं, पक्ष्यांच्या दैवताने लिहिलेलं भारतीय पक्षी काढलं.. एकामागून एक फोटो बघत होतो अखेरीस एक फोटो त्या पक्ष्याचाही होता.. तो पक्षी होता "शिक्रा". त्याची माहिती वाचल्यावर कळलं की हा पक्षी धूर्त असून लपून बेमालूम वार करण्यात, पिलं मारण्यात हा निष्णात आहे. व तेव्हा इतर पक्ष्यांच्या कल्लोळाचा अर्थ लागत होता.
तर असं हे पुस्तक "भारतीय पक्षी". त्याचे लेखक आहेत डॉ. सलिम अली आनि सहलेखिका ख्यातनाम पक्षीप्रेमी लईक फतेहअली. भारतात पक्षीविज्ञान या निसर्ग इतिहासतील अभ्यास शाखेला प्रामुख्याने डॉ. सलिम अली (मृत्यू: १९८७) यांनी लिहिलेल्या पक्षीविषयक ग्रंथांमुळेच चालना मिळाली. सामान्यांना समजेल अश्या भाषेत शास्त्रिय विवेचन समजावून देण्याची क्षमता फारच थोड्या शास्त्रज्ञांमधे असते. डॉ. अली त्यापैकीच एक!. संपूर्ण हयातभर केलेल्या पक्ष्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते भारतातच नाहि तर जगातील एक सर्वात प्रमुख पक्षीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
हे पुस्तक म्हणजे डॉ. सलिम अली व सहलेखिका लईक फतेहअली या दोन पक्षीप्रेमींची मौल्यवान भेट. भारतातील पक्ष्यांची माहिती मिळवण्यासाठी परकीय लेखकांच्याच्या पुस्तकांवर अवलंबून रहाण्यापेक्षा आपल्या भारतीयाचे हे पुस्तक खूप नवी आणि एकत्रित माहिती देते. रा. वि. सोवनी यांनी पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे. केवळ हिंदीच नव्हे तर मोठ्या परिश्रमाने मराठी नावे शोधून तीही दिली आहेत.
आतापर्यंत भारतीय पक्षी परदेशी व्यक्तींनी बरेच अभ्यासले होते. नव्या पक्षांना नावे देण्याचे, त्यांचा तपशीलवार अभ्यास करण्याचे काम त्यांनी केले होते. मात्र ह्या पुस्तकातून आपल्याला भेटतात ते भारतीय पक्षी, भारतीय नावांसकट. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातही जरा सावध नजर ठेवली तर आपल्यालाही अनेक पक्षी दिसतात हा स्वानुभव आहे. ह्या पुस्तकात पक्षांचे कुल कसे ठरवायचे, त्याची वर्गवारी कशी करायची व त्यामार्गे पक्षी अचुक कसा शोधायचे ते नीट दिले आहे.
जाता येता पक्षीनिरिक्षण करणार्या तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींना पक्ष्यांसंबंधी नवी गोष्ट शोधता येणे (आणि शोधली तरी ती नवी आहे हे कळणे) जवळजवळ अशक्य आहे. पण पक्ष्यांची चांगली ओळख झाली की हा छंद टिकतो व जगाच्या पाठीवर कुठेही टिकवता येतो. ह्या पुस्तकात प्रत्येक भारतीय पक्ष्याचे चित्र, त्याच्या सवयी, विणीच्या हंगामातील बदल, आवाज, घरटे याबद्द्ल नीट माहिती दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक अशी निरागस पक्ष्यांची तोंडओळख करू पाहणार्या प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे
पुस्तकः भारतीय पक्षी
लेखकः डॉ. अलिम अली व लईक फतेहअली
अनुवादः रा.वि.सोवनी
प्रकाशकः नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया
किंमतः रु. ३२
पृष्टे: १०४
आह्ह
एनबीटी होय? मी हे पुस्तक अनुभवलं होतं. घ्यायचं होतं, पण प्रकाशनच आठवत नव्हतं. आता लक्षात ठेवतो.
ऋषी हे पुस्तक वाचायच्या यादीत
ऋषी हे पुस्तक वाचायच्या यादीत आहेच,
खुप दिवसांपासुन वाचायचे आहे,आता मिळवावे म्हणतो.
नेहमी प्रमाणे खुप छान परिचय.
निखिल देशपांडे
मस्तच
मस्तच !!
औरंगाबादला सलिम अली सरोवर म्हणुन एक तळे आहे. त्याची आठवण झाली. (सलिम अली बहुदा औबादचेच चुभुद्याघ्या).
मस्त लिहिलेस ऋ, नक्की घेइन हे
मस्त लिहिलेस ऋ, नक्की घेइन हे पुस्तक. धन्यवाद.
मलाही
हे पुस्तक पुर्वी आमच्या कडे होते आता ते गायब झाले आहे.
परत घेईनच!
अरे वा!! मस्त दिसतंय पुस्तक..
अरे वा!! मस्त दिसतंय पुस्तक.. गेलोए वाचायचे राहून मधे टाकत आहेच!!!
बाकी, ऋ च्या प्रसंगावरून मलाही एक पक्षी आठवला. सांगली जिल्ह्यात मायणी या गांवी पक्षी स्थलांतरीत होऊन येतात. १२ नंतरच्या सुटीत मी, माझी मैत्रिण आणि तिची भावंडे तिकडे गेलो होतो.. तिथे आम्ही सोडून कुणी चिटपाखरू नव्हते.. अगदी स्थलांतराला आलेले पक्षी सुद्धा गायब होते.. नि चुकून आलेच तर पक्षी उडून जातील म्हणून दंगा पण नाही.. तसेच गप्प राहून भडंग खात बसलो होतो.. अर्ध्या एक तासाने एक थवा आला. तो पक्षी आजही मला लख्ख आठवतो.. एवढुसा.. म्हणजे अगदी मुठ पण त्याच्यासाठी मोठी होईल असा.. चकाकत्या काळपट मोरपंखी रंगाचे पोट नि निळीजर्द पाठ.. ह्युमिंगबर्ड नव्हताच तो.. पण जो काही होता, तो सॉलीड होता!!!!
ऋ, तुझ्याकडे पुस्तक आहे ना??? मला नांव सांग ना त्याचं!!!
यापैकी कोणता?
यापैकी कोणता?
एशियन ब्लूबर्ड:

त्याचा हा युगांडातील बंधु:
पण हा तुझ्या वर्णनाच्या जवळचा वाटतोय..
आता घरी गेल्यावर भारतीय पक्षी मधे बघतोच..
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"






या पुस्तकाबद्दल मी ऐकल
या पुस्तकाबद्दल मी ऐकल आहे..पण अजुन वाचायचा योग नाही आलाय..बघु आज ग्रंथालया मध्ये मिळत आहे का ते?
राधा१