'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
कुहू : पुस्तकविश्वच्या वाचकांसाठी खास सवलत
मुखपृष्ठ
|
नमस्कार,
'कुहू' या पहिल्या भारतीय मल्टीमीडिया कादंबरीबद्दल आपण वाचले असेल. ‘कुहू’च्या कथानकामध्येच ‘कुहू’च्या मल्टिमीडिया स्वरूपाची बीजं रुजलेली आहेत. जंगलात राहाणाऱ्या कुहू या कोकीळ पक्ष्याची ही रूपक कथा. तुमच्या आमच्या कविताताई म्हणजेच पुस्तकविश्वच्या सन्माननीय सदस्या आणि प्रसिद्ध लेखिका कविता महाजनांचा हा प्रकल्प आहे.
मराठीतील अग्रणी साप्ताहिक लोकप्रभा 'कुहू' ची ओळख करुन देतांना म्हणते,
"‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी आहे म्हणजे नेमकं काय आहे.. अगदी थोडक्यात सांगायचं तर ‘कुहू’ हे एक टीव्ही अथवा संगणकावर बघत ऐकण्याचे पुस्तक आहे. यात मजकूर ऐकताना वाचकाला समोर अनेकविध गोष्टी दिसत राहतील. त्या गोष्टी म्हणजे चित्रं, छायाचित्रं, कॅलिग्राफी, व्हिडीओ आणि अॅनिमेशनसुद्धा. ऐकताना कथानकाला गाणी, वाद्यसंगीत, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज यांची जोड असेल. अनेक कलांचा संगम असलेलं आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कलात्मक वापर करून बनलेलं हे मिश्र माध्यमातील हे ‘पुस्तक’. भारतीय साहित्यातला हा पहिलाच प्रयोग. त्या दृष्टीनेही या प्रयोगाचे एक वेगळे महत्त्व नक्कीच वाटते."
पुस्तकविश्वच्या वाचकांसाठी कविताताई ‘कुहू’ खास १५% सवलतीच्या दरात घेउन येत आहेत, त्याची माहिती खालीलप्रमाणे,
१. कुहू ( मराठी / इंग्लिश ) पुस्तक + डीव्हीडी : मूळ किंमत रु.१५००/- ( १५ % सवलतीने रु.१२७५/- )
२. कुहू बालआवृत्ती ( मराठी / इंग्लिश ) पुस्तक + डीव्हीडी : मूळ किंमत रु.१०००/- ( १५ % सवलतीने रु. ८५०/- )
टपालखर्च ( प्रत्येक प्रतीमागे ) : मुंबई ( रु. ३०/-), बाकी महाराष्ट्र ( रु. ६०/-), भारतातील इतर राज्ये ( रु. १००/-), परदेश ( रु. १५००/-).
दोनहून अधिक प्रती कुणाला हव्या असतील तर अधिक सवलत दिली जाईल.
'कविता महाजन' या नावाने पुस्तकाची रक्कम + टपालखर्च यांचा डीडी पाठवून कोणत्या प्रती हव्या आहेत हे कळवले की त्या दिलेल्या पत्त्यावर कुरीयरद्वारे पाठवण्यात येतील.
'कुहू'बाबतच्या पत्रव्यवहारासाठी kuhoo2010@gmail हा आयडी वापरावा, संपर्कासाठी खालील पत्ता वापरावा.
दिशा क्रिएटिव्हजः
१०१, ए/१३, नायगारा, एव्हरशाईन सिटी,
भारतीय स्टेट बँकेसमोर, वसई (पूर्व),
जि. ठाणे ४०१२०५
दूरध्वनी: 0250-2462808
ईमेल: kuhoo2010@gmail.com
हेच म्हणतो
>>अॅडल्ट आणि चिल्ड्रेन या दोन आवृत्त्यांतील फरक काय आहे?
या प्रश्नाचे उत्तर जाणुन घ्यायला आवडेल.
वेगळे काय?
१. कुहूच्या संकेतस्थळावर आपल्या बालआवृत्तीविषयीच्या प्रश्नाचे उत्तर मिळेलच.तरी इथे पुन्हा ते नोंदवते आहे. बालआवृत्तीत गंभीर तत्त्वज्ञान, वर्णनात्मक भाग, मृत्यूसारखे विषय वगळून फक्त गोष्ट ठेवली आहे. मूळ कादंबरीच्या कथानकाचा मुलांना पेलेल असा हा सारांश आहे.तथापि ती लहानशी गोष्ट नसून दोन भागांत अनेक लहान-लहान प्रकरणे असलेली कादंबरीच आहे.मूळ कादंबरीत रॉयल साइज, २०८ पाने,तीन भाग, ( डीव्हीडीत कथानकासह २१ गाणी+१ बंदीश. वेळ सव्वाचार तास.)४३ पेंटींग्ज आहेत. बालआवृत्तीत रॉयल साइज, १०० पाने, दोन भाग व कमी पेंटीग्ज आणि वेगळी मांडणी आहे. ( डीव्हीडीत कथानकासह ३ गाणी आहेत. वेळ सव्वादोन तास.)
