• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २८

सागर
सोमवार, 6 September, 2010 - 12:48
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

गरज पडली तर संकेत देईन.

संकेत न देताही वल्ली आणि दिगम्भा यांनी हे पुस्तक ओळखले आहे. दिगम्भा आणि वल्ली यांचे अभिनंदन Smile

ऋषिकेश नर्मदे हर नंतर अदृश्य झाला Smile, आदितीने पास केले होते तर श्रावण मोडक, मस्त कलंदर, निखिल देशपांडे यांनी प्रयत्न केले होते.
मस्त कलंदर भ्रमणगाथेजवळ पोहोचल्या होत्या पण त्यांना स्मरणगाथाचे विस्मरण झाले Wink असो.

पुस्तकाचे नाव : स्मरणगाथा
लेखक : गो.नी.दांडेकर
पान क्रमांक: ४७८

*****************************************************************************
एकच संकेत देतो. मग ओळखण्यास कोणालाच जड पडू नये.
या पुस्तकाचे उद्घाटन आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाले होते आणि प्रस्तावनाही लाभली आहे Smile

वेचा:
=======================================================================
रात्रभर झोप आली नाही. विचारांची तारांगणं सुरु झाली.
छे छे! हे कठीण होतं. यापेक्षा विष खाणंही सोपं!
पण पहाटेस उठलो, अन् पावटीवर जाऊन उभा राहिलो. तिथं कुणीच नव्हतं. अगदी दृष्टी पोहोंचे तिथवर देखील कुणीच नव्हतं. एकदा लांबवर जाऊन पाहिलं अन् पुन्हा परतलों. हळूहळू दिसू लागलं. एकटे दुकटे परिक्रमावासी उठून चालू लागले. पण ते सगळेच फक्क्ड होते. माई कुणीच नव्हती त्यांच्यांत.
काय कराव? पाऊल निघतही नाही.
दिवस उगवून चांगला हातभर वर आला, तरी मी आपला उभाच! निघायला हवं होतं, पण-निघालो नाही. परतलो.
सगळी देवळं शोधायला सुरुवात केली. एकदां नर्मदेवर जाऊन आलो. पुन्हा माघारा वळलो. गावांत शिरलो. गांवाच्या मध्यावर दोन-तीन देवळं. पैकी एक भलं प्रशस्त. भोवताली ओवर्‍या. त्यांत शिरलो -
मागल्या ओवरीत महाराजजी चिलीम फुंकीत बसला होता, अन् शेजारी ती झोपली होती-पांघरुण घेऊन. एवढ्या उकाड्यांतही!
लक्षण काही बरं दिसलं नाही. तिथंच थबकलो. त्याच्या आगनिखार दॄष्टीकडे पाहतां विचारायचं साहसही झालं नाही. परतलो.
एकदा वाटलं, उशीर होईना का! चालू लागावं.
पण मग राहिलों. संध्याकाळी नर्मदेवर गाठ पडेल या आशेनं.
=======================================================================

विरोप

उत्तर विरोपाने पाठवलं आहे.. लेखक बहुदा सगळेच ओळखतील असे वाटते
-------
अति घाई संकटात नेई Wink
माझं उत्तर साफ चुकलं आहे Tongue

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

नाही हे उत्तर नाहीये

अजून डोके खाजवणे गरजेचे आहे Laughing out loud

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

डोकं

डोकं कामातून गेलं राव. पुस्तक वाचल्याचं आठवतंय, पण कुठलं ते कळत नाही. संग्रहातही नाही त्यामुळं भंजाळलेलं डोकं घेऊन प्रयत्न सोडून दिला.

प्रयत्न कर जमेल

अरे श्रामो,
जमेल तुला प्रयत्न कर.
सोमवारी उत्तर देणार आहे मी. तोपर्यंत अजून डोके खाजव Smile
माई नर्मदा तुला योग्य बुद्धी देवो Wink

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

ओह..

