'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
पहिला प्रयत्न
मुखपृष्ठ
|
हे पुस्तक मित्रांने अनपेक्षितपणे दिल्यावर मला काय आठवल असेल ........................................... “चक दे इंडिया” दोन तरुणी reservation counterकडे येत असताना त्यांना काही तरुण चिडवतात, का तर त्याच्या cheniase, nepali looks वरून, तर दुसरीकडे counterवाला त्यांना त्या भारतात पाहुण्या म्हणून आल्याबद्दल शुभेच्या देतो. त्यावर त्याच उत्तर असत, “आपल्याच देशात, पाहुणा म्हणून घेण्यास कोणाला आवडेल.”
या पुस्तकाचे वाचन करत गेले आणि आपल्याला एकंदरीत पूर्वांचल, त्याची संस्कृती ,इतिहास, भूगोल भाषा,.............याबाबत किती “ज्ञान” आहे याची जाणीव होत गेली. “असम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, व मेघालय या सात राज्याची सांस्कृतिक सफर” अस पुस्तकाच subtitle असल तरी ते बदलून “तुमच्या अज्ञानाची सफर” अस नाव असायला हरकत नव्हती.
ह्य राज्याचा संस्कृतीक, भोंगोलिक, इतिहास माहित असण्याची शक्यता आपल्याला नसते पण या सात राज्याची नाव जरी न अडखाळता सांगता आली तरी खूप, अशी आपली स्थिती आहे. अमेरिका, ब्रिटन येथील उपनगराची नावं आपल्याला जवळची वाटतात पण या भारताच्याच राज्यानं/शहारानं बद्दल आपल असं का व्हाव याबद्दल मला सारखसारख आश्चर्य वाटत आल आहे.
आता या पुस्तक बद्दल थोडस, पुस्तक प्रचंड फार वाचनीय झाल आहे. खर म्हणजे फार informative आणि कंटाळवाण नाही. लेखकाने म्हटल्या प्रमाणे ते प्रवासवर्णन नाही, ते आत्मकथन आहे. पूर्वांचलंच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, अर्थकारण, समस्या बद्दल (जे आपाल्याला माहित नसल्याने) असल्याने फारच रोचंक झाले आहे
ब्रम्हपुत्रा नदी नसून नद आहे (म्हणजे काय ते पुस्तकात वाचा) आणि भारत एकूण तीन नद आहेत किंवा या नदात तयार झालेल माजुली (असम) हे गावं, जगातील सर्वात मोठ निवासी बेट आहे. किंवा पूर्वांचलातील ब्राम्हण मंडळी अगदी सरसकट मासे खातात.(त्यांच्या लग्न, मुंज इत्यादी.... सभारंभात मांसाहारी पदार्थ असतात) असमचा आपण आसाम असा उल्लेख करतो किंवा मणिपूरची भाषा मणिपूरी नाही तो फक्त नृत्याचा प्रकार आहे. किंवा त्याचे कपडे, भाषा, जेवण, घराची रचना, प्रचंड वेगळी का आहे? किंवा काही राज्यात मातृसत्ताक पद्धती आहे.(मुलगे लग्न झाल्यावर सासरी जातात वगेरे) किंवा तेथील एका देवळाचे ३९ पिढ्यांन पासून पुजारी देशमुख या आडनावाचे आहेत. इत पर्यन्त रोचंक माहिती मिळेल. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आणि त्या सर्वच interesting आहेत तरी त्या मुद्दम दिल्या नाहीत.
इतिहासाच्याबाबतीत म्हणायचं झाल तर फाळणीच्या वेळी भारत सरकारने आणि त्यानंतर आलेल्या वेगवेगळया सरकारांनी ज्या ढीग भर चुका केल्या त्याच पूर्वांचल हे ठळक उदाहरण आहे. सिल्हेत हा जिल्हा (त्याच सामरिक महत्व न ओळखता) पूर्व पाकिस्तानला (बाग्लादेश) आपण भेट म्हणून दिला किंवा त्या परिसरातील एकमेव बंदर आपण पाकिस्तानला आनंण म्हणून दिले. जेथे बहुसंख्येने हिंदू होते त्यांना कोणात्याही परिस्थितीत पाकिस्थानात सामील होण्यात रस नव्हता. किंबहूना १५ ते २० दिवस तेथे तिरंगा फडकत होता. तेथील राजकीय नेते भारतात सामील होण्यासाठी कंठ शोष करत राहिले. याची माहिती पुस्तकात येत रहाते. (पुस्तक वाचताना एक नाविनच विचार मनात येऊन गेला. फाळणीत भारतापासून पूर्व आणी पश्चिम पाकिस्तान वेगळे केले गेले अस आपण म्हणतो, पण म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान कधी आणि केव्हा वेगळे झाले ते कळत नाहींत. किंबहूना ते भारताचा भाग होता अस आपण बोलत देखील नाही.)
