• '

तुंबाडचे खोत

 

पुस्तकाचे नाव

तुंबाडचे खोत
 
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

भाषा: 
मराठी
किंमत: 
600.00
पृष्ठसंख्या: 
1300
 
 

पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:

मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पेंडसे यांची आजची पदवी. रसिकांची आणि स्वतः पेंडसे यांचीही आजवर अशी समजूत होती की 'रथचक्र' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. 'एल्गार' पासून सुरु झालेल्या त्यांच्या कादंबरीप्रवासाचा अखेरचा मुक्काम म्हणजेच 'रथचक्र'. आणि नंतर ते त्यांच्या स्वभावधर्मानुसार लेखन करत राहतील. पण मराठी कादंबरीचे भाग्य असे की 'रथचक्र' नंतर आता आणखी एक महाकाय लोकविलक्षण अशी कादंबरी शिरुभाउंनी लिहिली आहे ती म्हणजे 'तुंबाडचे खोत'. मुळातच या द्विखंडी कादंबरीचा आवाकाच प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि समाप्ती होती ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्रप्राप्तीच्या प्रसंगी. तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासून विद्यमान वंशजांपर्यंत या इतिहासाची व्याप्ती आहे. या सव्वाशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनेक घटना भेटत राहतात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसरीसारखी नाही व एक घटना दुसरीसारखी नाही. एकूण एक सर्वच व्यक्ती व घटना स्वभावविशेष अशी व काळ सव्वाशे वर्षांचा तरी स्थळ मात्र एकच--तुंबाड आणि तुंबाडचा परिसर.
तुंबाडच्या खोतांच्या कुलवृत्तांताचीही बखर एखाद्या रम्याद्भूत आणि उग्रभीषण कहाणीसारखीच आहे.