'बोलती पुस्तके' हा मराठीतला पहिला वाहिला free Audio Books प्रकल्प. याबद्दल अधिक जाणुन घ्या इथे.
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २३
मुखपृष्ठ
|
ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २३
वेदश्रीचे अभिनंदन तिने वेचा कोणत्या कादंबरीतील आहे हे बरोबर ओळखले आहे 
वल्ली यांनी लेखकाचे नाव ओळखले होते.
संकेत १: पुस्तक सर्वस्वी मराठीच आहे (अनुवाद नाही)
संकेत २: या पुस्तकाच्या लेखकाचे हे सर्वात गाजलेले पुस्तक आहे.
संकेत ३: वेच्यात महाराज म्हणून जो उल्लेख आला आहे तो छत्रपति राजाराम महाराज यांच्याबद्दल आहे. पुस्तकात महाराज म्हणून छत्रपति शिवाजी, संभाजी व राजाराम महाराज या तिघांविषयी आहे त्यामुळे थोडा घोळ झाला. आताच भारावल्यागत पुस्तक वाचून संपवले तेव्हा दुरुस्ती करत आहे इथे.
संकेत ४: पुस्तक ऐतिहासिक नाहिये (ह्या संकेतावरुन बरीच मदत होईन पुस्तक शोधण्यासाठी)
संकेत ५: अशा प्रकारचे इतिहासाच्या वास्तवातून फॅन्टसी लेखन करणारा कदाचित हा एकमेव लेखक असावा. वल्ली यांनी लेखकाचे नाव एका प्रयत्नात दिले आहे 
(ह्या संकेतावरुन लोकांना पुस्तक नक्की ओळखता येईल)
वेचा:
==========================================
एक दिवस हेरांनी खबर आणली. खानाच्या उत्तरेच्या तळावर सैनिकांमध्ये अतिसाराची साथ पसरली आहे. हकिमांच्या औषधांचा काही परिणाम होत नाही. सैनिक हैराण झालेले आहेत.
'त्या तळावर किती राहुट्या असतील ?' मालुसरेंनी विचारलं
'पन्नास-साठ राहुट्या आहेत. पण गस्तीमध्ये ढिलाई आहे-'
'शंभर दीडशे सैनिक तरी असतील'
'आज रात्री त्या तळावर हल्ला चढवून वेढा तोडूया' घोरपडे म्हणाले.
'हल्ला करायचा; पण त्यांच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दक्षिणेच्या तळावर'
'सुभेदार तुम्ही चुकताय, दक्षिणेचा तळ मोठा आहे. उत्तरेचा तळ आपण सहज कापून काढू. वेढा मोडेल' धनाजी म्हणाले.
'आपल्याला वेढा तोडायचा आहे तो महाराजांची सुटका करण्यासाठी. मोठ्या फौजेनं दक्षिणेला हल्ला करुन खानाला गुंतवायचं. आम्ही उत्तरेकडून वेढा तोडून महाराजांना सोडवून आणतो.'
'सुभेदार नामी कल्पना आहे'
मग हल्ल्याच्या प्रत्यक्ष आखणीला सुरुवात झाली. उत्तरेला किती मावळे न्यायचे, दक्षिणेला कुणाला पाठवायचं? शेवटी असं ठरलं की निवडक जवान घेऊन मालुसरे, संताजी आणि धनाजीनं उत्तरेला जायचं. येसानं मोठा फौजफाटा घेऊन दक्षिणेला हल्ला करायचा.
येसा मावळ्यांचा फौजफाटा घेऊन दक्षिणेला गेला. तिथं लढाई सुरु झाल्यावर त्यांनी पलिते पेटवून इशारा केला. नंतर शंभर सव्वाशे मावळे घेऊन मालुसरे निघाले.
==========================================
प्रयत्न करा यश तुमचेच आहे
उत्तराची वाट पहातो आहे आदिती... 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
:(
हे ही पुस्तक मी वाचलेले नाही.
थोडक्यात, गेले वाचायचे राहून मध्ये खूपच भर पडत आहे
बहुधा संभाजी
माझ्या मते तरी वेचा हा विश्वास पाटलांच्या 'संभाजी' कादंबरीतील असावा. अर्थात कादंबरी संग्रही असुनही अजुन वाचली नाहिये.
जर 'संभाजी' नसेल तर मात्र राजाराम महाराजांच्या जीवनावरील एखादी कादंबरी असावी.
दोन्ही अंदाज चुकले
नाही वल्ली
संभाजी कादंबरीतील नाहिये आणि राजाराम महाराजांच्या जीवनावर देखील नाहिये
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
वाचलं आहे!
हा वेचा पुस्तकात वाचला आहे, असं आठवतंय. पण पुस्तकाचं नाव आठवेनासं झालं होतं. दिगम्भांचा अंदाज हाच माझाही अंदाज आहे.
अजून डोके खाजवा
छावा नाहीये.
