'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
जागृत पुस्तकविक्रेत्यांचे पत्ते!
थोडेसे पैसे जमले की आपल्या गावातल्या कोणत्या पुस्तकविक्रेत्याकडे आपली पावले सहजच वळतात.. तो ९५% तरी 'केलेल्या नवसाला पावणार्या जागृत देवस्थानासारखा' जागृत पुस्तकविक्रेता असतो. उर्वरीत ५% म्हणजे पुस्तकांची निवड करायला भरपूर वाव असतो त्यामुळे दुकानदार जरी खत्रूड असला तरी मन मारून तिकडे जावे लागते अशा विभागात मोडणारे असण्याचीच शक्यता जास्त असते. इथले आपण सर्व निरनिराळ्या प्रांतातून एकत्र जमतोय तर मग आपल्या आवडत्या अशा या 'जागृत' पुस्तकविक्रेत्यांची यादीच का करू नये? ही यादी नक्कीच सर्वांना उपयोगी पडेल असे वाटते. मग काय म्हणता? करूया सुरूवात?





औरंगाबाद
मीच सुरू करते!
औरंगाबादमध्ये एस. बी. कॉलेज रोड, औरंगपुर्यातले बुक पॅलेस हे दुकान चांगले आहे. त्याच्याकडे राजहंस प्रकाशनाची बहुतेक पुस्तके सहजी मिळतात आणि सर्व्हीस पण चांगली देतो. मात्र दुकान असल्याने पुस्तके स्वतः चाळून बघायची संधी मिळत नाही, घेऊन गेलेल्या लिस्टवरच मदार जास्त ठेवावी लागते! जास्त किमतीची खरेदी करून मागितली तर सूटदेखील मिळते.
औरंगाबादची माझी पुस्तकपंढरी म्हटले तर वावगे ठरणार नाही असे ठिकाण म्हणजे औरंगपुर्यातले बलवंत वाचनालय. तिथे त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये बहुतेक वेळातरी कुठले ना कुठले पुस्तकप्रदर्शन लागलेलेच असते.. कधी अक्षरधारा असते तर कधी मायबोली कुसुमाग्रज तर कधी ग्रंथाली वगैरे. दरवेळी निरनिराळ्या पुस्तकप्रदर्शनांच्या निमित्ताने वेगवेगळी माणसे भेटली तरी त्यातली बहुतेक माणसे अगदी मनमोकळी आणि उत्तम सर्व्हीस देणारीच असल्याने परत परत जायला मन अगदी तत्परच असते माझे. प्रदर्शनात मस्त सूट मिळते हेवेसांनलगे!
छान धागा.. मात्र
मी वाचनलयांत रमणारा मणूस.. पुस्तके बव्हंशी वाचनालयातून आणून वाचतो. आवडल्यावर(च) विकत घेतो. त्यामुळे जी संग्रही आहेत ती कुठे मिळतील याचा आगाऊ अंदाज असतो आणि तिथे गेल्यावर पुस्तक लगेच मिळते. त्यामुळे कोणते पुस्तकाचे दुकान चांगले हे सांगणे कठीण आहे.
नुसते पुस्तके बघत फिरायला कॉसवर्ड अथवा तत्सम दुकाने आवडतात जिथे तासन् तास पुस्तके बघत चाळत फिरता येते प्रसंगी वाचुन बघता येतात.
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
छान धागा
वा.. उत्तम धागा..
मी पुर्वी (विद्यार्थी असे पर्यंत) वाचनालयावर विसंबून प्राणी होतो.. तेव्हा पुस्तकांच्या दुकानात हावरटपणे हिंडत असे आणि नोकरी लागली की खूप पुस्तके विकत घेउ अशी स्वप्ने बघत असे.. पण वाचनालयातून पुस्तक आणण्यासारखी मजा नाही.. आपण पुस्तक विकत घ्यायचे म्हटले की नेहेमी 'बेअर' असतो आणि वाचनालयात 'बुल'..
पण गेली काही वर्षे एका जागी स्थिर नसलेले बूड व महाराष्ट्रतून बाहेर बराच काळ राहिल्याने पुस्तक विकत घेणे गरजेचे झाले..
