भूत ह्या प्रकाराची ओळख सगळ्यात पहिल्यांदा झाली ती बागुलबुवा ह्या स्वरूपात. मग त्यात हळूहळू वयोमानानुसार राक्षस, हडळ, चेटकीण अशी भर पडतच गेली. मात्र पहिल्यांदा सांगलीला आजोळी 'तडकडी' पाहिली आणि भूत ह्या कल्पनेला मूर्त स्वरूप मिळाले. भूत म्हटले की मग कायम डोळ्यासमोर तडकडीच यायला लागली. पुढे पुढे मग ’विक्रम-वेताळ’मुळे वेताळाची ओळख झाली. पुढे चांदोबामुळे पांढर्या रंगाच्या, लांब शेपटी असलेल्या भुतांची चित्रे जी डोक्यात बसली ती अगदी कायमची. पण एकुणात काय तर मला भुतांचे, काळ्या शक्तीचे आकर्षण हे लहानपणापासूनचेच. बहुधा जन्म अमावास्येचा असल्याने असेल.
पुढे अकरावीत गेल्यानंतर ग्रंथालयातून मी कोणती पुस्तके आणतो, ह्याकडे घरच्यांचे दुर्लक्ष व्हायला लागले आणि मग आमच्या वाचनीय लेखकांच्या यादीत नारायण धारप, खांबेटे, अशोक थोरे, मतकरी, शिरवळकर अशी भर पडायला लागली. सगळ्यात जास्त कशाने आकर्षित केले असेल, तर ते धारपांच्या कथांनी. त्यामुळे मग हळूहळू भुतांचे एकूण प्रकार, काळी जादू ह्याविषयी साहित्यरुपात का होईना पण ज्ञान मिळायला लागले. पण ते खरे किती आणि मसाला किती, ह्याबद्दल अनभिज्ञताच होती. धारपांच्या काही कथांमधून ड्रॅक्युला, बिस्ट, व्हँपायर्स असे उल्लेख मिळायला लागले आणि हळूहळू मग परदेशी भुतावळीशी आमचा परिचय वाढला. 'द ओमेन'मुळे त्यात अजूनच भर पडली. चर्च, ते क्रूस, त्याला घाबरणारी पिशाच्चे, ते गडद गूढ वातावरण आणि पियानोचे स्वर कधी मनाचा आणि मेंदूचा कब्जा घेऊन गेले कळलेच नाही. ह्या सगळ्यात जास्ती कोणी आकर्षित करून घेतले असेल तर ते व्हँपायर्सनी.
पुढे आंतरजालाशी ओळख झाली आणि माहितीचा खजिनाच माझ्यापुढे उघडा झाला. ड्रॅक्युला, व्हँपायर्सच्या मसाला चित्रपटांतून जे काय ज्ञान मिळत होते, त्याच्या कक्षा आता आंतरजालामुळे सर्वदूर पसरल्या आणि माझ्या व्हँपायर प्रेमाला ऊत आला. अनेक दिवस मनात खदखदत असलेले प्रश्न चुटकीसरशी सुटू लागले.
ज्ञानात रोज नवीनवी भर पडू लागली. अशातच व्हँपायर टेंपल सारख्या संकेतस्थळाची ओळख झाली आणि हातात एक अमूल्य पुस्तक लागले - 'द व्हॅंपायर बायबल'. हे पुस्तक मुख्यतः व्हँपायर्सच्या भक्तांसाठी लिहिले गेले आहे, पण फक्त माहितीसाठी म्हणून देखील हे खूपच छान आहे. प्रत्येक काळ्या पंथाच्या आपापल्या अशा काही खास पद्धती, चालीरीती, दैवते असतात. अशाच एकाची ह्यात
ओळख करून देण्यात आली आहे.
ह्या पुस्तकाचे मुख्यत - व्हँपायर्स क्रीड, ड्रॅगन्स स्पीक, अनडेड गॉडस अर्थात व्हँपायर्सला आवाहन कसे करावे, व्हँपायरिझमच्या गुप्त चालीरीती, मानवी जीवनाकडून व्हँपायरच्या दिशेने वाटचाल आणि भविष्यात घडणारा सैतानी शक्तीचा दैवी शक्तीवरील विजय असे भाग आहेत. व्हँपायर्स क्रीडमध्ये व्हँपायरने स्वतःची ओळख दिली आहे. त्यातली काही वाक्ये खरंच छान आहेत :-
I worship my ego and I worship my life, for I am the only God that is.