आणि आताच्या घडीला सांगायचं तर पुर्वाचालातील अरुणाचल प्रदेशम, नागालँड, मिझोरम या राज्यात जाण्यासाठी आपल्याला परमीट घ्याव लागत. स्वतंत्र भारताच्या या राज्यात जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण दोन दिवसचा सोपस्कार करावा लागतो, कमाल आहेना. त्रिपुरा सारख्या राज्यात रात्री पाच नंतर public transport बंद होतात किंवा पडतात. तुम्हाला तेथून बाहेर पडण्यासाठी फक्त आणी फक्त सकाळी सहाची बस पकडावी लागते कारण पुढचा सारा प्रवास साधारण १२ ते १४ तासाचा आहे व तेही पूर्णपणे पोलीस संरक्षणात. या आणि इतर अनेक राज्यात तुम्हाला सीमा सुरक्षा दलाच्या अनेक अंगझडतीतून जावं लागत. भूतान, म्यानमार, चीन, व बाग्लादेश या देशाच्या अंतरराष्टीय सीमा तुम्हाला मुक्तपणे CROSS करताना तेथील स्थानिक रहिवासी दिसतील आणि त्याच वेळी वृत्तपत्त्रातून ”या देशातून भारतात घुसघोरी होत नाही.“ अस सांगाताना आपले कॉगेर्सी मंत्री आठवतील.
पालीस्तानी अरब किंवा काश्मिरी निर्वासितनबद्दल आपण किमान ऐकून तरी असतो पण पूर्वांचलातील ६० वर्षापासून असलेल्या बाग्लादेशी, म्यानमार निर्वासिताच्या छावन्या बद्दल आणि त्याचा समस्या बद्दल न आपल्याला ऐकून आणि वाचनहि माहिती नसते. तेथील बेकारी, हिंदी भाषिकशी होणारे दंगे किंवा नागा, बोडो यांची स्वतंत्र राज्या मागण्या बद्दल आपण ऐकून असतो पण राष्ट्रीयएकात्मतेवर घाला घालणाऱ्या ख्रिश्चन धर्मातारणावर मला येथे नव्यानेच कळले. धर्मातारणाने राष्ट्रीय एकात्मता कशी भंग होते हे जाणून घेयाची इच्छा असेल तर पुस्तक जरूर वाचा.
या भागामध्ये खिश्चन मिशानार्यांचा धर्मप्रचार नी धर्मप्रसार पूर्ण ताकदीनिशी चालू आसतो. त्याचा प्रचार आणि प्रसार शाळा नी रुगानालय ह्या दोन माध्यमातून चालू असतो, त्यामुळे ते थेटघरात पोहोचतात. त्याच्या अथक प्रयान्ताना तसं “थोडंफार” यश मिळतही असत. २००० साली मिझोरम सरकारने संपूर्ण मिझोरम ख्रिश्चन झाल्याचा उत्सव साजरा केला. नागा, बोडो या MAJOR जाती सोडल्यास इतर अनेक जाती पूर्णपणे ख्रिश्चन झाल्या आहेत. हे आदिवासी आपली संस्कृती विसरत चालले आहेत. प. बंगालवरून या राज्यात जाण्यासाठी जी ४०किमी रूंदीची पट्टी शिल्लक आहे त्यात बाग्लादेशी मुस्लीमाची लोक्संख्या झपाट्याने वाढळी आहे. या राज्यात बांगलादेशी घुसघोराची लोकसंख्या २०%पेशा जास्त आहे. आणि हि बाब दुर्लाश्न्याजोगी नाही पण हि परिस्थिती हळूहळू का होईना बदलत आहे या संधार्भात RSS आणि संघ परिवारच्या चांगल्या कामाची माहिती पुस्तकात आली आहे. पण खिश्चन मिशानार्यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी पुढे या भारतीय NGO’S कूठ पर्यत टिकणार?
अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल ? या प्रश्नच उत्तर लेखकाने वेळोवेळी दिल आहे (अगदी कृतीतूनही) तिथल्या सामान्य माणसाला आपल्या कथाकथीत Mainstream जवळ आणता येईल. आपण आपल्या “व्यस्त जीवनातून” तिकडे पूर्ण वेळ जावं आणि तेथील NGO’S ना मदत करावी अस् मी तरी म्हणणार नाही. पण निदान प्रत्येकाने एकदा प्रवासी म्हणून शक्य नसेल, तर निदान पर्यटक म्हणून तरी पुर्वाचालात जाऊन याव, तेही एक कार्यच आहे. (तेथील परिस्थिती स्व:त पाहावी, cameraत उतरवावी व मित्रपरिवाराला दाखवावी) एवढी आणि एवढीच माफक अपेशा या पुस्तकातून लेखकाने अपेक्षिली आहे
येत्या वर्षात ती मी पूर्ण करेन एवढ वचन मी स्व:तला दिलंय.........
आभार...........
पहिला लेख,(मी याआधी कोठेही काहीही मराठीत खरडलेले नाही)
पहिली प्रतिक्रिया
धन्यवाद........................
अवांतर: तुमचं मराठी चांगलं आहे मग उगाच ते इंग्रजी शब्द कशाला? शक्यतो टाळाल का?
नक्की "ट्राय" करेन कि नक्की प्रयन्त करू....
छान
छान ओळख संजोग. पुस्तकविषय अतिशय आवडला. आपण ओळखही अत्यंत उत्फुर्त अशी करुन दिलेली आहे.
धन्यवाद.
ह्य राज्याचा संस्कृतीक,
ह्य राज्याचा संस्कृतीक, भोंगोलिक, इतिहास माहित असण्याची शक्यता आपल्याला नसते पण या सात राज्याची नाव जरी न अडखाळता सांगता आली तरी खूप, अशी आपली स्थिती आहे. अमेरिका, ब्रिटन येथील उपनगराची नावं आपल्याला जवळची वाटतात पण या भारताच्याच राज्यानं/शहारानं बद्दल आपल असं का व्हाव याबद्दल मला सारखसारख आश्चर्य वाटत आल आहे.
हे अगदी पटलं बघा...
पुस्तक वाचायला आवडणारच..
पहीलेच मराठी लेखन म्हणताय तसे वाटत नाहीए..
निखिल देशपांडे
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न. लिहित रहा. ऋचा सल्ला योग्य!
बापरे!!!
परिचय वाचूनच इतक्या धक्कादायक गोष्टी नव्यानेच कळत आहेत तर प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर काय होईल??
अवांतर: आमच्या वर्गात पुर्णचंद्र नावाचा एक मणिपूरी मुलगा होता. त्याला आमचे ड्रॉईंगचे सर नेहमी पूर्णेंदू म्हणून हाक मारायचे आणि त्याच्याशी खूप प्रेमाने वागायचे. आणि आम्हांला सांगायचे, त्यांच्याकडे भौगोलिक आणि एकूणच परिस्थिती इतकी वाईट आहे, आणि आपणच आपल्या बांधवांना ते आपलेच आहेत असा विश्वास द्यायला हवा. त्यांना काय म्हणायचे होते हे आज थोडेफार कळतेय.
सुरेख परिचय
वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाचा परिचय मस्त झाला आहे. पुस्तकाबद्दल उत्सुकता वाटते आहे.
माझी एक ताई काही वर्षे आसामजवळच्या भागात शिक्षिका म्हणून पूर्णवेळ कार्यरत होती. हा परिचय वाचताना तिने सांगितलेल्या थरारक गोष्टींची आठवण झाली.
हा सगळा भागच आपण दुर्लक्षित ठेवला आहे याबद्दल खंत वाटते. पुस्तक वाचेन तेंव्हा वाचेन पण परिचय वाचून काही अंतर्मुख करणार्या क्षणांची तीव्रतेने आठवण झाली.
लिहीत रहा. पुढील परिचयास शुभेच्छा!
--अदिती
--अदिती
गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः ॥
सुरेख परिचय
अतिशय सुरेख परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद.. जरुर खरेदी करुन हे पुस्तक वाचेन..
मी गेल्या ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच पुर्वांचलमध्ये गेलो.. अरुणाचलमधील तवांग ह्या ठिकाणी.. अनेक वर्षे तिकडे जायचे डोक्यात होते पण काहि ना काही कारणाने राहुन जायचे.. वरती पुस्तकपरिचयात लिहिल्याप्रमाणे तिकडे गेल्यावरच आपल्याला वैविध्य काय चीज आहे आणि भारताच्या मुख्यधारेपासून हा भाग किती वेगाने दूर पळतोय हे जाणवेल (तरी मी अरुणाचलमध्ये होतो जे सर्वात शांत व भारताशी पूर्ण संलग्न राज्य आहे)..