पुण्यात पाथफाइंडर हे माझे आवडते ठिकाण.. फार प्रचंड मोठे नाहिये (लँडमार्क वगैरे दुकांनांसारखे) पण बर्यापैकी चांगले कलेक्शन आहे.. पुस्तके सांगून ठेवली तर मिळतात देखील.. पुण्यात नीलायम टॉकीजच्या जवळ आहे.. कोथरुड सिटी प्राइड मधल्या क्रॉसवर्ड्समध्ये देखील बरीच पुस्तके मिळतील.. अनवट पुस्तके नाही पण राजहंस ते पद्मगंधा प्रकाशनापर्यंत नवीन बरीचशी पुस्तके उपलब्ध असतात..
इंग्रजी पुस्तकांसाठी मला लँडमार्क फार उत्तम वाटले होते.. अर्थात मी फारसा तिथे गेलेलो नाही.. भारतात इंग्रजी पुस्तके खरेदी करायची असतील तर माझी सर्वात आवडती जागा www.flipkart.com इथे कायम डिस्काउंट असतो, सेवा अतिशय उत्तम आणि पुस्तके दिलेल्या तारखेच्या आत कुरिअरने पोच होतात.. अतिशय गुणी वेबसाईट..
पाथफाईंडर, क्रॉसवर्ड आणि खरेदी!
>पुण्यात पाथफाइंडर हे माझे आवडते ठिकाण.. फार प्रचंड मोठे नाहिये (लँडमार्क वगैरे दुकांनांसारखे) पण बर्यापैकी चांगले कलेक्शन आहे.. पुस्तके सांगून ठेवली तर मिळतात देखील.. पुण्यात नीलायम टॉकीजच्या जवळ आहे..
दुकानात पुस्तकांचे कलेक्षन सुंदर आहे पण वेळेचा घोळ २-३दा झाला त्यामुळे इतके दूर जाऊनही निराश झाल्यासारखे झाले मला. दुकान दुपारी बंद असते १ ते ४ (की अशीच काहितरी वेळ आहे). गेले तेव्हा गाव उंडारून नेमकी याच पट्ट्यातली वेळ उजाडली तिथे पोहोचायला. दुकान बंद! आतमध्ये हिंडू दिले असते तर एखादे पुस्तकतरी वाचून झाले असते माझे पण नाही. माझ्यासारख्या गावठी माणसाला दुपारी दुकाने बंद असण्याचा प्रकार एकंदरीत नविनच असल्याने हा प्रकार खटकला इतकेच. अर्थात पुढच्यावेळी वेळेची नीट चौकशी करून योग्य त्या वेळीच जाईन हेवेसांनलगे!
>कोथरुड सिटी प्राइड मधल्या क्रॉसवर्ड्समध्ये देखील बरीच पुस्तके मिळतील.. अनवट पुस्तके नाही पण राजहंस ते पद्मगंधा प्रकाशनापर्यंत नवीन बरीचशी पुस्तके उपलब्ध असतात..
डेक्कनला होते त्या क्रॉसवर्डचा अनुभव तितकासा चांगला नाही (बहुतेक म्हणूनच बंद पडले का?!). सूट तर नाहीच उलट किंमती जास्त लावायचे का काय असे वाटावे अशी गत. मराठीचे कलेक्शन पण म्हणावे तितके नव्हते. तहान लागली म्हणून पाणी मागितले तर हे पुस्तकांचे दुकान आहे, ग्रोसरी शॉप नाही असे ऐकायला मिळाले होते.
असो.
आमच्या आताच्या कुठल्याही घराशेजारी वाचनालय नसल्याने आम्हाला पुस्तके विकतच घेऊन वाचावी लागतात. माझी खरेदी मराठीच पुस्तकांची असते म्हणजे ती आईलाही वाचायला देता येतात मग. पारायणं देखील करता येतात हक्काने. इंग्लिश पुस्तके नेटवर फुकट मिळतात ९९% तरी! मागे श्रावणने काही पुस्तके वाचायला दिली होती.. मी तर वाचली सगळी पण आईनेही वाचायची तर ती औबादला नेणे जरूरी होते. श्रावणने जरी आनंदाने परवानगी दिली तरी तसे करणे मला श्रेयस्कर वाटले नाही, न जाणो कोणी आले आणि नेमके तेच पुस्तक हडपून नेले म्हणजे! त्यातली सगळी पुस्तकं मला विकत घेऊन आईला देता आली वाचायला पण लंप्याचा 'वनवास' आउट ऑफ प्रिंट असल्याने काही मिळालाच नाही. आजही मनाला चुटपुट लागून राहिली आहे की मी ज्या पुस्तकाचा आनंद अनुभवला तो अनुभवायची खूप इच्छा असूनही आईला नाही अनुभवता आला. अर्थात वनवास जर लंपास झाला असता तर तो मी नसते परत करू शकले श्रावणला... त्यामुळे त्या अर्थाने पहाता जे होते ते भल्यासाठीच!