I am proud that I am a predatory animal and I honour my animal instincts.
I exalt my rational mind and hold no belief that is in defiance of reason.
I recognise the difference between the worlds of truth and fantasy.
I acknowledge the fact that survival is the highest law. I acknowledge
the Powers of Darkness to be hidden natural laws through which I work
my magic.
ह्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे ’अनडेड गॉड्स’ अर्थात व्हँपायर्सचे आवाहन. अनडेड गॉडस हे देखील व्हँपायर्सच, पण उच्च श्रेणीतले. शारीरिक बंधनांतून मुक्त झालेले. ह्यांच्या आशीर्वादानेच आपण स्वतःला सामान्य माणसापासून जिवंत व्हँपायरमध्ये बदलू शकतो. सामान्य माणसामधून व्हँपायर होण्याच्या ह्या प्रवासात त्याग हा सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे. गंमत म्हणजे ह्या प्रकारात कोणाचाही बळी देण्यास अथवा स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यासही कडक विरोध दर्शवण्यात आला आहे. अनडेड गॉड्सची कृपादृष्टी तुम्ही कुठल्याही जिवाची हत्या करून नाही तर जास्तीत जास्त जिवंत जीव त्याच्या सेवेत उपस्थित करून; अर्थात त्याचे अनुयायी बनवून मिळवाल असा स्पष्ट उल्लेख आढळतो.
ह्या सर्वांसाठी करावा लागणारा धार्मिक विधी, त्याचे महत्त्व आणि ह्या विधीतील महत्त्वाचे टप्पे ह्यांची माहिती देखील रंजक.
The Seven Steps of Ritual ·
Entering the Chamber. ·
The Declaration of Self. ·
The Calling to the Four Winds. ·
The Sacrifice. ·
Vampiric Communion. ·
Restoration of Power. ·
Leaving the Chamber.
चार दिशांच्या वार्यांना आवाहन करतानाचे मंत्र तर अंगावर काटा उभा करतात.
Face the south - "Oh Great Undead Gods! Oh most powerful and Ancient
Vampires! Oh true Masters of this earth! Join me here! Be with me in
this place! I Call you now!"
Face the east - "I call to you, the only true gods, and offer up to
you my life essence! Come! Feed upon me! I call You now!"
Face the north - "I seek Your Company! I seek Your Wisdom! I seek
Your Power! Enter freely into this place for You are most welcome! I
Call You now!"
Face the west - "Set aside your doubts for I am sincere! I offer up
to You my life! Take! Eat! Drink of me! For I am Yours to use as You
will. I Call You now!"
त्यानंतर येणारी यशस्वी व्हँपायरची लक्षणे, व्हॅपायरिझमची माहिती, संदर्भ, मानवी जीवनाकडून व्हँपायरकडे जात असताना घडणारे महत्त्वाचे बदल ह्याची माहिती मुळातूनच वाचण्याजोगी.
ह्याचाच एक भाग म्हणून उपलब्ध असलेल्या 'बुक ऑफ ड्रीम्स' मध्ये आपल्याला ड्रॅगन व्हँपायरबद्दल माहिती कळते. त्याचबरोबर जुनी व्हँपायर घराणी, त्यांच्या घराण्यात फक्त तोंडी स्वरूपात उपलब्ध असणारे मंत्र आणि याबरोबरच ह्या दोन जगांना जोडणारा पूल म्हणून कार्य करणार्या स्वप्नावस्था आणि त्यांची अतिशय रोचक माहिती यात उपलब्ध आहे. खरे तर अजूनही खूप काही लिहिण्याचा मानस होता, पण मुळातच हे पुस्तक फक्त २७ पानांचे असल्याने तुमच्या वाचनासाठी थोडा भाग मोकळा ठेवतो. काळ्या बाजूला अर्पण केलेले हे बायबल एक लेखनाचा वेगळाच प्रकार म्हणून नक्कीच वाचनानंद देउन जाते.
पुस्तक उपलब्धता :- http://www.vampiretemple.com/
अनुक्रमणिका
अनुभव
- ग्रंथालयात भटकंती - जाँ-पॉल सार्त्र
- वैज्ञानिक व पुस्तकांचे जग!
- 'साभार परती'चा शिक्का
- बौद्धांचे आणि जैनांचे संस्कृत साहित्यातले योगदान - एक आढावा
- सांगावेसे वाटले म्हणून.....
- डाऊन द मेमरी लेन
- कृतज्ञ!
- पुनर्वाचनाय च

प्रतिसाद द्या