'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३
मुखपृष्ठ
|
हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे! हे दवबिंदू कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणालातरी माहित आहे काय? माणसाचंही तसंच आहे. तो कुठून येतो आणि कुठं जातो हे कुणालाही सांगता येत नाही. हे दवबिंदू कुणाचा तरी प्रकाश घेऊन चमकतात, इतके की वाटावं जणू काही प्रत्येक दवबिंदू हा एक छोटा आणि स्वतंत्र सूर्यच आहे! हे चमचम करणारे दवबिंदू वायूच्या झुळकीसरशी मंदमंद झोके घेतात, आपल्याजवळ असलेली प्रकाशकिरणं आपल्यापासून बाहेर फेकतात. त्यांच्याकडं पाहणार्यांना आल्हाद देतात, परंतु जरा का वारा जोरात आला की हे प्रसन्न दवबिंदू खालच्या मातीत असंख्य जलबिंदू होऊन विरून जातात. का कू न करता! न आक्रोश करता! माणसाचंही अगदी असंच आहे. एकाच परमात्म्याची असंख्य रुपं घेऊन मानव म्हणून वावरणारे हे जीव - अरे यातले काही जीव तर एवढे दिव्य असतात की साक्षात परमात्माच वाटावेत! हे सारे आपलं जीवन जगतात. पुरुषार्थाच्या किरणांनी जग उजळतात. सौख्याच्या क्षणी आनंदानं डोलतात, आणि मृत्यूची चाहूल आली की निमूटपणं त्याच्या स्वाधीन होतात. पिढ्यान् पिढ्या हे चाललंय! आदल्या दिवशी विरून गेले तरी दुसर्या दिवशी सकाळी तृणपर्णांवर जसे दवबिंदू पुन्हा तयार! तसेच पिढ्यान् पिढ्या मृत्यू पावलेले मानव नवपिढीच्या रूपाने पुन्हा तयारच!! काही काही मानव कधीच सौख्याच्या हिंदोळ्यावर झुललेले नसतात! त्यांनी कधीच कोणते पराक्रम केलेले नसतात! जिवंतपणीच ते मृत झालेले असतात! हे सुद्धा दवबिंदूंसारखेच असतात! फक्त हे दवबिंदू तृणपात्याच्या उलट्या बाजूला चिकटलेले असतात! त्यांच्यापर्यंत सूर्याचे दिव्य किरण पोहोचतच नाहीत! त्यांना प्रकाश मिळालेला नसतो. अज्ञानाच्या महान अंधकारात गाडलेले असतात ते दवबिंदू! आणि जगात अज्ञानाइतका मृत्यूही क्रूर नसतो!
अभिनंदन!
क्या बात है! अभिनंदन.. उत्तर बरोबर आहे. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय!
अरे हो की!
अरे हो की! 
छ्या! हे ही आठवलं नाहि याची माझी मला लाज वाटते 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"






छे छे! कुठून मिळवता हो हे
छे छे! कुठून मिळवता हो हे असले वेचे?
हे वाचून अगदी इतके गहिवरून आले की त्या गहिवरामुळे माझ्या नाकातून-डोळ्यांतून एक दवबिंदू गळ्तो की काय अशी शंका उत्पन्न झाली
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"