किमतीबाबत
२. किमतीबाबत : आर्टपेपरवरील रंगीत छपाई, ३डी मुखपृष्ठ, डीव्हीडी, पुस्तक व्यवस्थित राहावे म्हणून बॉक्स यामुळे पुस्तकाचा किमान खर्च प्रतीमागे ७०० रु. झाला आहे. ( यात लेखकाचे मानधन, चित्रकाराचे मानधन धरलेले नाही.संपादन, इंग्लीश अनुवाद, मुद्रितशोधन, पुस्तकाची मांडणी, मुखपृष्ठ, डीव्हीडीसाठीचा स्टोरीबोर्ड, वाइल्ड लाईफ फोटोग्राफी व व्हीडीओ इत्यादीचा खर्चही धरलेला नाही. ही बहुतेक कामे मी स्वतः वा माझ्या मित्रमैत्रिणींनी केलेली आहेत.) मूळ किंमत ठरवताना वितरकांचे कमिशन व वाचकांना द्यावी लागणारी सवलत गृहीत धरावी लागते.काही प्रती खराब निघतात, कुरीयरवाले हरवतात त्याही गृहीत धराव्या लागतात. हे सर्व पाहता ही किंमत कमीच आहे असे म्हणावे लागेल. कारण दोन आवृत्त्या संपतील ( २२०० प्रती ) तेव्हा ब्रेकइव्हन होईल. या प्रकल्पासाठी अनेकांनी केवळ खर्च घेऊन काम केले. अनेकांनी मानधन घेतले नाही. सारस्वत बँकेने त्यासाठी मला बौद्धिक मालमत्ता गहाण ठेवून ( कारण गहाण ठेवायला माझ्याकडे 'कल्पने'खेरीज काहीच नव्हते.
. ) शून्य व्याजदराने २० लाख र. कर्ज दिले. ( जे पुढील चार वर्षांत मला फेडायचे आहे.) व दोन मित्रांनी एकूण ५ लाख कर्ज दिले. ( ते जमेल तेव्हा फेडायचे आहे.) पुस्तकविक्री आणि पेंटींग्जची विक्री यातून हे करायचे आहे.
या प्रकल्पामागचे
या प्रकल्पामागचे कष्ट आणि आव्हानं याचा अंदाज येतोय. पण यामुळेच हा प्रकल्प आजच्या घडीला अद्वितीय आहे.
+१ असेच म्हणतो
हा प्रकल्प आजच्या घडीला अद्वितीय आहे.
आणि कोणत्याही नव्या संकल्पनेचा खर्च हा जास्तच असतो.
पटले मनापासून पटले
कविताजी सविस्तर खुलाशाबद्दल मनापासून धन्यवाद.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
लोकप्रभा
लोकप्रभा या साप्ताहिकाने 'कुहू'वर कव्हरस्टोरी केली होती.खेरीज त्यात माझी वेगळी मुलाखतही छापली होती. त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे :http://www.loksatta.com/lokprabha/20101217/lpfront.htm






मराठी साहित्यविश्वात एक वेगळा प्रयोग
कुहू बद्दल मी खूप ऐकले आहे. आणि मराठी साहित्यविश्वात हा एक आगळा वेगळा प्रयोगही आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे तर किंमत जास्त वाटत आहे. तरी पण त्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे जसे तंत्रज्ञान, साहित्य, ग्राफिक्स, इत्यादी ..इत्यादी.. या सर्व तांत्रिक बाबींमुळेच बहुतेक किंमत वाढली असावी.
http://kuhoo.in/ या कुहू च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहिले की
कुहू ची अॅडल्ट आणि चिल्ड्रेन अशी २ आवृत्त्या आहेत.
याबद्दल थोडी माहिती मिळाली तर जाणून घ्यायला आवडेल
अॅडल्ट आणि चिल्ड्रेन या दोन आवृत्त्यांतील फरक काय आहे? कथानकात बदल आहे की पूर्ण कथाच वेगळी आहे ?
की फक्त आवाजात वयोगटाप्रमाणे बदल केले आहेत?
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/