• '

ओ हेन्री आणि इतर लघुकथा लेखक

लेखक: 

नमस्कार,

आत्ताच मिसळपाववर जयंत कुलकर्णींनी भाषांतरीत केलेली ओ हेन्री यांची भेट ही कथा वाचण्यात आली. मुळ कथा तर उत्तम आहेच आणि अनुवादही अत्यंत सकस असल्याने, कथा वाचण्यात मजा आली.

याआधीही ओ हेन्रींच्या द गिफ्ट ऑफ मॅगी वैगेरे मुळ कथा वाचण्याचा योग आला होता. जेवढ्या वाचल्या तेवढ्या आवडल्या होत्या. द गिफ्ट ऑफ मॅगी बहुदा सगळ्यात प्रसिद्ध कथा असावी. यावरुन मनात आलेले प्रश्न इथे मांडतो,

लघुकथा सोडुन ओ हेन्री यांनी इतर काही साहित्यप्रकार हाताळले आहेत का ? असल्यास, यांतुन तुम्हाला आवडलेले साहित्य कोणते ?

ओ हेन्री सारखे अजुन कोण लेखक लघुकथांसाठी प्रसिद्ध आहेत ? (पाश्चात्य आणि भारतीय)

शोध घ्यायला हवा...

आनंदयात्री,

गोष्ट आवडली. मस्त आहे. थोडासा अंदाज आला, पण शेवटाने मात्र चकवले.
ओ-हेन्रीच्या गोष्टींचा शोध घ्यायला हवा खरा!!!!

ओ हेन्री पुस्तकरूपात वाचले

ओ हेन्री पुस्तकरूपात वाचले नाही अजून. सकाळ, लोकसत्ता मध्ये त्यांच्या मूळ तसेच रूपांतरीत कथा मात्र वाचल्या गेल्या होत्या आणि आवडल्याही होत्या.
'गिफ्ट ऑफ मॅगी' कुठे मिळू शकेल काय?

बाकी आनंदयात्रीला परत पुस्तकविश्ववर पाहून आनंद झाला आहे.

गटेनबर्ग

धन्यवाद वल्ली.

गिफ्ट ऑफ मॅगी गटेनबर्गवर आहे. हा घ्या दुवा.

धन्स रे मित्रा. पुस्तक उतरवून

धन्स रे मित्रा. पुस्तक उतरवून घेतले आहे.

‘पाखराची वाट’....

‘पाखराची वाट’(मौज वितरण २००३) हे विजय पाडळकरांनी लिहिलेलं लघुकथांचं पुस्तक चांगलं आहे. जरुर वाचावं असं....

टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट / नो कम्बॅक्स

एकदा अवचितपणे जेफ्री आर्चरचं 'टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट' हातात पडलं .. आणि या लेखकाचा लघुकथांवरही कादंबरीइतकाच ठसा आहे.. जरा वेगळ्या ढंगाच्या कथा यात आहेत.

दुसरे लघुकथांचे अप्रतिम पुस्तक आठवते ते म्हणजे 'नो कम्बॅक्स'. फ्रेडरीक फॉरसेथ यांचे हे पुस्तक. त्यातील पहिली नो कमबॅक्स नावाची कथा तर निव्वळ अफलातून आहे!! वाचाच!

भारतीय लेखकांत अनेक प्रसिद्ध लेखक आहेत.. मात्र त्यापैकी मी फारच कमी वाचले आहे. आणि जे वाचले त्यात आवर्जुन नाव घेण्यासारखे पुस्तक पटकन आठवत नाही.

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

`कवडसा' हा उर्मिला सिरूर

`कवडसा' हा उर्मिला सिरूर ह्यांचा दुर्मिळ कथासंग्रह वाचला. त्याही लघुकथाच आहेत.

डेमन रन्यन!

(प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी गेला होता - पुन्हा देतो आहे.)

डेमन रन्यनच्या ब्रॉडवे कथा वाचून पहा.

