• '

नांगरल्याविण भुई : लेखक - नंदा खरे

प्रभाकर नानावटी
सोमवार, 6 September, 2010 - 16:27
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

नांगरल्याविण भुई

-नंदा खरे

पुस्तक विकत घेऊन 2-3 वर्षे झाली तरी हे पुस्तक वाचायचे राहून गेले. कदाचित पुस्तकाचे शीर्षक misleading वाटल्यामुळे तसे झाले असेल. हे पुस्तक शेतीविषयक असावे असा (गैर)समज झाला होता. (शीर्षक वाचताना फुकोयामाचे One Straw Revolution सारखे काही तरी असावे असे वाटले असेल). परंतु पुस्तक वाचून संपवल्यानंतर हा एक सर्वस्वी वेगळा प्रयत्न आहे हे लक्षात आले. जयंत नारळीकर पती-पत्नींच्या मलपृष्टावरील थोडक्यात मांडलेल्या अनुकूल अभिप्रायापेक्षा कादंबरीचा आवाका फार मोठा आहे हे वाचताना लक्षात येवू लागले.

कादंबरीचा विषय, रचना, पात्रनियोजन, विषयाची मांडणी व शेवट या सर्व आघाड्यावर लेखक नंदा खरे यांना शंभर टक्के यश मिळाले आहे असे म्हणता येत नसले तरी या प्रकारे एखादी कादंबरी लिहिता येऊ शकते यातच लेखकाचे यश दडले आहे.

संगणकशास्त्राचे सैद्धांतिक पाया उभारणाऱ्या काही मोजक्या वैज्ञानिकापैकी अत्यंत नावाजलेल्या ऍलन ट्युरींगसारखे एक पात्र घेऊन त्याच्या सर्व गुणदोषासह त्याला भारतीय वातावरणात उतरवणे हे येरा गबाळाचे काम नाही. इंग्रजी साहित्यविश्वालासुद्धा आव्हानात्मक वाटणाऱ्या ट्युरिंगला भारतीय साज चढवणे खरोखरच सर्जनशीलतेची उच्च पातळी गाठण्यासारखे ठरेल.

मूळ वैज्ञानिक सिद्धांतापासून संगणकाची रचना करण्याचा ध्यास असलेल्या यातील पात्ररचना खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. टाटांची प्रेरणा व त्यांचा आर्थिक सहभाग, रामानुजनबरोबरची ट्युरिंगची काल्पनिक ओझरती भेट, टाटा-भिसे यांचे (त्या काळातील) स्वामित्व हक्कासाठीचा संघर्ष, इत्यादींचा अत्यंत खुबीने वापर करून सीता छत्रे या लहानपणीच विधवा झालेल्या व almost निराश्रित असलेल्या काल्पनिक स्त्रीच्या भोवती कथानक फिरते ठेवून या बाईला लेखकाने वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे.

संगणक विज्ञानातील प्राथमिक अडथळे कशा प्रकारचे होते याची पूर्ण कल्पना हे पुस्तक वाचताना येते. विज्ञान - तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी ललित साहित्यकृती उभी करणे व वाचकांना वेगळ्या विश्वात नेणे फार कठिण काम आहे. लेखक या कामी यशस्वी झालेले आहेत ही बाब पुस्तक वाचताना नक्कीच लक्षात राहते.

परंतु यातील बारकावे समजून घेण्यासाठी वाचकांकडे बहुश्रुतता आवश्यक आहे. ते जर नसल्यास कादंबरी निर्जीव वाटू लागते. मग मात्र (नेहमीप्रमाणे) दोष लेखकाच्या माथी मारून वाचक सहीसलामत स्वत:ची सुटका करून घेतो.

हे पुस्तक वाचताना The Soul of a New Machine ची आठवण होत होती.

(प्रकाशक - ग्रंथाली, मुंबई, पहिली आवृत्ती - 2005, पृ.सं - 177, किं - 150 रु)

पुस्तकाचे शीर्षक गोंधळवणारे होतेच

छान ओळख प्रभाकर.

मी एका प्रदर्शनात हे पुस्तक अनेक वर्षांपूर्वी पाहिले होते तेव्हा नांगरल्याविण भुई आणि संगणकाच्या मदरबोर्डचे चित्र हे कॉम्बिनेशन नक्कीच गोंधळवून गेले होते मला. त्यामुळे लक्ष दिले नव्हते या पुस्तकाकडे. नाहीतर तशी वैज्ञानिक पुस्तके म्हणजे माझ्या आवडीची. शीर्षकामुळे माझाही गोंधळ झाला होता.
असो. चांगली ओळख करुन तर दिलीतच तुम्ही, पण एक वेगळा दृष्टीकोनही दिलात.

मनापासून धन्यवाद
नक्की वाचेन हे पुस्तक आता Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुस्तकाबद्दल माह्ती

पुस्तकाबद्दल माह्ती नव्हतीच..
पण एकुणच आता वाचावेस वाटत आहे..
परिचय थोडक्यात आटोपला असे उगाचच वाटुन गेले.

निखिल देशपांडे

हे पुस्तकही माहित नव्हते.

