• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७५

वल्ली
बुधवार, 23 February, 2011 - 18:29
 

मुखपृष्ठ

 

हिरकमहोत्सवी वेचा देत आहे.Smile

ताईच्या बोलण्याच्या ओघात पुन्हा एकदा विजेचा लोळ कोसळावा तसं झालं. ताई बोलून गेली. "विश्रामसारखा मुलगा विजेसारखा असतो. आकाशातून कोसळतो. अचानक जमिनीच्या कुशीत विलीन होतो. त्याला जाळायचं असतं. ते जाळलंच जात नाही. आपल्यासारख्यांना हे मरण निरर्थक वाटतं; एका अर्थी ते तसं असतंही. नसतंही ! लक्ष्य हुकलं तरी ते क्षणकाल. उजळून टाकणारा असला तरी त्याचा संधिप्रक्राश दीर्घकाल टिकतो. त्या संधीप्रकाशात संताजी वेगळ्या वाटेने जाणार, असं मला काही दिवस वाटत होतं."
संताजी खडबडून जागा झाला. तो जागेवरून ओरडला. "ताई, आम्हाला फक्त विश्रामच्या कथा सांगा. त्यांच्या जोड्याशी उभं राहण्याची इथे कोणाची लायकी नाही."

संकेत १: सध्या इतकच सांगतो, ही एक अत्यंत गाजलेली कादंबरी आहे.
संकेत २: लेखक मराठीतील एका सर्वोत्तम कादंबरीकार, सर्वार्थाने पात्र असूनही कधीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होउ शकला नाही.
संकेत ३: या कादंबरीच्या लेखकाची पहिली कादंबरी हिंदू मुस्लिम दंग्यांवर व त्यांच्याच अनोख्या मैत्रीवर बेतलेली आहे.
संकेत ४: या वेच्यातील कादंबरी कदाचित मराठीतील सर्वात मोठी कादंबरी असावी.

सागरचे अभिनंदन. हिरकमहोत्सवी वेच्याचा पहिला विजेता होण्याचा मान त्याने पटकवलाय. Smile सागरपाठोपाठ इंद्रराज पवारही वेच्याचे दुसरे विजेते झालेले आहेत. त्यांचेही अभिनंदन

उत्तर जाहीर करत आहे.

कादंबरी: तुंबाडचे खोत (भाग २)
लेखक: श्री.ना.पेंडसे (पहिली कादंबरी एल्गारः साखरपेंडीचा रघू बेंद्रे व कादर यांच्या मैत्रीची कहाणी)
वेच्यातील पात्र परिचयः
ताई: तुंबाडकर खोतांची (जुळ्यांची) बहिण, गणेशशास्त्र्यांची मुलगी
विश्रामः जनापाचा मुलगा. हा क्रांतिकारक असून देशासाठी बलिदान देतो.
संताजी: चिमापाची मुलगी तारा हिचा होणारा भंडारी पती.

हिरकमहोत्सवी वेच्याबद्दल अभिनंदन

Smile Smile Smile

हिरकमहोत्सवी वेच्याबद्दल अभिनंदन

Smile Smile Smile

बाकी वेचा ओळखायचा प्रयत्न थोड्या वेळाने करतो. थोडा व्यस्त आहे हापिसात प्रिय मित्रा Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

वोक्के

हा वेचा तू ओळखशीलच बरोबर.Smile

गाजलेली ?

कादंबरी अत्यंत गाजलेली आहे असे तुम्ही म्हणता....पण जादाचा संकेत दिला तर त्या गाजत्या बाजारात शिरता येईल.

इन्द्रा

ठिकाय

संकेत देत आहे

हुश्श ओळखले एकदाचे

काल ऑफिसात प्रचंड कामात बुडालो होतो त्यामुळे डोक्यावर काहीच ताण दिला नव्हता.
आत्ता ऑफिसात आल्याआल्या बघितले पुन्हा वाचून तर ट्युब लगेच पेटली.
आधी त्या लेखकाचे दुसरे पुस्तक असावे असे वाटले होते मला कारण मी ते वाचलेले नव्हते.
पण काहीतरी चुकते आहे हे आठवले व परत स्मृतींमध्ये खोलवर बुडी मारल्यावर ह्या रत्नाचे नाव आठवले Smile

वल्लीने माझा विरोप वाचायच्या आत पुन्हा योग्य उत्तर विरोपवले मग

हिरकमहोत्सवी वेच्याचे उत्तर ओळखू शकलो याचाच आनंद Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अभिनंदन...!

श्री.सागर यानी हीरक महोत्सवी वेचा पहिल्याच प्रयत्नात ओळखल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे, आणि त्यानी हेही सिद्ध केले की ते किती पक्के वाचक आहेत.

इन्द्रा

अहो मी कसला पक्का वाचक?

इंद्रराज,

तुमच्याइतके वाचन माझे तर नाहीच नाही.
अभिनंदन या पुस्तकाचे आणि त्याच्या लेखकाचे करा.
हे पुस्तक न वाचलेला विरळाच सापडेल Smile

वेचा मात्र वल्लीने अगदी सुरेख निवडला आहे. एकदम चकवा देणारा आहे.
उत्तर कळाले की सर्वांचेच डोळे पांढरे होतील , हे उत्तर होते होय? असे म्हणाल Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

खरे आहे

इतकी ही कादंबरी परिचीत आहे.

अर्रंर्रं.........

वल्ली,
ह्या वेच्यावरून ले़खक श्री. ना. पेंडसे असणाअर असा थोडासा अंदाज आला होता. पण तो तुम्हांला कळवण्याचे राहून गेले.
मला पुवि वरील पुस्तककोडे हा प्रकार आवडला..

अरेरे

उशिर झाला तुम्हाला. Sad
पण हरकत नाही. आता पुढचा वेचा तुम्ही द्या.Smile

साहित्य संमेलन अध्यक्षपद....!

"हीरक" वेच्याचा मान कादंबरीक्षेत्रातील सर्वार्थाने एका "हिर्‍या"स दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन वल्ली !

सहज....एक थोडीशी दुरुस्ती करू इच्छितो ~ वेचा संकेतात तुम्ही "सर्वार्थाने पात्र असूनही कधीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होउ शकला नाही..." असे एक विधान केले आहे. इथे 'होऊ शकला नाही...." या भागाला "...म्हणजे ते झाले नाहीत वा निवडून आले नाहीत..." असा एक विचित्र दर्प येतो. वस्तुस्थिती अशी होती की, श्री.श्री.ना.पेंडसे आणि श्री.विंदा करंदीकर याना साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी "निवडणूक" ही बाब साफ नामंजूर होती. त्यामुळे दोघानीही त्या वाटेचा रस्ता कधीच घ्यायचा नाही असे ठरविले होते. 'सर्वार्थाने पात्र होते..." हे खरंच पण, ती पात्रता मतदारांनी मत देऊन सिद्ध व्हावी असे त्याना वाटत नव्हते. कुठल्याही संमेलनात त्यानी भागही घेतला नव्हता.

इन्द्रा

हो

सहमत आहे. निवडणुकीच्या राजकारणाला कंटाळूनच हे दोघे थोर साहित्यिक निवडणुकीला कधीही उभे राहिले नाहीत. पण साहित्य महामंडळाने मात्र यांची स्वतःहून सन्मानपूर्वक निवड न करून एक चांगला पायंडा पाडण्याची संधी मात्र दवडली.