रहस्यकथांच्या प्रेमींसाठी -
अर्नेस्ट ब्रामाह च्या मॅक्स कॅरडॉस या अंध डिटेक्टिव्ह कथा
मेल्व्हिल डॅविसन पोस्ट च्या अंकल अ‍ॅब्नर कथा
चेस्टर्टनच्या फादर ब्राउन कथा म्हणजे तर इंग्रजी गद्याची मेजवानीच.

फ्रेडरिक फॉरसाइथ च्या नो कमबॅक्स मधील "प्रिव्हिलेज" ही कथा एकदम खास.

आणि "फ्लावर्स फॉर अ‍ॅल्जेर्नन" (डॅनियल कीझ) ही दीर्घकथा चटका लावणारी आहे - केवळ अविस्मरणीय.

वाचावे तेवढे थोडेच.

- दिगम्भा

ओहोहो

ओहोहो. अनेक धन्यवाद दिगम्भा. यापैकी आंतरजालावर काही आहे ?

ओहोहो

ओहोहो. अनेक धन्यवाद दिगम्भा. यापैकी आंतरजालावर काही आहे ?

रन्यन ...

ऑस्ट्रेलियन गुटेनबर्ग** वर डेमन रन्यन चे काही साहित्य उपलब्ध आहे.

http://gutenberg.net.au/plusfifty-n-z.html

बाकी(तरुण पिढीकडून शिकून घेतलेल्या)टॉरेन्टतंत्राच्या सहाय्याने जालावर सर्व काही मिळतेच अशी माझी समजूत आहे. आता कायदा-बेकायदा या दुविधेत तुम्ही फसणार असाल तर माझ्यासारख्या व्यसनी* माणसाकडे उतर मिळणे कठीण.

फादर ब्राउन जवळजवळ सगळाच गुटेन्बर्गवर (नेहमीच्या) मिळेल.

फ्लावर्स फॉर अ‍ॅल्जेर्नन, मॅक्स कॅरॅडॉस, अंकल अ‍ॅब्नर, इ. उपलब्ध आहे असे वाटते.

फॉर्साइथ टॉरेन्ट शिवाय मिळणार नाही.

[** ऑस्ट्रेलियामध्ये प्रताधिकार कायदा वेगळा होता - आता बदलला - त्यामुळे तिथल्या गुटेनबर्गवर आणखी काही व नंतरची पुस्तके मिळतात.
* अच्छी पी ली खराब पी ली, जैसी पाई शराब पी ली]

- दिगम्भा

रन्यन कथासंग्रहाचा दुवा

हा दुवा पहा - http://gutenberg.net.au/ebooks11/1100651h.html

तुम्हाला सांगतासांगता मीच या पानावर जाऊन "वचनभंग" ही कथा कधी वाचू लागलो ते माझे मलाच समजले नाही. पोट धरधरून हसलो.

शैलीच्या बाबतीत रन्यन वुडहाउसचा लांबचा चुलतभाऊ तरी आहे यात संशय नाही.

कधीकधी शंका येते की रन्यनचे लिखाण वाचून तर भाऊ पाध्येना वासूनाका लिहिण्याची स्फूर्ती झाली नसेल.

- दिगम्भा

लघुकथा म्हणजे नेमके काय?

लघुकथा म्हणजे नेमके काय? दोन-तीन पानात संपणार्‍या कथेलाच लघुकथा म्हणावे काय? याच न्यायाने इसापनीतीच्या कथा पण लघुकथाच म्हणाव्यात काय?