उद्या तिसरा संकेत देईन. 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
नवीन संकेत दिला आहे
राजेश्री नाहीये
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
ऐतिहासिक नाही
जाऊ दे आता जास्त ताणत नाही
संकेत क्रमांक ४ नक्की दिशा देईन 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
जर ऐतिहासिक नाही तर....
मग प्रदिप दळवींचे 'सिंह आलाच नाही' हे असावे. सध्याच्या काळातील तानाजी मालुसरेंच्या वंशजावरील एक काल्पनिक कादंबरी आहे ही.
अजून प्रयत्न करा
प्रयत्न छान होता वल्ली
नाही ते नाहिये.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
खरेच खूप अवघड वेचा
सागर, खरेच खूप अवघड वेचा दिलात यावेळी, तर्कांच्या एव्हढ्या उतरंडी उतरूनही उत्तर मिळाले नाही. आता जास्त ताणू नका. उत्तर सांगून टाका नाहीतर किमानपक्षी लेखकाचे तरी नाव सांगून शेवटचा संकेत द्या.
यावेळी तुमचे उत्तर बरोबर असेल
वल्ली सर्व संकेत दिले आहेत. तेव्हा आता पुस्तकाचे नाव सांगून रंगत घालवण्यात काही अर्थ नाही
पुन्हा सर्व संकेत वाचून प्रयत्न करा मला खात्री आहे की तुम्ही नक्की ओळखाल हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
बघा बरोबर आहे का???????
कदाचित लेखकाचे नाव - नयनतारा देसाई असावे.......
या लेखिका नाहियेत
नयनतारा देसाई नाहियेत त्या बहुतेक ऐतिहासिकच लेखन करतात, पण ही कादंबरी ऐतिहासिक नाहिये. 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
रक्तरेखा?
प्रदिप दळवींनी लिहिलेली एखादी ओळही मी कधी वाचली असेल असे मला वाटत नाही पण दिलेल्या संदर्भांवरून आणि तू आताशात वाचलेय म्हणता त्यांचे रक्तरेखा हे पुस्तक असावे असे वाटतेय. दिशाभूल करणारा वेचा म्हणून ठीक आहे पण पुस्तक वाचायला भाग पाडेल असा मात्र नाही वाटला.
उत्तर बरोबर आहे
वेदश्री ने दिलेले उत्तर बरोबर आहे. (एकही ओळ न वाचता पुस्तक ओळखल्याबद्दल) अभिनंदन.
माझ्या अलिकडेच खरेदी केलेल्या पुस्तकांत प्रदीप दळवी यांचे हे एकच पुस्तक होते त्यामुळे वेचा ओळखणे सोपे होते 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
अरेच्चा
इतक्या जवळ पोहोचूनही थोडक्यात हुकलो. पुस्तकही फार पुर्वी वाचलेले होते.
पारायण की परीचय?
तुझे अभी पारायण करना पडींगा बॉस.. नहीं तो एक पुस्तकपरीचय लिखके भी चलेंगा. बोल क्या करता है? 
पुन्हा वाचा आणि आनंद घ्या
वेदश्रीशी सहमत आहे 
पुन्हा वाचा
एक मोठा संकेत तुम्ही दुर्लक्षिला वल्ली. ते म्हणजे प्रदीप दळवींचे 'रक्तरेखा' हे सर्वात गाजलेले पुस्तक होते. बाकीची पुस्तके नंतरची पण रक्तरेखाचे स्थान प्रदीप दळवींच्या बाबतीत अद्वितिय आहे. हे लक्षात घेऊन उत्तर दिले असते तर पहिलाच प्रयत्न बरोबर ठरला असता 
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
खरे आहे तुमचे
रक्तरेखा हे माझ्या लक्षातच आले नाही. एकतर फार पुर्वी वाचल्याने कथानक डोक्यातून निसटून गेले होते. शिवाय मालुसरेंचा उल्लेख असल्याने मला ते 'सिंह आलाच नाही' हे जवळचे वाटले.
दिशाभूल करण्याचे समाधान
खरे आहे वल्ली,
मला व्यक्तिशः पुन्हा एकदा दिशाभूल करणारा वेचा दिल्याचे समाधान मिळाले 
वाचकांनाही ते मिळाले असेल अशी अपेक्षा करतो
सर्वांना मनापासून धन्यवाद
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/






वा वा वा
कोडं घातलंस हे पाहून आनंद झाला. बुद्धीला खाद्य मिळालं आहे. पुस्तकाच्या शैलीववरवरून लेखकाचा/पुस्तकाच्या नावाचा अजून अंदाज आलेला नाही. अंधारात बाण मारण्यातही काही खास अर्थ नाही.
मला उत्तर सापडले की (सापडलेच तर!) व्यनि करते
--अदिती
अयं निज परोवेति गणना लघुचेतसां |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकं||
--अदिती
गुणाः सर्वत्र पूज्यन्ते दूरेऽपि वसतां सताम् ।
केतकीगंधमाघ्रातुं स्वयमायान्ति षट्पदाः ॥