'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
पुस्तकविश्व - लेखन करतांना पुस्तक कसे जोडावे ?
नमस्कार रसिक वाचकांनो,
पुस्तकविश्ववर चर्चा, परिचय लिहितांना संबंधित विषयावरील पुस्तक जोडण्यासाठी खालील चित्रांत दर्शविलेले पर्याय उपलब्ध आहेत. ही पुस्तकजोडणी सोप्यात सोपी करणे हे पुस्तकविश्वच्या आराखड्यातील मुख्य काम होते.
त्यानुसार विदागारात असलेली पुस्तके "पुस्तकाचे नाव" या रकान्यात टंकतांना ड्रॉप डाउन मेन्यु पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

पुस्तक जर उपलब्ध असेल ते आपल्याला ड्रॉप डाउन मेन्युतील हव्या त्या पर्यायावर टिचकी मारुन निवडता येईल.

एकाच नावाची अनेक पुस्तके असण्याची शक्यता असतेच. जोडलेले पुस्तक बरोबर आहे की नाही हे पडताळुन पहाण्यासाठी खाली दर्शविलेल्या डोळ्यावर टिचकी मारा. पुस्तकाचे उपलब्ध असलेले विवरण नवीन खिडकीत तुमच्या समोर येईल. लेखक प्रकाशक इत्यादी बाबी पाहुन निवड योग्य की नाही ते ठरवता येईल

या भिंगावर टिचकी मारुन विस्ताराने शोध घेता येईल.

पुस्तक न सापडल्यास तुम्ही त्याच पानावर नवीन पुस्तक तयार करुन तत्काळ जोडु शकता.







छान उपक्रम...
हे याआधीच करायला हवे होते. पण देरसेही सही पण झाले ते उत्तम.
अगदी याच प्रकारे सदस्यांना लेखक आणि प्रकाशकही जोडता येतील. फक्त लेखक जोडण्यापूर्वी आडनावाने लेखकाचा शोध घेऊन ते/त्या इथे आहेत की नाही ते आधी तपासावे लागेल. नाहीतर प्रतिरूपे शोधून ती काढून टाकणे हेच एक मोठे काम होऊन बसेल. त्याच बरोबर शोध घेताना अनुस्वारांकित नावांचा शोध दोन-तीन प्रकारांनी घ्यावा लागेल.
उदा. गो नी दांडेकर यांचे नांव आपल्याकडे दांडेकर, दाण्डेकर व दान्डेकर अशा तिन्ही प्रकारात पाहिल्याचे मला आठवते.
प्रतिरुपे
प्रतिरुपे शोधण्यासाठी काम करणे हे लिस्ट वर आहेच.
धन्यवाद स्वाती.