मी स्मरणगाथा वाचलेच नाहीए.. त्यामुळे आणखी भ्रमण केले नाही. Smile

मलाही वाचायचे आहे

मलाही अजून वाचायचे आहे स्मरणगाथा.
सध्या तरी संग्रहात आहे हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी Smile
या २-३ महिन्यांत नक्की वाचणार आहे पण

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

ऑ?!

>मलाही अजून वाचायचे आहे स्मरणगाथा.

मला तर वाटले होते की किमानपक्षी कोडे विचारणार्‍यानेतरी उत्तराचे पुस्तक पूर्ण वाचलेले असले पाहिजे! असे नाहीये का?

१५ वर्षे झाली

अगं वेदश्री,

म्हणजे स्मरणगाथा मी वाचले होते पण त्याला १५ वर्षे झाली आहेत आणी त्यातले काहीच आठवत नाहीये म्हणून एवढ्यात घेतले आहे हे पुस्तक आता वाचेन निवांत Smile

बाकी वेचा देणार्‍याने पुस्तक वाचलेच पाहिजे असा दंडक नसावा असे मला वाटते. तसे झाले तर वेच्यांचा दुष्काळ नाही का पडणार? Tongue

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

माझे वैयक्तिक मत

>बाकी वेचा देणार्‍याने पुस्तक वाचलेच पाहिजे असा दंडक नसावा असे मला वाटते. तसे झाले तर वेच्यांचा दुष्काळ नाही का पडणार?

सर्वांना लागू दंडक वगैरे असे काही नाहीये. माझे वैयक्तिक मत तसे आहे म्हणून नमूद केले इतकेच. न वाचलेल्या पुस्तकातला उत्तम वेचा कसा शोधता येईल जो पुस्तक वाचण्यास समोरच्याला प्रवृत्त तर करेल पण पुस्तक शोधायला डोक्याला खासे खाद्यही देईल? दुष्काळ पडला तरी जीव जाण्याची वाट न पाहता, तहान पुरेपूर भागवणारा पाऊस परवडेल असे वाटते.

सहमत आहे पण....

मी आधी वाचले असल्यामुळे हा वेचा मला शोधता आला असावा.
डोक्याला खाद्य मिळणे महत्वाचे...

मुसळधार पाऊस कधी पडतो या अपेक्षेत Tongue

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

अत्रे

अत्रे म्हटल्यावर गोनिदांपर्यंत पोचलो. पण यादी वगैरे पहात बसलो नाही. पुस्तकाचे नाव डोक्यानेच आठवते का पहात राहिलो. ओळखलं नाही नाव, पण मजा आली.

सुट्ट्यो!

आत्ता 'कोणा एकाची भ्रमणगाथा' वाचतेय त्यामुळे हा वेचा त्यातला नाही इतपत ज्ञान मिळवले होते अजून न वाचलेली पाने चाळून. 'स्मरणगाथा' अजून वाचलेले नाही त्यामुळे मी सुट्ट्यो! स्मरणगाथा 'वाचायचे आहे..' या लिष्टमध्ये आहेच.

भ्रमणगाथा नाहिए हे लक्षात

भ्रमणगाथा नाहिए हे लक्षात आलेच होते. पण परिक्रमा वैगेरे शब्दांनी कन्फुज केले.
स्मरणगाथा वाचलेले नाहीए Smile

निखिल देशपांडे

मजा त्यातच

कन्फुज करणारे वेचे देण्यात जास्त मजा येते ना Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

'स्मरणगाथा' अजून वाचलेले नाही

'स्मरणगाथा' अजून वाचलेले नाही त्यामुळे मी सुट्ट्यो!

+ १
घाईत नर्मदे हर हर गेस केले होते.. मग अजिबात विचारच केला नाही Tongue

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

घाईत नर्मदे हर हर गेस केले

घाईत नर्मदे हर हर गेस केले होते.

ॠ मी पण हीच चुक केली होती

निखिल देशपांडे