• '

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २५

वल्ली
बुधवार, 1 September, 2010 - 14:03
 

मुखपृष्ठ

 
 

पुस्तक

 

पुढील रौप्यमहोत्सवी वेचा तुमच्यासाठी देतांना फारच आनंद होत आहे.

वेचा......

मावळ मुलुखातली ही कथा. अशीच सांजची वेळ. पवन मावळ अंधारत होतं. महिना ज्येष्ठाचा होता. वादळ तुफानी सुटलं होतं. सुसाट वार्‍यानं अवघं पवन मावळ लवलवत होतं. किर्रर्रर्र झाडी बुंध्यापासून झुलत होती. धुरळा अन् पालापाचोळा सैरावैरा उधळत होता. कुठं कुठं गवताच्या पेंढ्या वार्‍यावर सुटून उधळल्या गेल्या होत्या. झाडाच्या खांद्या फांद्या झडझडा वाजत होत्या. वेळूची बेटं कराकरा वाकत होती. वाळलेल्या वेळूच्या छिद्रांवर वादळी फुंकर पडून हडळी किंचाळल्यागत शिळा उठत होत्या. मधूनच एखादा, वठून शुष्क झालेला जुनाट वृक्ष, त्या तुफानी झंजावाताला तोंड देता देता धीर सुटून कडकड कडाड कडकड, अशी अखेरची आर्त हाक देत धडाडकन् कोसळत होता. आभाळात काळ्या कुट्ट ढगांच्या झुंडी, माजलेल्या रानरेड्यासारख्या एकमेकांना हुंदाडीत धावत होत्या. काळ्या ढगांचे प्रचंड लोट उसळत होते. सारं आभाळच घुसळून निघत होतं. महिषासुरांची ही काळी पिसाट सेना आक्रंदत, आक्रोशत जणू महाकालिकेवर तुटून पडली होती. विजांचा भयंकर कडकडाट अखंड चालू होता. तांडव करणार्‍या संतप्त महाकालिकेचं ते रौद्र हास्यच ! मेघांच्या भयानक गडगडाटानं पवन मावळातली प्रत्येक दरीकपारी घुमत होती. अंधार क्षणक्षणाला दाटत होता. विजा लखलखत होत्या. जणू त्या आभाळ रेड्यांवर ओढलेले ते असूडच होते. त्या सार्‍या ध्वनींनी आणि प्रतिध्वनिंनी सह्याद्रीची शिखरंही थरथरत होती.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संकेत देण्याची आवश्यकता वाटत नाही. आवश्यक असल्यास उद्या देइन.

सुंदर वेचा

सुंदर वेचा आहे यात शंका नाही Smile
उत्तर विरोपाने पाठवले आहे. उत्तर बरोबर असेन तर सोप्पे होते असे म्हणता येईल Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नाही

पवनाकाठचा धोंडी नाहीये. कदाचित पवन मावळच्या उल्लेखाने तुमचा तसा (गैर)समज झाला असेल. Smile

वल्ली

मला पुस्तक ओळखता आले नाही. पास. पण वल्ली, गुगल होतंय.

+१ असेच म्हणतो

मग आपला पण पास.

तेच वाटत होते की पवन मावळचा उल्लेख आहे पण वर्णन पवनाकाठचा धोंडी मधले तरीही वाटत नव्हते. वाटले खूप वर्षांपूर्वी वाचले होते पवनाकाठचा धोंडी, असेल कदाचित त्यातले.

मग नक्की वाचलेले नाहीये असे दिसते आहे. कदाचित संग्रहात असेल , अजून २५-३० पुस्तके वाचायची बाकी आहेत. Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

उद्या संकेत देईनच

तोपर्यंत प्रयत्न कराच.

मी दचकलो

बापरे

वीरधवल किंवा मर्मभेद तर नाही?
अत्भुतरम्य कादंबरी असली तर यांपैकीच असण्याची शक्यता वाटते आहे
गो ना दातारांचे नाही वाटत.

अधःपात व इंद्रभुवनगुहा आहेत संग्रहात, पण अजून वाचायला घ्यायचे आहेत.

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

नाही

उपरोक्त चारही कादंबर्‍या नाहीत. Smile

कालिकामूर्ति

मग दातारांचे कालिकामूर्तीच असेन वल्ली Smile

ऑर्डर आजच दिली आहे २ दिवसांत मिळेल ही कादंबरी मला ....

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

हेही नाही

गो. ना. दातारांची नाहीये ही कादंबरी.

मग पास

हम्म,

अत्भुतरम्य कादंबरी नसेन तर मग माझा पास. वाचल्यासारखी उगाच वाटते आहे
शशी भागवतांची रत्नप्रतिमा आणि रक्तरेखा नाही वाटत, पण त्यातील आता काहीही आठवत नाही मला.

रौप्यमहोत्सवी आणि सोपा वेचा दिला असला तरी ओळखता आलेला नाही Smile

सुंदर वेचा आहे

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

माझा पास

माझा पास

-ऋ
----------------------
"चला, मी माझा एकमेव जुनाट कोट घालून एक नवं पुस्तक घेऊन येतो"

मला उत्तर माहित आहे

अगदी वेचा दिल्याच्-दिल्या मिळाले ते. पण मी ते इथे देत नाही. कारण उत्तर शोधण्यात माझी अक्कल जराही खर्च नाही झाली. कारण बहुधा श्रामोंनी कळवले असेलच. नसेल तर उत्तर उघड झाल्यावर मला उत्तर कसे मिळाले ते इथे सांगेन.

बरोबर.

अदिती, वेदश्री ने उत्तर अचूक ओळखले. त्यामुळे आता जास्त दडवण्यात अर्थ नाही.

कादंबरी- शेलारखिंड
लेखक- बाबासाहेब पुरंदरे.
प्रकाशक - पुरंदरे प्रकाशन

पुस्तक नुकतेच निगडीच्या अक्षरधारा प्रदर्शनातून विकत घेतले. कि. २४० रू.

अजिंक्य देव अभिनित सर्जा चित्रपट याच कादंबरीवर आधारीत आहे. बहुतेकांनी पाहिला असेलच. पण पुस्तक विकत घ्याच. सचित्र पुस्तक आहे. बाबासाहेबांची भाषा अप्रतिमच.

चकवणारा वेचा

हम्म असे आहे होय. तरीच वेचा ओळखीचा वाटत होता.
शेलारखिंड मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे किशोरावस्थेत वाचलेले असल्यामुळे त्यातले आताशा काहीच आठवत नाही.
चांगलाच चकवणारा वेचा होता हा वल्ली Smile

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

गुगल

या वेचातील पहिले वाक्य गुगल होत होते. त्यावरून पुस्तकाचे नाव कळले.