परवाच 'वनवास' पाहिलं पुण्यात
परवाच 'वनवास' पाहिलं पुण्यात बाजीराव रस्त्यावरच्या प्रदर्शनात.
मिळाले एकदाचे 'वनवास'!
आज मी प्रच्चंड खूष आहे 'वनवास' मिळाले म्हणून. पाथफाईंडरमध्ये मिळाले एकदाचे. गंमत म्हणजे त्यांच्याकडे वनवासच्या अजुन ७-८ प्रती तर रॅकमध्येच ठेवलेल्या पाहिल्या मी! आज परत ढिगांनी अडचणी आल्याने दुकानापाशी पोहोचायला २ वाजले होते पण तुळशीबागेत तब्बल २ तासाचा पावसात भिजलेला टीपी करुन परत आल्यावर हवी ती सर्व पुस्तके मिळाल्याने मात्र खूप आनंद झाला. अर्थात बिलात फक्त ७५ रुपयेच कमी केल्याने मन जरा खट्टू झाले खरे पण ही पुस्तके मिळणे जास्त जरूरीचे होते जे मिळाले. पुस्तकांचे कलेक्षन मस्त आहे त्यांच्याकडचे.
पुण्यातल्या अब चौकातल्या रसिक
पुण्यातल्या अब चौकातल्या रसिक प्रकाशनचा मला खूप चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडे एखाद वेळी उपलब्ध नसलेली पुस्तकेही, त्यांनी मला मागवून दिली आहेत.
सहमत
पुण्यातल्या रसिकचा अनुभव सुंदर आहे
अनेक कारणे आहेत तेथूनच पुस्तके का घ्यावीत याची
१. पुस्तके हातात घेऊन पाहता येतात
२. हवे असलेले पुस्तक उपलब्ध आहे की नाही ते लगेच पाहतात व वेळ लागणार असेन तर तसे सांगतात किंवा १५-२० मिनिटांत पुस्तकच आणून देतात
३. डिस्काऊंट चांगला देतात. मोठ्या खरेदीवर १५-२० टक्के डिस्काऊंट नक्की देतात
अजून काय हवे?
त्यामुळे मी पुण्याला आलो की रसिकमधूनच खरेदी करतो पुस्तकांची.
अत्रे सभागृहातील प्रदर्शनातही बरीच पुस्तके आहेत. तेथूनही १० % डिस्काऊंट मधे पुस्तके घेता येतात.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ठाण्यातल्या मॅजेस्टिकात हवी
ठाण्यातल्या मॅजेस्टिकात हवी असलेली सगळी पुस्तके एकाच वेळी कधीच मिळत नाहीत. पण पुरेशी चिकाटी बाळगली, तर पुस्तके मागवून ठेवली जातात. राखून ठेवली जातात.
ठाण्यात मॅजेस्टिकच्या समोर न्यू गर्ल्स स्कूलमध्ये एक पुस्तक प्रदर्शन बरेचदा असतं, त्यात बर्याच प्रकाशनांची पुस्तकं असतात. पण तिथला विक्रेता उद्धट आणि तुसडा आहे. त्याला पुस्तक-लेखक-प्रकाशन वगैरेंची तर काही माहिती नसतेच, शिवाय मिळवायची इच्छाही.
बाकी माझ्या बर्याचश्या गरजा ठाण्यातलं मराठी ग्रंथ संग्रहालय भागवतं. तिथला स्टाफ अजिबात 'सरकारी' नाहीय. पुस्तकं सुचवणं, वेळा थोड्या पुढे-मागे करून पुस्तकं पुरवणं, नवीन पुस्तकं सातत्यानं आणि वाचकांच्या सुचवणीवरून(ही!) खरेदी करणं, पुस्तकं राखून ठेवणं - असे माझे लाड होतात तिथे. क्वचित पुस्तकं जुनी, पिवळी पडलेली, खिळखिळी असूही शकतील - पण कितीही जुनी पुस्तकं तिथे नक्की मिळतील.
