'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
तुमची अत्यंत आवडती कोणती पुस्तके संग्रहात आहेत ? (विदेशी अनुवाद सोडून)
बहुतेक वेळा तुम्हाला एखादे पुस्तक आवडते आणि ते खूप खूप आवडते. आज ना उद्या कधीतरी ते पुस्तक तुम्ही विकत घेता व संग्रहात ठेवता. तर अशी तुमची अत्यंत आवडती कोणती पुस्तके संग्रहात आहेत ? (विदेशी अनुवाद सोडून) ते सांगावे यासाठी हा उपक्रम.
कोणती पुस्तके अधिक वाचकांच्या संग्रहात आहेत हे माहिती झाल्यावर मोजकी पुस्तके वाचणार्या वाचकांना अथवा ज्यांना त्या पुस्तकांबद्दल माहिती नाहिये अशा सर्वांना जास्तीत जास्त चांगल्या पुस्तकांची ओळख व्हावी हा उद्देश / हेतू या चर्चे मागे आहे. तुमच्याकडे असलेल्या आवृत्तीचा उल्लेख केलात तर वाचकांना प्रसिद्ध पुस्तकांची माहिती अनायासेच होईल.
माझ्या संग्रहातील यादी देत आहे:
१. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर - दुसर्या महायुद्धावरचे अप्रतिम पुस्तक (२२वी आवृत्ती)
२. चक्रवर्ति - मालतीबाई दांडेकर - सम्राट अशोकाच्या चरित्रावर आधारित कादंबरी
३. प्रेषित - जयंत नारळीकर ( विजानकादंबरी)
४. अभयारण्य - जयंत नारळीकर ( विजानकादंबरी)
५. यक्षांची देणगी - जयंत नारळीकर ( विजान कथा संग्रह)
६. मृत्युंजय - शिवाजी सावंत - कर्णाच्या जीवनावरची अत्भुत कादंबरी (१५ वी आवृत्ती)
७. स्वामी - रणजीत देसाई - माधवरावांच्या जीवनावरची कादंबरी (२८वी आवृत्ती)
८. छत्रपति शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर
९. राजा शिवछत्रपति - बाबासाहेब पुरंदरे - (२०वी आवृत्ती)
१०.पर्व - मूळ लेखक - एस.एल. भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी - महाभारतावरचे आत्तापर्यंतची सर्वात वेगळी कादंबरी (७वी आवृत्ती)
११.ययाति - वि.स.खांडेकर - (३०वी आवृत्ती)
१२.कोसला - भालचंद्र नेमाडे - कादंबरी - आठवी आवृत्ती)
१३.इंदिरा गांधी - मूळ लेखिका - पुपुल जयकर - अनु: अशोक जैन ( १२वी आवृत्ती)
१४.वीरधवल - नाथमाधव
१५.सात सक्कम त्रेचाळिस - किरण नगरकर - (द्वितीयावृत्ती)
१६.काजळमाया - जी.ए.कुलकर्णी - कथासंग्रह
१७.पानिपत - विश्वास पाटील - पानिपत महायुद्धावरची सुंदर कादंबरी.
१८.नक्षत्रलोक - पं. महादेवशास्त्री जोशी (प्रथमावृत्ती) खगोलशास्त्राची सुरुवात करणार्यांसाठी सुंदर पुस्तक
१९.किमयागार - अच्युत गोडबोले - विज्ञानाच्या सर्व अंगांना स्पर्शणारा हा ग्रंथ
२०.अवकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर - (प्रप्रथमावृत्ती)
सध्या एवढीच पुस्तके देत आहे. नंतर सवडीने अजून पुस्तके सांगेन.