मला वाटते लघुकथा लेखकाच्या

मला वाटते लघुकथा लेखकाच्या त्या वृत्ती वा मनस्थितीतून येते व मग तिची लांबी ही आपोआप कमी होते.
भिंग घेऊन कशाहीकडे बघायचे असे ठरवले तर माणूस काय बघेल व त्याला काय दिसेल किंवा पहायला आवडेल असा विचार केला तर लेखक लघुकथा का लिहितो व ती तशी का निर्माण होते ते समजेल.
एखादा प्रसंग, दैनंदिन जीवनातली एखादी टिपिकल परिस्थिती,छोटा जीव असलेले एखादे कथानक - कथानक कसले गोष्टच म्हटले पाहिजे, नकारात्मक व्याख्या करायची तर अनेक व्यक्ती किवा व्यामिश्र परिस्थिती नसणे;
एकूण कशावर तरी फोकस करून लिहिलेली गोष्ट म्हणजे लघुकथा म्हणता येईल असे वाटते.

पण आपण मराठीत करतो त्यापेक्षाही सखोल वर्गीकरण इंग्रजीत करतात. त्यांच्याकडे शॉर्ट स्टोरी, लॉन्ग स्टोरी, नॉव्हेलेट, नॉव्हेला, नॉव्हेल या सर्व गोष्टींमध्ये फरक करण्यात येतो. अर्थात हा फरक आपल्याला अतिसूक्ष्म वाटू शकेल.

विकीपीडियावरील खालील व्याख्या मला चांगली व मार्मिक वाटते -
a swiftly sketched situation that quickly comes to its point

स्टेफ़ान त्स्वाइग!

आणखी एक लक्षात राहिलेला लेखक म्हणजे स्टेफान त्स्वाइग.
त्याचे कलायडोस्कोप १ व २ हे कथासंग्रह संस्मरणीय आहेत.
हिन्दी सिनेरसिकांना सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे "गुमराह" हा (जुना - चलो इक बार फिरसे अजनबी बन जायें हम दोनों हे साहिरचे गीत ज्यात आहे तो) चित्रपट त्यातील एका कथेवर ("Fear")आधारित आहे.
बुद्धिबळाच्या खेळाच्या पार्श्वभूमीवरची The Royal Game ही कथा तर कायम लक्षात राहील.
त्याच्या कथांत अतिशय बारकाईने मानसशास्त्रीय पैलूंचे चित्रण केलेले दिसते.
--- रेकमेंडेड!

- दिगम्भा

वाचले पाहिजेत

वाचली पाहिजेत विषेशतः ती बुद्धीबळावरची कथा.. जरा वेगळा प्लॉट असला की वाचायला मजा येते आणि लघुकथाकारांचे प्लॉट बर्‍याचदा वेगळे असतात.
ही पुस्तके जालावर चकटफू कुठे वाचायला आहेत का? म्हंजे लेखक खुप जुना आहे का?

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

THE ROYAL GAME चा दुवा

हा घ्या दुवा -

http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/stefan-1.pdf

इथे कलायडोस्कोप - २ आहे व त्यात मी उल्लेख केलेली ती कथा (THE ROYAL GAME) आहे.
या पुस्तकात आणखी एक प्रसिद्ध व मराठीत आधीच अनुवाद झालेली कथा आहे -
LETTER FROM AN UNKNOWN WOMAN.

तसेच कथासंग्रहाचा पहिला भागही उपलब्ध आहे (त्याला चुकून स्टेफान-२ असे नाव दिले आहे). वरील दुव्यात आवश्यक फेरफार करून पहावा.

अरविंद गुप्तांच्या संस्थळावरती चकटफू पुस्तकांचा मोठ्ठा खजिना आहे.
आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यात जुने नवे असा काही जातिभेद केलेला नाहीये. हौशी व रिकामटेकड्या वाचकांनी अवश्य लाभ घ्यावा.

- दिगम्भा

अनेक आभार

तुम्ही तर खजिनाच दिलात!
अनेक आभार.. चला हाफिसात कॉफीच्या वेळी चाळायला नवे पुस्तक मिळाले Smile

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

दिगम्भांना धन्यवाद

दिगम्भांना अनेक धन्यवाद. तुमच्या वरच्या काही प्रतिसादातुन तुम्ही खजिनाच उघडा करुन दिलाय.
वर उल्लेखलेल्या लघुकथा लेखकांपैकी पहिला कोणता वाचू ?

