• Register

बोलती पुस्तके

नमस्कार,

बोलती पुस्तके प्रकल्पातर्फे खालील 'बोलती पुस्तके' (Audio Books) पुस्तकविश्वच्या रसिकवाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जशीजशी नवनवीन 'बोलती पुस्तके' पुस्तके उपलब्ध होतील तशी ती उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे.

या संदर्भात आपल्या कल्पना आम्हास जरुर कळवाव्यात.

बोलती पुस्तके

सुरेख. हापिसात हेडफोन अथवा

सुरेख.
हापिसात हेडफोन अथवा स्पीकर्स नसल्याने अजूनही पुस्तके माझ्यासाठी मुग्धच आहेत. घरी गेल्यावर बोलके करेन त्यांना.

निवेदकाची भूमिका फार महत्त्वाची

या ब्लॉगवरुन मी कित्येक महिन्यांपूर्वी मी ही पुस्तके उतरवून घेतली होती.

मराठीत हा प्रकार रुजण्यासाठी निवेदनशैली कडे काळजीपूर्वक ध्यान देणे गरजेचे आहे अन्यथा उत्कॄष्ट कलाकॄती केवळ निवेदन चांगले नसल्यामुळे नीरस होते.

असो, हा प्रकल्प चांगला आहे, मराठीत ऑडिओ बुक्स रुळायला वेळ लागेल पण सुरुवात खूप महत्त्वाची आहे.
मोठ्या अपेक्षेने या प्रकल्पाकडे पहात आहे , व शक्य झाले तर सहभागीदेखील होईल

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

क्या बात है!

क्या बात है!
ही पुस्तके पुस्तकविश्ववरही उपलब्ध करून देता येतील का? (अर्थात बोलतीपुस्तके ला श्रेय देऊन व त्यांच्या लोगो सकट) कारण ब्लॉग्सवर बर्याचशा भारतीय हाफीसांमधे बंदी असते (व घरी फारसा वेळ मिळत नाही Wink )

असो. अधिकाधिक पुस्तके बोलती करण्यास हातभार लावायला उत्सुक आहे

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

ह्म्म

ह्म्म यासंदर्भात वर्तकांशी बोलतो किंवा त्यांना इथे चर्चेला आमंत्रण देतो.
सध्या त्यांना बोलती पुस्तकेची rss feed मागितली आहे जेणेकरुन त्यांची पुर्ण अनुक्रमणिका इथे अद्ययावत राहील.