'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
तुमची अत्यंत आवडती पुस्तके (विदेशी अनुवाद सोडून)
तुमची अत्यंत आवडती कोणती पुस्तके आहेत ? (विदेशी अनुवाद सोडून)
यामुळे अनेक वाचकांना चांगली पुस्तके वाचण्याकरिता मदत होईल.
माझ्या आवडीची वाचलेली पुस्तके देत आहे.
१. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर - दुसर्या महायुद्धावरचे अप्रतिम पुस्तक (२२वी आवृत्ती)
२. चक्रवर्ति - मालतीबाई दांडेकर - सम्राट अशोकाच्या चरित्रावर आधारित कादंबरी
३. प्रेषित - जयंत नारळीकर ( विजानकादंबरी)
४. अभयारण्य - जयंत नारळीकर ( विजानकादंबरी)
५. यक्षांची देणगी - जयंत नारळीकर ( विजान कथा संग्रह)
६. मृत्युंजय - शिवाजी सावंत - कर्णाच्या जीवनावरची अत्भुत कादंबरी (१५ वी आवृत्ती)
७. स्वामी - रणजीत देसाई - माधवरावांच्या जीवनावरची कादंबरी (२८वी आवृत्ती)
८. छत्रपति शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर
९. राजा शिवछत्रपति - बाबासाहेब पुरंदरे - (२०वी आवृत्ती)
१०. पर्व-मूळ लेखक-एस.एल.भैरप्पा अनु:उमा कुलकर्णी - महाभारतावरचे आत्तापर्यंतची सर्वात वेगळी कादंबरी
११. ययाति - वि.स.खांडेकर - (३०वी आवृत्ती)
१२. प्रवासी राम - अमरेंद्र गाडगीळ
१३. शालिवाहन = शक - गो.ना.दातार
१४. वीरधवल - नाथमाधव
१५. मर्मभेद - शशी भागवत
१६. चंद्रकांता - मूळ लेखकः देवकीनंदन खत्री - अनु: जनार्दन ओक
१७. पानिपत - विश्वास पाटील - पानिपत महायुद्धावरची सुंदर कादंबरी.
१८. नक्षत्रलोक - पं. महादेवशास्त्री जोशी (प्रथमावृत्ती) खगोलशास्त्राची सुरुवात करणार्यांसाठी सुंदर पुस्तक
१९. विज्ञानकथा १ ते ४ भाग - अविनाश कोलारकर
२०. अवकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर -
२१. कौटीलिय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर
२२. देवानाम् प्रिय - संजीवनी खेर
२३. चंद्रगुप्त - ह.ना.आपटे
२४. टारझन १ ते १० भाग - दत्ता जी. कुलकर्णी
२५. सुलिमानचा खजीना - मालतीबाई दांडेकर
२६. श्यामची आई - साने गुरुजी
२७. कथासरित्सागर - १ ते ५ खंड - ह.अ.भावे
२८. रुमाली रहस्य - गो.नी.दांडेकर
२९. चंद्रावर सफर - ना.वा.कोगेकर (विज्ञान)
३०. बर्म्युडा ट्रँगल - विजय देवधर (विज्ञान) (स्वतंत्र लेखन अनुवाद नाही)
३१. ओशन ट्रँगल - बाळ भागवत (विज्ञान) (स्वतंत्र लेखन अनुवाद नाही)
३२. युगपुरुष नेपोलियन - काशिनाथ नरसिंह केळकर
३३. शिवप्रिया - शुभांगी भडभडे
३४. आर्यपुत्र कुणाल - जैन आनंद प्रकाश
३५. जगज्जेता (सिकंदर) - अशोक व्हटकर (स्वतंत्र लेखन अनुवाद नाही)
३६. ट्रॉयचे युद्ध - अशोक व्हटकर (स्वतंत्र लेखन अनुवाद नाही)
३७. टेम्सच्या लाल लहरी - सौ.उषा पराण्डे (स्वतंत्र लेखन अनुवाद नाही)
३८. चंगीजखान दी एम्परर् - सौ.उषा पराण्डे (स्वतंत्र लेखन अनुवाद नाही)
३९. भिल्लवीर कालिंग - गो.नी.दांडेकर
४०. केलाटाची हाक - डॉ.चंद्रकांत मराठे (विज्ञान)
४१. चाणक्य - आनंद साधले (सोनेरी पान मालिका)
४२. मालविका - आनंद साधले (सोनेरी पान मालिका)
४३. शकुंतला - आनंद साधले (सोनेरी पान मालिका)
४४. उर्वशी - आनंद साधले (सोनेरी पान मालिका)
४५. कुमारसंभव - आनंद साधले (सोनेरी पान मालिका)
४६. वासवदत्ता - आनंद साधले (सोनेरी पान मालिका)
४७. भारतवर्षाचा इतिहास - बाळकृष्ण
४८. एकलव्य - शरद दळवी
४९. राऊ - ना.सं.इनामदार
५०. झुंज - ना.सं.इनामदार
५१. नर्मदे हर - जगन्नाथ कुंटे
५२. साधनामस्त - जगन्नाथ कुंटे
५३. कालिंदी - जगन्नाथ कुंटे
५४. नित्य निरंजन - जगन्नाथ कुंटे
५५. साद देती हिमशिखरे - मूळ लेखकः गो.खं.प्रधान - मराठी अनुवाद - रामचंद्र जोशी
५६. दिव्यस्पर्शी - राम प्रधान चरित्र - धनंजय देशपांडे
५७. किमिदिन - धनंजय देशपांडे (भय)
५८. कालांकित - प्रदीप दळवी
५९. ययाति - वि.स.खांडेकर
६०. आर्य - वसंत पटवर्धन
सध्या एवढीच पुस्तके देत आहे.
लवकरच माझी यादी मोठी करेन
धन्यवाद,





घेतली गेली पण नावडती ठरल्याने
घेतली गेली पण नावडती ठरल्याने पैसे वाया गेल्याची हळहळ वाटतेय अशा पुस्तकांची नावे विचारली असतीस तर तशी लिस्ट करणे सोपे झाले असते. आवडत्या पुस्तकांची यादी करणे म्हणजे कैच्याकैच!
छान कल्पना
कल्पना छान आहे वेदश्री.
नवीन धागा निर्माण करुयात यासाठी
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
आवडती -देशी अनुवादित पुस्तके....
माझ्या संग्रहातील अनुवादित देशी:--
सुंदर यादी
चित्राजी
तुमच्या यादीने माझे मन जिंकले.
साद देती हिमशिखरे: जी. के. प्रधान - अनु. रामचंद्र जोशी
हे पुस्तक माझ्या मनाचा बराच हळवा कोपरा आहे.
आयुष्यात जेव्हा जेव्हा खचून जाण्याचे प्रसंग समोर आले तेव्हा तेव्हा या पुस्तकांतून मिळालेल्या विचारांनी बळ दिले आहे मला. तेव्हा या पुस्तकाच्या निवडीने मला जिंकलेत तुम्ही
ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेन त्यांनी अवश्य वाचावे. अगदी नितांत सुंदर , स्पष्ट आणि सोप्य शब्दांत अध्यात्माबरोबा जीवनाचे सार उलगडून दाखवले आहे या कादंबरीत.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
या धाग्यात प्रतिसाद
या धाग्यात प्रतिसाद लिहिण्याइतका वेळ नाही

तुमची यादी अपेक्षेपेक्षा खूपच छोती वाटतेय
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"