• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३०

सागर
बुधवार, 8 September, 2010 - 18:31
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

पुस्तक वाचले असेल तर संकेत देण्याची काहीच गरज पडणार नाही.
ठीक आहे संकेत देत आहे.
१. ही एक कादंबरी आहे (कथासंग्रह नाही)
२. सदर लेखकाची ही कादंबरी एका मोठ्या नावाजलेल्या साहित्यिकाने गौरवलेली आहे.
३. साहित्यिकाचे नाव देतो : वि.वा. शिरवाडकर (म्हणजे कुसुमाग्रज) यांनी गौरवलेली कादंबरी आहे ही
४. सहज लक्षात यावे यासाठी हा संकेत देतो. अत्भुत, गूढ, रहस्य या रसांचे रसायन असणारी ही कादंबरी आहे
५. अत्भुत गूढ अशा कादंबर्‍या लिहिणारे लेखक आहेतच किती मराठीत? त्यातही वेचा सोपा आहे म्हणजे कादंबरी नावाजलेली असणारच. त्यातही त्या लेखकाच्या सर्वात गाजलेल्या मोजक्या कादंबर्‍यांतील एक ती आहे म्हणजे प्रश्नच मिटला. रेनाल्ड्स् च्या कादंबर्‍यांना भारतीय रुपात कोण उतरवते बरे???? ओळखा आता तरी Smile
६. अत्भुतरम्य-गूढ-रहस्य कादंबर्‍यांचे अध्वर्यू म्हणून ओळखले जाणारे लेखक गो.ना. दातार

(दिगम्भा यांनी आधी लेखकाचे नाव ओळखले आणि मग पुस्तकाचे नाव. लेखकाचे नाव दिल्यावर वल्ली यांनी ३ पर्याय दिले त्यात ह्या पुस्तकाचे नाव होते. त्यामुळे दिगम्भा आणि वल्ली यांनी हे पुस्तक ओळखले आहे असे जाहीर करतो व पुस्तकाचे नाव देतो. Smile


वेचा:
तिचे गाणे संपते न संतोच, तोच एक चमत्कारिक पांढरी आकृती तिच्या नजरेस पडल्यामुळे ती दचकली आणि एकदम उठून उभी राहिली. तिने पूर्वी खिडकीतून जी आकृती गुप्त होताना पाहिली होती, तिची तिला आठवण झाली. जणू काय एखाद्या प्रेताप्रमाणे त्या आकृतीचे स्वरुप दिसत होते. ती आकृती धीमेपणाने आपल्याकडेच येत आहे असे पाहून अनसूयेला भीतीने दरदरुन घाम सुटला! ती पिशाच्च्यासारखी आकृती अगदी आपणापाशीच येत आहे असे पाहताच, भीतीमुळे अनसूयेचा धीर सुटला आणि तिला घेरी येऊन ती धाडकन् खाली पडली!
* * *
------------
पुढचे प्रकरण
------------
अनसूया शुद्धीवर आली तेव्हा ती एका लहानशा खोलीत एक मंचकावर निजलेली होती. तिने डोळे उघडून एकवार चोहोबाजूस दृष्टी फिरविली. पण आपण कोठे आहोत हे तिच्या ध्यानात आले नाही. कारण ती शुद्धीवर येते न येते तोच तिला आपल्या पूर्वीच्या स्थितीचे स्मरण झाले आणि तिला पुनः भीती वाटू लागली. मूर्ति मागून एकाएकी धिमेपणाने आपणापाशी आलेली शुभ्र स्त्री, हीच तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागली. तिने एकदा आपले डोळे मिटले आणि ती थोडा वेळ स्तब्ध राहिली.

अवघड आहे

बहुतेक संकेतांची गरज भासेल असे वाटतेय.

उद्या पहिला संकेत देईन.

पुस्तक वाचले असेल तर संकेत देण्याची काहीच गरज पडणार नाही. Laughing out loud
असो... आजचा दिवस वाट पाहीन... उद्या पहिला संकेत देईन.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पुस्तक वाचलेले नाही..

पुस्तक वाचलेले नाही.. संकेतांची वाट बघतोय

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

तरीही अवघडच

संकेतांवरूनही काहीच कळत नाहीये.Sad बर्‍याचशा कादंबर्‍या मोठ्या साहित्यिकांनी गौरवलेल्या आहेत. त्यामुळे कुठलीही एक अशी नजरेसमोर येत नाही. अजून एखादा संकेत मिळाला तर त्या दिशेने प्रयत्न करता येइल असे वाटते. Wink

आता पुढचे संकेत उद्या

वल्ली,
ज्या साहित्यिकाने ही कादंबरी गौरवलेली आहे त्यांचे नाव दिले आहे
बघा प्रयत्न करुन Smile

आता पुढचे संकेत उद्या

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

लेखक

बहुधा जी. ए. कुलकर्णी असावेत. पण कादंबरी कोणती हा प्रश्न आहेच.

नाही जी ए नाहियेत

वल्ली गूढ अत्भुतरम्य कादंबर्‍यांचा बाज वेगळाच असतो. गुंतागुंतीचे आणि उत्कंठा वाढवणारे लेखन खूप कठीणच असते तसे. नाथमाधवांसारख्या गुणी लेखकालाही अशी एकच कादंबरी लिहीता आली यावरुनच काय ते समजा Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

माझा आता पास

ओळखू शकलेलो नाही. ना लेखक ना कादंबरी -माझा पास Sad

पण ....

मी त्यांची तितकी पुस्तके वाचलेली नाहीत, शिवाय स्मृतीही धड नाही.
नुसती पुस्तकांची यादी एक-के-बाद-एक ट्राय करण्यात अर्थ नाही.

तेव्हा प्रयत्न इथेच थांबले.
- दिगम्भा

हम्म

अगदी स्पष्ट संकेत मिळावा म्हणून संकेत देत आही नि वेचाही अपडेट करत आहे त्यावरुन तरी ओळखता येईलच Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

पास

पास. गो. ना. दातारांचे काहीही वाचलेले नाही. कारण मुळातच अद्भूतरम्य वाचावेच असे वाटत नाही. (किती अरसीक आहे हा, असं कोण म्हणालं ते?)

वाचनच कमी आमचं तर आम्हाला

वाचनच कमी आमचं तर आम्हाला कसले हे अध्वर्यू माहिती असायला?
एक बी बुक नाय वाचलं यांचं आपण.
येथील चर्चेवरुन आणि पुस्तकातील भागामुळे वाचावेसे वाटू लागले हाय

मी श्रेय घेउ इच्छित नाही

सागर यांनी वेचा असलेले पुस्तक ओळखल्याचे श्रेय मला दिले आहे पण मी ते घेउ इच्छित नाही. कारण एकतर मी लेखकही ओळखू शकलो नव्हतो त्यात सागर यांच्याकडून ६ वा संकेत लेखकाच्या नावाचा मिळाला त्याआधारे सागर यांच्या यादीत उपरोक्त लेखकाची (गो. ना. दातार) ३ पुस्तके होती. उघड आहे वेचा यातीलच एकामधला असणार त्या तीनही पुस्तकांची नावे मी सागर यांना दिली. अर्थातच मी वेचा ओळखू शकलो नाहीच. श्रेय असलेच तर त्या ३ पुस्तकांच्या नावाचे उत्खनन करणार्‍या सागर यांच्या धाग्याला. Smile