पुर्वांचल ही केंद्राच्या भोंगळ कारभाराची, अंतर्गत सुरक्षा हाती असलेल्या गृहमंत्रालयाच्या अक्षम्य निष्काळजीपणाची आणि आपल्या नेहेमीच पसरट/व्हेग असलेल्या आंतरराष्ट्रीय नीतीचे अतिशय ज्वलंत उदाहरण आहे.. AFSPA सारखे कायदे आपल्याला तीस-तीस चाळीस-चाळीस वर्षे वापरावे लागतात ह्यातच काय ते आले..
सुरेख पुस्तक!!!
अविनाश बिनिवाले हे भाषाशास्त्रज्ञ. अतिथीप्राध्यापक म्हणून ते गेले चार दशके पूर्वांचलात जात आहेत आणि तेव्हाच्या त्यांनी लिहिलेल्या आणि लोक्सत्त्तामध्ये लिहिलेल्या आठवणी त्यांनी या पुस्तकात पुनर्लिखित केल्या आहेत. पुस्तक वाचायला घेतलं, तेव्हा हा परिचय मनात होताच. पण जशजशी वाचायला सुरूवात केली, तसतसे आपण आपल्याच देशातल्या बांधवांबद्दल किती अनभिज्ञ आहोत हे प्रकर्षाने जाणवले. तिथली भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सगळीच परिस्थिती वेगळी आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या अडचणी सोडल्या, तर तरी इतर बर्याचशा गोष्टी आहेत, की जिथे सरकार आणि आपण नागरिक नक्कीच काहीतरी करू शकू. उदा. खुद्द लेखकाने एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आपल्याघरी दोन वर्षे ठेवून घेतले होते.
बाकी, सरकारी उदासीनता पाहून वाईट वाटले. वरती लेखात तर लिहिले आहेच, पण आपल्याच देशात जाण्यासाठी परवानगीपत्रे लागणे, एका दूरच्या ठिकाणच्या डाकबंगल्यात राहण्यासाठी गुवाहाटीतच आरक्षण करावे लागणे, बर्याच ठिकाणी भारतीयांना/इतर राज्यांत राहणार्यांवर येण्याजाण्याचे निर्बंध पण तिकडून येणार्या बांगल्यादेशियांच्यावर काहीच निर्बंध नाहीत. त्यातल्या त्यात ब्रह्मदेश या आपल्याच देशाचा आधीचा भाग असलेल्या देशात जाण्या-येण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांवर काही बंधने नाहीत हे वाचून बरे वाटले. त्याचवेळी आपल्या देशाच्या त्या भागाचा इंग्रजांचा इतका अभ्यास असावा, की त्यांनी राज्य/प्रांत बनवताना त्यात कुणाचेच वर्चस्व होणार नाही आणि त्यायोगे त्यांना त्रास होणार नाही हे पाहिले, पण आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या राज्यकर्त्यांना त्या भागाला महत्व द्यावेसे वाटले नाही हे खरेच पूर्वांचलाचे दुर्दैव.
पुस्तक नुसते प्रवासवर्णन नाही, पण जर कुणाला खरेच तिथे जायचे असेल, तर मार्गदर्शक ठरावे. कारण पाठच्या परिशिष्टात आढावा घेतला तर आहेच, पण कुठे कुठे राहण्या-खाण्याच्या काय सोयी आहेत, कुठे जाण्यासाठी परवाने लागतात आणि ते कुठे मिळतात, सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळा, काही प्रदेश नक्की कुठल्या काळात अतिदुर्गम ठरतात याचे साद्यंत वर्णन आले आहे.
माझ्याकडच्या पुस्तकात आठ पृष्ठे कोरी आहेत, हाच काय तो मिठाचा खडा. पण थोडक्यात सांगायचे तर हे मस्ट रीड कॅटेगरीत टाकावं असंच पुस्तक आहे!!!!
सुरेख पुस्तक परिचय. अरूण शौरी
सुरेख पुस्तक परिचय. अरूण शौरी ह्यांचे एक अनुवादित पुस्तक वाचले होते, त्यात ख्रिस्ते मिशनर्यांचा धर्मप्रसार ह्यावर अधिक विस्ताराने लिहिलेले आहे. एकेक गोष्टी वाचताना थक्क व्हायला होते!
हे पुस्तक मी नक्की घेईन. धन्यवाद.
अतिशय चांगला परिचय करून दिला
अतिशय चांगला परिचय करून दिला आहे.पुस्तक नक्कीच मिळवून वाचेन.






सुरेख
वा फारच सुरेख ओळख करून दिली आहे. वाचायला हवे पुस्तक. आभार.
अवांतर: तुमचं मराठी चांगलं आहे मग उगाच ते इंग्रजी शब्द कशाला? शक्यतो टाळाल का?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"