'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २९
मुखपृष्ठ
|
|
--------------------------------------------------------------------------
वेचा पुरेसा बोलका असल्याने संकेत द्यायची गरज नाही असे वाटते.
सागर यांचे अभिनंदन वेचा लगोलग ओळखल्याबद्दल. पाठोपाठ दिगम्भांचेही
--------------------------------------------------------------------------
वेचा:
(मग)खासा भाऊसाहेब व बळवंतराव गणपत व जनकोजी शिंदे व मल्हारराव होळकर व दमाजी गायकवाड व यशवंतराव पवार व विठ्ठ्ल शिवदेव व समशेरबहादर व इब्रामखान गाडदी व आणखी सरदार सर्वत्र मिळून मनसबां केला की "कुतुबशहा व सैमतखान कत्तलबाज कुंजपुरियात आहेत. यांजवर जाउन त्यांचे पारिपत्य करावे, व कुंजपुरियाचा किल्ला खाणोन टाकावा." ऐशी मसलत करून मुहुर्त पाहून कूच दरकूच मजल दरमजल करत कुंजपुरियानजीक लागले. त्यांचीही बातमी होती. सावध होते. तयार होउन शहर सोडून फौजेसुद्धा बाहेर आले. त्यांची यांची गाठ पडली. त्यांजकडील यांजकडील तोफांचा व बाणांचा ऐसा मार जाला की गर्दी होउं लागली. मनुष्यास मनुष्य दिसेनासें झालें. मोठी खणाखणीं एक प्रहरपावेतों झाली. ते समयी घोडीयांचे तोंड आंत शिरकेनासे जालें. तें समयी भाऊसाहेब यांणी बळवंतराव गणपत यांसि आज्ञा केली कीं "तीन टोळ्या करून हल्ला करावा." त्याजवरून तीन टोळ्या केल्या. एका बाजूस समशेरबहादर व दमाजी गायकवाडव नारोशंकर व एकीकडे यशवंत पवार व इब्रामखान गाडदी, निजाम अलीपाशील, यांणी एकीकडून चालून घेतले. मोठी दोन घटिकांपर्यंत मारामार जाली. कुतुबशाहाकडील चांगले मनुष्य तेव्हढे शिकस्त जाले, मग गनिमांनी चोहोंकडून 'हर हर! हर!' म्हणून घोडे घातले एकच धौशा केला.ते समयी मोठी धुंदी जाली. बाहेचचे सामान माणूस गावांत जाउ पावलें नाही. चोहोंकडून तोंडे लागून लांडगेतोड जाली. मग चोहोंकडून हल्ला जाउ लागला. ते दिवशीं मराठियांनीं काहि चित्तात करूणा आंअली नाहीं. जितके हाताखालीं सापडले तितके जिवे मारावयास आळस केला नाही. ते समयीं पाच सात हजार मनुष्य त्यांजकडील ठार मारिले. तैसेच घायाळ जाले. मुददे-घायाळाचे ढीग एकत्र जाहाले. शहरपन्हाखाली होता तो हल्यासरसे चढून गांवांत जाउन पोहोचलें. गांवांतील चिंधी-चोळी केली. कुंजपुरियाची वस्ती अपूट होती, लूटही मुबलक सापडली. नजीबखान रोहीला याचा व्याही व जावई असे कुंजपुरियात होते. ते हस्तगत जाले. धरून आणिले. इकडे कुतुबशाहा गायकवाड यांच्या फौजेत जिता सापडला. तैसाच सैमतखान कत्तलबाजही सापडला. भाउसाहेब व जनकोजी शिंदे व मल्हारराव होळ्कर एक जागां उभे होते. लुटीची गर्दी जाहली. कोणी घोडे, कोणी उंट, कोणी हत्ती, कोणी बैल असे ज्याचे दैवी होते तेंसे सापडले. दत्ताजी पडले तें समयी जव्हेरगज हत्ती कुतुबशाहा याजकडे सापडला होता तो कुंजपुरियांतच होता. तों अनायांसे करून जनकोजी शिंदे यांजकडे सापडला. तें दिवशीचा शिंदे यांचा आनंद कोठवर वर्णावा ? असो.
पुस्तक आधीच ओळखले गेल्याने
पुस्तक आधीच ओळखले गेल्याने नाद सोडतो 
खरं सांगायचं तर ऐतिहासिक पुस्तके मी गोष्टींसारखी वाचतो. मात्र त्यातील वाक्ये लक्षात रहात नाहीत (का कोण जाणे). तेव्हा त्यातले उतारे नंतर कशातले आहे हे ओळखणं माझ्यासारख्याला जवळजवळ अशक्य वाटते 
-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"
बखरीबद्दल अधिक काही
राजे-सरदारांच्या पदरी असलेल्या इतिहासकारांनी केलेले ग्रंथलेखन म्हणजेच बखर.
उदा. सभासदाची बखर- ही बखर कृष्णाजी अनंत सभासद याने लिहीली. हा राजाराम महाराजांच्या पदरी होता. अर्थात प्रत्यक्ष शिवाजी राजांच्या वेळी नसल्याने याची बखर थोडी अतिशयोक्त मानली जाते व त्यात संभाजी महाराजांविषयी अफवा पसरवण्यात या बखरीचा हात मानला जातो. कारण राजाराम महाराजांची आइ सोयराबाई व संभाजीमहाराज यांच्यातील गृहकलह.
पानिपताची बखर प्रत्यक्ष युद्धभूमीवरील इतिहासकाराने लिहिलेली असल्याने बर्यापैकी विश्वसनीय मानली जाते. पण भाषेतील रसाळपणा व वर्णनात जिवंतपणा आणण्याच्या दृष्टीकोनातून थोडिशी अतिशयोक्त झाली व पळून आलेल्या सरदारांच्या प्रभावामुळे भाउसाहेबांना बव्हंशी वेडा(युद्धकौशल्य नसलेला याअर्थी), अहंकारी ठरवले गेले. हा अर्थात स्वतंत्र चर्चेचा विषय. 
कुणाला अधिक माहिती असेल तर त्यांनी येथे ती द्यावी.
चु.भू.दे.घे.





गोंधळात टाकणारा वेचा
उत्तर दिले आहे निरोपाने
पानिपत वाटते प्रथमदर्शनी. पण वेच्यातील भाषा आणि पानिपतकाराची भाषा मेळ नाही खात
गोंधळात टाकणारा वेचा आहे खरा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/