आवड ....

काय सांगू?
या प्रश्नाचे उत्तर सर्वस्वी आपापल्या आवडीवर आहे.

एवढेच म्हणतो की इंग्रजीचे विश्व फार फार मोठे आहे. तुमची आवड कुठलीही असो व ती आयुष्यात कितीही बदलो प्रत्येक प्रकारात न संपणारे खजिने पडलेले आहेत.

पु.वि. वर येऊन आपण मराठीत काहीच वाचले नाही अशी जी भावना येते तीच भावना पन्नास-एक वर्षे अक्षरशः निरुद्योगी माणसाप्रमाणे वाचन करणार्‍या मला इंग्रजीबद्दल कायम असते.
माझे धोरण, जे मिळेल, जे समोर येईल ते वाचणे इथपर्यंतच पोचते.
असा वेश्यावृत्ती वाचक कोणाला काय सल्ला देणार?

पण अमुक एक आवड आहे असे सांगितलेत तर सांगण्यासारखे खूप असेल ...

बरेच आहेत.

पु.शि. रेग्यांचा 'मनवा' हा लघुकथासंग्रह अफाट आहे. जरुर वाचणे.
मराठीत बरेच लघुकथाकार आणि त्यांची बरीच पुस्तकं आहेत. अरविंद गोखले, जयंत पवार, सतीश तांबे ही नावं आणि 'फिनीक्सच्या राखेतून उठला मोर', 'माझी लाडकी पुतनामावशी' ही पुस्तकं वानगीदाखल.
नुकतंच प्रज्ञा दया पवार यांचे 'अफवा खरी ठरावी म्हणून' वाचले. त्याही लघुकथाच आहेत.

वाचायच्या यादीत अ‍ॅडवले आहे

पु.शि. रेग्यांचा 'मनवा' हा लघुकथासंग्रह अफाट आहे. जरुर वाचणे.

नक्की वाचेन मणि Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह ....

यांचे विज्ञानसाहित्य माझे खास आवडते आहे. रॉबर्ट हेनलेन आणि ऑर्थर सी. क्लार्क यांच्या समवेत त्यांचें ‘मास्टर ऑफ सायन्स फिक्शन जेनर’ असा गौरव केला जातो. फाउंडेशन मालिका तर अजस्त्र खगोलीय अवकाशातील अकाशगंगांच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेली अप्रतिम कादंबरीमालिका आहे. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' कार जे आर आर टोल्किन्सच्या स्पर्धेत अ‍ॅसिमॉव्हला काही पारितोषिके मिळाली. रोबो ही आणखी एक मालिका. पण मला ती अजून वाचायची आहे.

जाता जाता एक गंमत सांगतो. छोटा आयझॅक आठ वर्षाचा असतांना त्याचे वडील रशियातून पळाले आणि सूटकेसमध्ये लपवून आयझॅअकला अमेरिकेत आणले. लेखन जरी विज्ञाननिष्ठ आणि निरीश्वरवादी असले तरी विचारातील सामाजिक न्याय सतत त्यांच्या कथानकातल्या पात्रांच्या विचारातून सतत दिसतो. दुसर्‍या महायुद्धांत कांहीं महिने अमेरिकन नौदलाच्या सुप्रसिद्ध फिलाडेल्फिया प्रकल्पावर कामही केले. नाईटफॉल ही विज्ञानकथा एकविसाव्या वर्षी लिहून लेखनाला सुरुवात करून अ‍ॅसिमॉव्ह यांनी निबंधलेखन, विज्ञानकथा असे विपुल लेखन केले. आणखी एक गंमत. त्यांचे सगळे लेखन एकटाकी आहे. बहुतेक सर्व लेखन वाचनीय आहे. मला ‘द न्यूक्लिअर मॉन्स्टर’ आणि ‘द सन शाईन्स ब्राईट’ हे त्यांचे निबंधसंग्रह फार आवडले.

सुधीर कांदळकर