हे पुस्तकही माहित नव्हते. शीर्षक आणि मदरबोर्डचे चित्र याने मी पहिल्यांदा गोंधळून गेले. अ‍ॅडा, अ‍ॅलन ट्युरिंग यासगळ्यांबद्दल उत्सुकता तर होती. बरेचसे वाचलेही आहे त्यांच्यबद्दल, पण अशा लोकांना भारतीय भूमीत रंगवणं म्हणजे खरेच सोपे काम नाही..

हे ही पुस्तक 'गेले वाचायचे राहून' मध्ये टाकत आहे.

वेगळ्या धाटणीचे पुस्तक

एकदम वेगळ्या धाटणीचे पुस्तक दिसते आहे..चांगला परंतू जरा आटोपता परिचय.. पुस्तक वाचायच्या यादीत टाकले आहे

बाकी, असे कित्येक प्रयोग मराठी साहित्यात होत असतील.. पुविमुळे व आपल्यासारख्यांमुळे किमान त्यातील काहि माहित होताहेत हे ही नसे थोडके

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

+१ सहमत आहे

>>> असे कित्येक प्रयोग मराठी साहित्यात होत असतील.. पुविमुळे व आपल्यासारख्यांमुळे किमान त्यातील काहि माहित होताहेत हे ही नसे थोडके

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

काय सुरेख पुस्तक आहे !

एप्रिल २०१० मध्ये मायबोलीवर या पुस्तकाबद्दल लिहीलेले इथे डकवते आहे.
नांगरल्यावीण भुई लेखकःनंदा खरे. ग्रंथाली प्रकाशन (फॉंट साईझसाठी ग्रंथालीचा निषेध. अरे काय फाँट आहे का काय. )
अ‍ॅलन ट्युरिंग नावाच्या गणितज्ञाबद्दलची भारतात घडवून (!!! यासाठीच कांदबरी वाचलीच पाहिजे) आणलेली काल्पनिक भन्नाट कादंबरी. अतिशय आवडली. गणितातलं ओ की ठो कळत नसताना माझ्यासारखीला वाचता आली आणि समजली यावरून योग्य तो बोध घ्यावा, घाबरू नये ! (आधी कोणी गणितज्ञाबद्दल आहे हे सांगीतलं असतं तर ढुंकुन वाचली नसती )
http://en.wikipedia.org/wiki/Alan_Turing
समलैंगिकता, आज्ञावली आणि विचार करण्याचे यंत्र तयार करण्यामागचे अफाट परिश्रम आणि बुद्धीमत्ता,
पराकोटीचा एकटेपणा/ तुटलेपणा त्यातुन जगाच्या अंतापर्यंत धावणारा चक्रम गणिती पानापानातून असा काही जिवंत होतो की त्यातल्या equations कडे लक्षही जात नाही (गणितमित्रांचे जायलाच हवे.)
गणित आणि फिलॉसॉफी बद्दलचचे विचार सोप्या भाषेत वाचण्यासारखे.
कादंबरी म्हणुन साहित्यीक मुल्याचे मरुदे (मुळात अशा लेखनाच्याच काही मर्यादा असतात) पण if you are looking for joy of discovery in mathematics and pure sciences/in any thought process, in typewritten words, this is it !! भारल्याशिवाय खाली ठेवणार नाही हे नक्की. ट्युरिंग, केंब्रिज, रामानुजम, जहांगीर टाटा, शंकरराव भिसे, दामोदर कोसंबी, धोंडो केशव आणि बाया कर्वे आणि एक औषधाला का असेना स्त्रीपात्रही आहे. सर्व खरी पात्र परंतु एकमेकांशी खर्‍या आयुष्यात फारशी संबंधीत नसताना कादंबरीत मुद्दाम एकत्रित आणलेली- त्यातली गंमत अनुभवली पाहीजे. संवेदनशील वयाच्या मुलांना पालकांनी वाचावयास उद्युक्त करणे आणि त्याआधी स्वतः वाचणे आणि आपण आपल्या नोक-या चाक-या का करतो आहोत / आपले शिक्षण हे पुन्हा एकदा ताडुन पहायला नक्की वाचणेचे करावे.
त्यातली काही वाक्य प्रताधिकार कायद्याच्या nCT म्हणुन मुद्दाम quote करायचा मोह आवरणे मला जड जाते आहे तरी कित्येक वर्षांनी ओळी अधोरेखित करुन पुस्तक वाचले इतकी ती वाक्य महत्वाची आहेत. ज्यांना कादंबरी म्हणुन वाचायची त्यांनी तशी वाचा, आणि गणितविज्ञान साक्षर लोकांनी तर काहीही कारणं न देता वाचा (त्यांच्यासाठी खास तिरप्या अक्षरातील जड मजकुर आहे). इतकी वाचनिय प्रस्तावनाही ब-याच वर्षानंतर वाचली. " महत्वाकांक्षा, महत्वाची आकांक्षा, एकमेकांवर कुरघोडी करायची फालतू आकांक्षा नव्हे. नवे विश्व उभारण्याची आकांक्षा. तुझ्यापेक्षा मी मोठा, असे म्हणणारी थिल्लर, अहंकारी आकांक्षा नव्हे. मी ही एक गंमत करुन आपले आयुष्य भल्यासाठी बदलतो ही आकांक्षा"..... (५० शब्द भरले नाहियेत. आशा आहे कायदेभंग नाही).नंदा खरेंचे नाव सुचवल्याबद्दल स्लार्टीचे आभार.