धन्यवाद,
सागर





माझ्याकडे
१. महाभारत-११ खंड - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी
२. संभाजी- विश्वास पाटील
३. पानिपत- विश्वास पाटील
४. झाडाझडती- विश्वास पाटील
५. दुर्गभ्रमणगाथा - गोनीदा
६. दुर्गदर्शन - गोनीदा
७. माचीवरचा बुधा - गोनीदा
८. रानभुली - गोनीदा
९. जैत रे जैत - गोनीदा
१०. वाघरू/त्या तळी रूखातळी - गोनीदा
११. पवनाकाठचा धोंडी - गोनीदा
१२. पडघवली - गोनीदा
१३. तुंबाडचे खोत (भाग १ व २) - श्री. ना. पेंडसे
१४. हद्दपार - श्री. ना. पेंडसे
१५. गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
१६. गारंबीची राधा - श्री. ना. पेंडसे
१७. हद्दपार - श्री. ना. पेंडसे
१८. कोसला - भालचंद्र नेमाडे
१९. हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे
२०. राजा शिवछत्रपति - बाबासाहेब पुरंदरे
२१. १८५७ चे स्वातंत्र्यसमर - स्वातंत्र्यवीर सावरकर
२२. निवडक द. मा.- द. मा. मिरासदार (संकलित)
२३. भुताचा जन्म - द. मा. मिरासदार
२४. खेकडा - रत्नाकर मतकरी
२५. कबंध - रत्नाकर मतकरी
२६. फाशी बखळ - रत्नाकर मतकरी
२७. मृत्युंजयी - रत्नाकर मतकरी
२८. रंगांधळा - रत्नाकर मतकरी
२९. मध्यरात्रीचे पडघम - रत्नाकर मतकरी
३०. संभ्रमाच्या लाटा - रत्नाकर मतकरी
३१. ओसाडवाडीचे देव - चिं वि. जोशी
३२. तारकांचा विश्वात - पराग महाजनी
३३. कृष्णविवरे - मोहन आपटे
३४. अंतरिक्षाचा वेध - सुधा रिसबूड
३५. शाळा - मिलिंद बोकील
माझ्याकडे
१. महाभारत-११ खंड - विदर्भ मराठवाडा बुक कंपनी
२. संभाजी- विश्वास पाटील
३. पानिपत- विश्वास पाटील
४. झाडाझडती- विश्वास पाटील
५. दुर्गभ्रमणगाथा - गोनीदा
६. दुर्गदर्शन - गोनीदा
७. माचीवरचा बुधा - गोनीदा
८. रानभुली - गोनीदा
९. जैत रे जैत - गोनीदा
१०. वाघरू/त्या तळी रूखातळी - गोनीदा
११. पवनाकाठचा धोंडी - गोनीदा
१२. पडघवली - गोनीदा
१३. तुंबाडचे खोत (भाग १ व २) - श्री. ना. पेंडसे
१४. हद्दपार - श्री. ना. पेंडसे
१५. गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
१६. गारंबीची राधा - श्री. ना. पेंडसे
१७. हद्दपार - श्री. ना. पेंडसे
१८. कोसला - भालचंद्र नेमाडे
१९. हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे
२०. राजा शिवछत्रपति - बाबासाहेब पुरंदरे
२१. १८५७ चे स्वातंत्र्यसमर - स्वातंत्र्यवीर सावरकर
२२. निवडक द. मा.- द. मा. मिरासदार (संकलित)
२३. भुताचा जन्म - द. मा. मिरासदार
२४. खेकडा - रत्नाकर मतकरी
२५. कबंध - रत्नाकर मतकरी
२६. फाशी बखळ - रत्नाकर मतकरी
२७. मृत्युंजयी - रत्नाकर मतकरी
२८. रंगांधळा - रत्नाकर मतकरी
२९. मध्यरात्रीचे पडघम - रत्नाकर मतकरी
३०. संभ्रमाच्या लाटा - रत्नाकर मतकरी
३१. ओसाडवाडीचे देव - चिं वि. जोशी
३२. तारकांच्या विश्वात - पराग महाजनी
३३. कृष्णविवरे - मोहन आपटे
३४. अंतरिक्षाचा वेध - सुधा रिसबूड
३५. शाळा - मिलिंद बोकील
सध्यातरी एवढीच आहेत. अजून अनेक घ्यायची आहेत.