- मेघना भुस्कुटे
आयडियल बूक स्टोअर, छबिलदास
आयडियल बूक स्टोअर, छबिलदास गल्ली, दादर (प.) मुंबै. पुस्तकांत रमण्याचे एक प्रसन्न ठिकाण...!
खरंय...
अग्गदी खरंय तुमचं, दिगुकाका. परवा सॉल्लिड समाधान मिळाले तुमच्या आणि काकूच्या मदतीने आयडियलमधून हवी असलेली बरीचशी पुस्तके आकर्षक डिस्काऊंटमध्ये विकत घेऊन. आता मला २-३ महिने आराम आहे पुस्तकखरेदीला... आता फुल्ल स्विंग पुस्तकवाचन झिंदाबाद!
इंग्रजी..
इंग्रजी पुस्तकांसाठी तुम्ही बुकझोन मध्ये जिमीभाई किंवा मार्टीन ला विचारु शकता..त्याच्याकडे जर एखादे पुस्तक नसेल तर तो मागवुन देतो.
त्यांच्या दुकाना चा फोन नंबर आहे: २२०५४६१६
राधा१
हे बुक झोन मुंबईत आहे का?
हे बुक झोन मुंबईत आहे का?
इंग्रजी..
इंग्रजी पुस्तकांसाठी तुम्ही बुकझोन मध्ये जिमीभाई किंवा मार्टीन ला विचारु शकता..त्याच्याकडे जर एखादे पुस्तक नसेल तर तो मागवुन देतो.
त्यांच्या दुकाना चा फोन नंबर आहे: २२०५४६१६
राधा१
इंग्रजी पुस्तके
इंग्रजी पुस्तकांसाठी २ संकेतस्थळे सुचवावीशी वाटतात
http://www.infibeam.com/
(येथे डिस्काऊंट जास्त मिळतो आणि फ्री शिपिंग पण आहे)
आणि
http://www.flipkart.com/
(येथे डिस्काऊंट मर्यादित आहे पण फ्री शिपिंग आहे)
ही दोन संकेतस्थळे खूप छान आहेत.
माझा वैयक्तीक खरेदीचा अनुभव खूप छान आहे.
ई-बे एकदम बकवास आहे. त्याचा वाटेला कोणी जाऊ नये
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
भारतात
मराठी पुस्तके भारतात असताना ऑनलाईन मागवायची असतील तर चांगल्या साईट्स कोणत्या?
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
तुम्हाला हवी असलेली माहिती
मेहता पब्लिशिंग हाऊस आणि ई-रसिक.कॉम
पण ई-रसिक आणि मेहता यांच्याशी फोनवर बोलून डीस्काउंट शिपिंग चार्जेस नीट विचारुन घ्या.
थोडी घासाघीस केलीत तर रसिकमधून चांगला डिस्काऊंट मिळतो. २० ते ३० %
मेहताची अनुवादीत पुस्तके एकदम ६ घेतलीत तर निम्म्या किमतीत मिळतील.
संपर्क क्रमांकः
ईरसिक.कॉम - भारत दारवटकर - ९३७१२१८३७० याच्याशी फोनवर बोललात तर डिस्काऊंट सकट एकूण किंमत सांगेन. नेट्बँकींग ने पैसे ट्रान्स्फर करायची पण सोय आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस - ०२०-२४४६०३१३
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अरे वा! धन्यवाद अजून
अरे वा! धन्यवाद
अजून भारतातल्या भारतात ऑनलाईन पुस्तके घेतलेली नाहित आता घेऊन बघतो
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अनुभव चांगला मिळेल
नक्की घे ऋषि
तुझा हा अनुभव सुंदर असेन याची खात्री आहे. त्या भरत ला तू माझा मित्र आहेस म्हणून सांग, मग तुला जास्त नाही ताणणार तो. बर्यापैकी चांगला डिस्काऊंट देतो तो. शिपिंग पण वाजवी दरात देतो. इकडे बंगळुरात मला चांगली पुस्तके घेता येत आहेत याचाच आनंद आहे
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
च्यामारी, मला गरज होती तेव्हा
च्यामारी, मला गरज होती तेव्हा ही इतकी उपयुक्त माहिती दिली नाही कुणी. आणि आता माहितीचा महापूर. बरंय..
- मेघना भुस्कुटे
पुढच्या खरेदीसाठी वापर कर
मेघना,
यापुढच्या खरेदीला उपयोगी पडेलच की ही माहिती
खरेदीला शुभेच्छा.
खरेदी झाली की कोणती पुस्तके घेतलीस ते नक्की सांग.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
स्न्हेहल प्रकाशनचा पत्ता वा
स्न्हेहल प्रकाशनचा पत्ता वा ईपत्ता आहे का कोणाकडे? असल्यास कृपया द्यावा, एका स्नेह्यांना तातडीने हवा आहे. मी शोधायचा प्रयत्न केला पण सापडला नाही.
स्नेहल प्रकाशन चा पत्ता व संपर्क क्रमांक
Snehal Prakashan
36 B,Gurudatta Sahvas
470/498 Shanivar Peth,
Pune 411030.
Tel : 020-24452911
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
सागर, धन्यवाद!
सागर, धन्यवाद!
डेक्कनवरच्या इंटरनॅशनलचाही
डेक्कनवरच्या इंटरनॅशनलचाही अनुभव छान
मुंबई
मुंबईत पीपल्स बुक हाऊसला पर्याय नाही. मध्यवर्ती जागा (फोर्ट); मराठी, इंग्रजी आणि हिंदीमधली इतर ठिकाणी सहसा न मिळणारी पुष्कळ पुस्तकं मिळतात. दादरला आयडिअलपेक्षा मला मॅजेस्टिकचं स्टेशनसमोरचं 'भांडार' आवडतं. कितीही वेळ भटका, पुस्तकांचे गठ्ठे उपसा, चाळा... चालून जातं.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
माझी आवडती दुकाने
मराठी पुस्तकांसाठी मी आयडियलमध्ये जातो आणि इंग्रजी पुस्तकांसाठी मी Strand Book Store मध्ये जातो. आयडियल हे दुकान छबिलदास रोड, दादर इथे आहे आणि Strand हे पिरोजशा मेहता रोड, फोर्ट इथे आहे. दोन्ही ठिकाणी पुस्तके स्वतः हाताळायला मिळतात, जे माझ्या द्रुष्टीने महत्वाचे आहे. Strand मध्ये घसघशीत सूट मिळते, ते सुध्हा न विचारता. आयडियलमध्ये अंदाजे १०% सूट मिळते, पण माझ्या द्रुष्टीने सूट मिळणे इतके महत्वाचे नाही.
हे कुठे लिहावे ते समजले नाही.
हे कुठे लिहावे ते समजले नाही. आत्ता इथे लिहीतेय दुसरीकडे हलवायचे असेल तर प्लीज सांगा.
मेहता पब्लिशिंग हाऊस मध्ये सेल चालु आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस
४०% पर्यंत सूट
दि. ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर
वा!
चांगली माहिती.. धागा कोणता आहे यापेक्षा माहिती महत्त्वाची

सेलसाठी मेहतांकडे चक्कर टाकतो
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
अगं, नाही, नाही बेष्ट जागी
अगं, नाही, नाही बेष्ट जागी लिहिले आहेस!! चाललेच ह्या शनिवारी!
स्वाती, काल ह्या प्रदर्शनाला
स्वाती, काल ह्या प्रदर्शनाला भेट दिली. २-३ पुस्तकेही उचलली आणि सभासदत्वही घेतले. (टी बुक क्लबचे नव्हे.)
कोणी जाऊन आलेय का?
पण, प्रदर्शन खास नाही वाटले. दुकानातील पुस्तकेही खास वाटली नाहीत. अत्रेमध्ये शुभमचे प्रदर्शन सुरु आहे ही माहिती तेथील विकेत्यानीच दिली, तिथे मात्र जाता आले नाही
:)
घर बदलाच्या गडबडीत जाणे जमलेच नाही

पण हे वाचून बुडत्याला काडीचा आधार ह्या नियमाने बरे वाटले
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
LOL ऋ!
LOL ऋ!
यशोधरा बर झाल सांगीतलेस ते.
यशोधरा बर झाल सांगीतलेस ते. माझे प॑ण राहिले विकएंडला जायचे.